या जीवनाचा अर्थ काय, या जीवनाचं नेमकं काय करायचं, आपल्याला या जीवनात काय करायचंय हा प्रश्न अनेकदा जवळपास प्रत्येक व्यक्तीला पडतो याच प्रश्नाचं उत्तर दिलंय, लेखक व्हिक्टर फ्रँकल यांनी आपल्या मॅन्स सर्च फॉर मीनींग (Man's search for meaning) या पुस्तकात..
लेखक व्हिक्टर फ्रॅंकल यांना दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी हिटलरने छळछावणीत टाकले. अत्यंत बिकट परिस्थितीतील या दिवसांमध्ये लेखक व्हिक्टर तेथे कुटुंबापासून दूर एकाकीच होते.या दिवसात खरंतर लेखक आपल्या भवताली असलेल्या अन्य कैद्यांच्या जीवनापासून खूप काही शिकले, तसंच जीवनाचा काय अर्थ आहे या एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधायला सुरुवात केली ती तिथूनच..
अनेकांना वाटत असेल की जीवनाचं काय करायचं वगैरे प्रश्नांची उत्तर शोधून काय फायदा .. कशाला एवढे मोठे विचार करायचे मात्र याचसाठी 'Giveup-itis' नावाची संकल्पना लेखकाने पुस्तकात स्पष्ट केलेली आहे.
'Giveup-itis' -
हिटलरच्या छळछावणीत असताना इतर कैद्यांकडे पाहूनच त्यापैकी कोणता कैदी आता लवकरच मरणार आहे हे इतर कैद्यांना मनोमनीच कळू लागत असे. याचं कारण, ज्या कैद्याचं मरण जवळ आलेलं असे तो आपोआपच इतरांपेक्षा आजारी, हतबल, अधिक चिंताक्रांत आणि उदास असा दिसू लागत असे, इतकंच नव्हे तर त्याच्या तोंडी भाषाही हतबलतेची, नैराश्यपूर्ण अशी यायला लागत असे. अशा कैद्यांसाठी स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधणं हे एक असाध्य कोडंच होतं जणू ! आणि हीच गोष्ट लेखकाच्या लक्षात आली. एकदा का तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचं कारण समजलं तर तुम्ही हजारो संकटही छातीवर झेलायला सज्ज असता, पण जर तुमच्याकडे या why चं उत्तर नसेल तर मग तुम्हाला how हा प्रश्नच पडत नाही. आणि म्हणून तुमचं जीवन निरर्थक होत जातं आणि सरतेशेवटी अशा निरर्थक जीवनामुळेच तुमचं मन निराश होत जातं.
लेखकाने सर्वात महत्त्वाची गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे ती अशी, की या जीवनाला स्वतः काहीच अर्थ नसतो, तर तो अर्थ देण्याचं कामंच तुम्हाला करायचं असतं.. जीवनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला स्वतःलाच ठरवायचं असतं.
व्हिक्टर फ्रँकल सांगतात, आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये असलो तरीही आपण एकच गोष्ट कायम नियंत्रणात ठेऊ शकतो ती म्हणजे आपला एटीट्यूड.. अनेक लोक खरंतर खूप चांगलं जीवन जगत असतात पण ते नेहमीच उदास, दुःखी असतात आणि दुसरीकडे लेखकासारखे सकारात्मक लोक .. जे छळछावणीत असूनही सुखी रहाण्याचा सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करत असतात.
मग आता प्रश्न एकच उरतो तो म्हणजे आयुष्याला अर्थ देण्याचं काम कसं करायचं..हा अर्थ कसा द्यायचा आणि मुळात तो आपापला अर्थ कसा शोधायचा ?
हा अर्थ शोधण्यासाठी या तीन गोष्टी लेखक सांगतात -
1. काम
तुमच्याकडे जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा त्या कामातून तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे तुमचं काम असतं तेव्हा तुमचं जीवन तुम्हाला अर्थपूर्ण वाटतं आणि तुम्ही आपोआपच अधिक उत्साहाने जीवन जगायला लागता.
2. प्रेम -
स्वार्थी प्रेम तर सगळीकडेच असतं. पण जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ मिळवायचा असेल तर तुम्ही दुसऱ्याला प्रेम द्यायला लागा. देण्यातलं प्रेम जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला तुमचं जीवन अर्थपूर्ण वाटायला लागतं.
3. भोग (त्रास, छळ) -
लेखक सांगतात, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील त्रासाला अर्थ देता त्या क्षणापासून तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तुमच्या जीवनात तुम्ही जे भोग भोगले ते इतरांना सांगून त्यांना त्यातून संदेश दिला की तुमच्या जीवनाचा अर्थ तुम्हाला सापडतो.
एकूणातच हे पुस्तक आपल्याला सांगते की -
- जीवनाला स्वतःहून अर्थ नसतो
- हा अर्थ देण्याचं काम, आणि मुळात हा अर्थ आधी शोधण्याचं काम आपल्याला करायचं असतं.
- आणि जीवनाला अर्थ देण्याचं काम करण्यासाठी कार्य, प्रेम, आणि भोग हे तीन मार्ग आहेत. यातून तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ सापडेल.
धन्यवाद
- मोहिनी घारपुरे -देशमुख
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
तुमचं आयुष्य नि माझं आयुष्य समांतर रेषांसारखं सुरू आहे. जे तिथे घडतं तेच थोड्याफार फरकानी इथे घडतं. जे इथे घडतं तेच थोड्याफार फरकानी तिथेही घडतं. तरीही आपण पोहोचतो निरनिराळ्या दिशांना, निरनिराळ्या ठिकाणांना .. याच प्रवासाच्या गंमतीजमती, अडीअडचणी वाचा माझ्या या ब्लॉगवर .. जिथे कधी तुम्ही सांगा मी ऐकेन, कधी मी सांगेन तुम्ही ऐका.. मोकळे व्हा, मनसोक्त जगा .. मग जाणवेल .. वेगळं वेगळं असलं तरीही, तुमचं आमचं सेम असतं !
शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१
मुगाचे आप्पे पाककृती
हा एक इतका सोपा पदार्थ आहे की अक्षरशः पाच दहा मिनीटात तयार होतो. शिवाय थंडीच्या दिवसात एवढा पौष्टिक पदार्थ गरमागरम खायला मजा येते. मी माझी रेसिपी देतेय खाली पण यातही अनेक अँडीशन्सला भरपूर स्कोप आहे .. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार भरपूर इनग्रेडीयंट्स, भाज्या वगैरे यात अँड करू शकता !
पाककृती -
१. आख्खे मूग चार पाच तास भिजवा आणि वेळ असल्यास मोडही आणून मग वापरलेत तरीही छानच.
२. आता हे चांगले भिजलेले किंवा मोड आलेले मूग मिक्सरमध्ये घाला.
३। आता चवीनुसार त्यात मीठ, हळद, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घाला
४. हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्या.. थोडंस पाणी घालून हे मिश्रण साधारण डोसाबँटर प्रमाणे जरासं सरसरीत करा.
५. आप्पेपात्रात थोडं तेल लावून मग हे बँटर घाला
६. मंद आचेवर दोन्ही बाजूने आप्पे खमंग भाजा
७. सॉस किंवा चटणीबरोबर गरमागरम खा
८. सोडा घालण्याची गरज पडत नाही.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
तुम्ही माझ्या नावासह ही रेसिपी शेअर करू शकता !

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१
मेटाव्हर्स काय आहे ? (#Techie_Tuesday)
अलीकडेच एका सकाळी अचानक फेसबुकने घोषणा करून त्यांचं रिब्रँडींग केलं.. मार्क झुकेरबर्गने खुद्द जाहीर केलं की यापुढे फेसबुक मेटाव्हर्स नावाने ओळखलं जाईल. मग हे मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय आहे.. फेसबुक आणि मेटाव्हर्समध्ये नेमका काय फरक आहे आणि काय वेगळेपण आहे..? चला जाणून घेऊया.
मेटाव्हर्स हे इंटरनेटचं भविष्य आहे. तुम्ही आठवून पहा, जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा आपल्याला अविश्वसनीय वाटतील अशा अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेल्या. विशेषतः आपलं सोशल लाईफ वेगळं झालं, तसंच व्यक्तीगत आयुष्यातही आपण सतत इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहू लागलो. सुरूवातीला व्हिडीओ कॉल, चॅटींग, ऑडीओ मेसेजिंग या सगळ्याचं जितकं अप्रूप वाटायचं तितकं नंतर ते सगळं आपल्या जीवनाचा भाग बनलं, आणि आता या सगळ्याच तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणजे मेटाव्हर्स असेल.
- हे मेटाव्हर्स कायम सुरू असेल, लाईव्ह असेल, यात कधीच पॉझ असणार नाही, तसंच कधीही ते रिसेट होणार नाही.
- डिजीटल करन्सी असेल
- आभासी दुनिया आणि वास्तव दुनिया दोन्हीकडे मेटाव्हर्स असेल असं सध्या समजतंय
- पॅरलल व्हर्चुअल वर्ल्ड असंही आपण त्याला म्हणू शकतो.
- व्हर्च्युअल रिएलिटीमध्ये तुमचे अवतार प्रत्यक्ष जगल्यासारखे जगतील. तुम्हाला हवं तसे ते दिसतील, तुम्हाला हवं तिथे फिरू शकता. जगाच्या कोपऱ्यात, केव्हाही, कुठेही व्हर्चुअल रिएलिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
- अनेक गेमिंग कंपन्यांनी आजवर अशाप्रकारे व्हर्च्युअल रिएलिटी यापूर्वी वापरली आहे, वापरते आहे. फोर्टनाईट गेम नावाच्या कंपनीने या तंत्रज्ञानाचा आधीच बऱ्यापैकी वापर केलेला आहे.
- या मेटाव्हर्समध्ये व्हर्च्युअल करन्सी वापरली जाईल.
- इंटरऑपरेटीबिलीटी हे आणखी एक वैशिष्ट्य असेल, अर्थात तुम्हाला या जगात वावरताना सतत लॉगिन लॉगआऊट करण्याची गरज असणार नाही.
- हजारो किमी दूर असलेल्या लोकांना मेटाव्हर्समुळे एकत्र आल्याच्या आभासात वावरता येईल. यामुळे तुमचा ऑनलाईन टाईम जास्त मीनींगफुल होईल असा फेसबुकचा विश्वास आहे.
मात्र, हे सगळे असले तरीही, आजवर अनेकांनी या व्हर्चुअल पॅरेलल वर्ल्डबद्दल खूप निगेटीव्ह अंदाज बांधले आहेत. डिस्टोपिया म्हणजे ज्याचा शेवट वाईट असतो, असं या जगाबद्दल बोललं जातं, म्हणूनच फेसबुक आता पूर्ण काळजी घेऊन या जगात प्रवेश करत आहे. फेसबुकला माहित आहे की जेव्हा असं एक संपूर्ण आभासी जग उभं राहील, तेव्हा तिथे ज्याप्रमाणे सकारात्मक गोष्टी, घटना घडतील, त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि असंख्य नकारात्मक घटनाही घडू शकतात, त्यामुळेच फेसबुक आता याबाबत प्रचंड संशोधन करून काम करते आहे. त्यासाठी फेसबुक अनेक सिव्हील सोसायटी ग्रुप्सची मदतही त्यासाठी घेत आहे.
प्रचंड पैसा, वेळ, बुद्धिमत्ता खर्च करून उभं रहाणारं हे व्हर्च्युअल आभासी जग नेमकं कसं असेल याबाबत आता जनमानसात उत्सुकता लागून राहिलेली आहे हेच खरं..
धन्यवाद
- Mohinee Gharpure-Deshmukh
Social Media Marketer,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)