.... जेव्हा शंकरजींची मिळाली दाद !
एखाद्या मोठ्या गायकाची भरभरून दाद मिळावी हे कोणत्याही नवोदित संगीतकाराचं स्वप्न असतं पण प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका मधुरा बेळे यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात आलं आणि संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली ही आठवण निश्चितच सांगण्यासारखी आहे..
पुण्याला संगीतात एम.ए करण्याकरिता मधुराजी डॉ. अलकादेव मारूलकर यांचेकडे जयपूर घराण्याचं शिक्षण घेत होत्या. त्यावेळी गुरूंच्या सान्निध्यात दिवसरात्र राहून केवळ आणि केवळ भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास, गायन सुरू होतं. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून नवनिर्मिती असा दोन्हीही आनंद मधुरा घेत होत्या. त्यावेळी त्यांनी विविध रागातील बंदीशींना चाल लावणे, तराणे बांधणे अशा नानाविध प्रकारे आपली कल्पकता व सर्जनशीलता वापरून स्वतःला एका उंचीवर नेले. त्याबद्दल गुरू डॉ. अलकादेव मारूलकर यांच्याकडून वाहवाही मिळवली.
नंतर नाशिकचे कवी मोहन ओढेकर यांच्या भावगीत भक्तिगीतांना संगीत देऊन हिंदोळ भावनांचा हा पहिला कार्यक्रम मधुराजींनी सादर केला. त्यात तीन चार गाणी विठ्ठलावरचीच होती. या गाण्यांच्या संगीत संयोजनाचं काम मधुराजींनी मुंबईचे अजय जोगळेकर यांच्याकडे केलं. ही गाणी ऐकताना अजयजींनीही मधुरा यांना दाद दिली आणि विठ्ठलाच्या गीतांवर एखादी सीडी करावी अशी कल्पना सुचवली. पण सीडी करायची तर आणखी गाणी हवी .. एखादा परिपूर्ण विषय हवा. मग त्यादिशेने काम सुरू झाले.
जवळ असलेल्या तीन चार गाण्यांचे बोल बारकाईने अभ्यास करताना असे दिसले की या गीतांमधून एखाद्या वारकऱ्याच्या दिंडीचा प्रवासच जणू उलगडत आहे. म्हणजे कसं ना, की वारकऱ्याला विठ्ठल भेटीची ओढ लागते, मग तो त्यासाठी वारीला निघतो, विठ्ठलाचा घोष करत वारीत देहभान विसरून सहभागी होतो, अपार कष्ट सोसत ही वारी पूर्ण करतो आणि ज्याक्षणी प्रत्यक्ष विठूरायाची मूर्ती डोळ्यासमोर दिसते त्या क्षणी सर्व कष्ट क्षणात विरून जातात नि वारकरी भक्तिरसात चिंब होऊन जातो .. हा सगळा प्रवास गीतांच्या माध्यमातून उलगडण्याचे ठरले. आणि मोहनजींनी आणखी काही गीतांचे लेखन केले व अशी एकूण आठ गाणी तयार झाली.
एरवी अशी गाणी ही भजनांच्या किंवा लोकगीतांच्या शैलीत सादर केली जातात पण मधुरा यांच्याकडून या सर्व गाण्यांना शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने चाल बांधली गेली. या सर्व चाली ऐकल्यावर हे वेगळेपण अजयजींना दिसलं आणि ही सीडी शंकर महादेवन् आणि सुरेशजी वाडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचं ठरलं.
खरंतर या सीडीतील सगळीच गाणी मधुराजींच्या आवडीची परंतु तरीही त्यांपैकी, विठ्ठल विठ्ठल घोष निनादे या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाची आठवण त्यांनी मनात आजही तशीच जपली आहे.
त्याचं झालं असं, ध्वनिमुद्रणाला सुरूवात झाली. मुंबईच्या आजीवासन स्टुडीयोमध्ये हे काम सुरू झालं. तशी दोन दिग्गज गायक, एक म्हणजे सुरेशजी वाडकर आणि शंकरजी महादेवन् मधुराजींसमोर गाण्यांची तालीम करू लागले. एवढे मोठे गायक आणि मधुराजी तेव्हा तशा नवख्याच... परंतु तरीही मोठ्या माणसांचं मोठेपण हे त्यांच्या नम्रपणात दिसून येतं असं म्हणतात ते खरंच आहे, कारण दोघेही गायक मधुराजींना मान देऊन, विचारून गाऊन दाखवत होते, गाण्यात मधुराजींनी बांधलेली एखादी जागा आपल्या गळ्यातून तशीच्या तशी येतीये का की नाही .. येत नसेल तर तू गाऊन दाखव, एवढ्या साधेपणाने ते समजून घेत होते.. आणि प्रत्येक गाण दुसऱ्या तिसऱ्या टेकला फायनल होत होत अशी आठवण मधुराजी सांगतात.
अशातच विठ्ठल विठ्ठल घोष निनादे हे गाणं ऐकल्यावर तर खुद्द शंकरजींनी मधुरा यांना उत्स्फूर्तपणे दाद देत, " वाह, मधुराजी, आपने कमाल का म्यूझिक दिया है, कमाल का ..!" असे म्हटले आणि त्याक्षणी मधुराजींचा आनंद गगनात मावेनासा झाला..
हे गाणं त्यांनी इतकं ताकदीने आणि इतकं मनापासून गायलं आहे की ऐकताना आपल्याला वारी, रिंगण डोळ्यासमोर येतं. संगीत संयोजक अजयजींनी शंकरजींना या गाण्यातून गोल गोल रिंगणाचा भाव निर्माण करण्याचे सुचवले आणि प्रत्यक्ष गाताना शंकरजींनी ते रिंगण आपल्या सुरावटीतून निर्माण केले हेच या गाण्याचे विशेष. शिवाय, शंकरजींनी या गाण्यात उत्स्फूर्तपणे एक तानही घेतली आहे जी ऐकताना तर आपण खुद्द वारकऱ्यांबरोबर त्या रिंगणात गोल गोल फिरतोय की काय अशी अनुभूती मिळते.
मधुराजी सांगतात, " गाणं सुंदर व्हावं यासाठी शंकरजी आणि सुरेशजींनी आपली सर्व ताकद पणाला लावली. शिवाय कुठेही, आम्ही तुझ्यापेक्षा फार उंचीचे, फार मोठे गायक आहोत वगैरे भाव यत्किंचितही नव्हता.. किंबहुना गाण्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी स्वतःहून काही जागा सुचवत ते गायले हेच या गीतांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. "
सध्या पंढरपूरात वारी सुरू आहे.. वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत आहेत. देहभान विसरून नाचत, फेर धरत आहेत.. उभ्या महाराष्ट्रात हे असे भक्तीमय वातावरण निर्माण झालेले असताना, माझ्या ब्लॉगवर हे पाचवं सोनेरी गाणंही विठूरायाचंच, हा निव्वळ योगायोग आहे. की कदाचित विठूरायाचीच ही इच्छा आहे, की माझ्यावरील कृपाशिर्वाद माझ्यापर्यंत पोचण्यासाठी माझ्या हातून या गाण्याविषयी चार शब्द लिहीले जावेत .. मला माहीत नाही.. पण यानिमित्ताने विठूरायाच्या वारीत मी या शब्दरूपांनी सहभागी झाले याबद्दल मला निश्चितच आनंद आहे..
तर असं हे पाचवं सोनेरी गाणं, विठ्ठलाच्या रंगात रंगलेल्या माझ्यासारख्याच या सर्वजणांचं ..
गाणं ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि विठूरायाच्या नामघोषात तल्लीन होऊन जा ...
बोला,
पंढरीनाथ महाराज की जय .. !!
https://www.youtube.com/watch?v=O5F-y-z9WCc
- मोहिनी घारपुरे - देशमुख

Very nice Mohinee!
उत्तर द्याहटवाधन्यवाद मावशी ..
हटवा