असा झाला नाशिकगीताचा जन्म
गाणं जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा त्यामध्ये कित्तीतरी जणांचे श्वास गुंफलेले असतात. संगीतकार त्या गाण्याला मूर्त रूप देत जातो आणि एकेका ओळीतून कवी, गायक आणि वादक यांच्या माध्यमातून ती स्वररचना साकारली जाते.
हा सगळा प्रवास दैवीच .. कारण एखादं गाणं जन्म घ्यायला काही दिवस लावतं तर अक्षरशः काही मिनीटांमध्येही एखाद्या गाण्याची चाल, रचना संगीतकाराच्या मनात आकार घेत जाते ..
याचंच एक उदाहरण म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी क्रेडाई आयोजित Shelter 2017 या भव्य प्रदर्शनासाठी संगीतबद्ध केलेले नाशिकगीत..
क्रेडाई नाशिकचे विद्यमान अध्यक्ष सुनील कोतवाल आणि नाशिकच्या ज्येष्ठ पत्रकार वैशाली बालाजीवाले या प्रदर्शनासाठी नाशिक नगरीचे महात्म्य सांगणारे गीत कोणी लवकरात लवकर लिहून देईल का आणि तितक्याच तातडीने ते कोणी संगीतबद्ध करून देईल का याचा शोध घेत होते. मोहनजींशी संपर्क झाला, त्यांनी कवी मिलींद गांधींचं नाव सुचवलं. सुरूवातीला काही कारणाने मिलींदजींनी नकार दिला... पंधरा दिवसांनी पुन्हा वैशालीजी, मोहनजी यांचं बोलणं झालं आणि पुन्हा हे गाणं मिलींदजींनीच लिहिण्याचा आग्रह करण्यात आला.
आश्चर्य म्हणजे, त्यानंतर पुढल्या घडामोडी वेगानं घडल्या .. दैवी वेगानंच म्हणायला हवं.
कारण, अवघ्या पंधरा मिनीटातच मिलींदजी तब्बल पाच कडव्यांचं नाशिक गीत लिहीतात काय, अर्ध्या तासात ते गाणं क्रेडाईच्या महामंडळाकडून निवडलं जातं काय आणि पुढल्या काही मिनीटातच गाण्याला मूर्त रूप देण्याची जबाबदारी मोहनजींच्या खांद्यावर येऊन पडते काय .. सगळं जणू काल्पनिक वाटावं असंच ...
हे गीत आपल्यालाच स्वरबद्ध करायचं आहे याची तोवर मोहनजींना कल्पनाही नव्हती. कवीचं नाव सुचवलं, गाणं तयार झालं आपली जबाबदारी संपली असंच त्यांना वाटत होतं. पण हे गाणं संगीतबद्ध करण्याची जबाबदारीही मोहनजींच्याच खांद्यावर आली आणि तेव्हा मोहनजी या गीतप्रवासात सामील झाले आणि पुढल्या दहा दिवसात गाण्याला मूर्त रूप मिळालं.
गाणं वाचत असतानाच ते पुरिया धनाश्री रागातच करावं असा जणू गाण्यानेच संकेत दिल्याचं मोहनजींना जाणवलं.
मोहनजी सांगतात, गाणं नेमकं अमुक एका रागातच करायचं असलं काहीही आधी ठरलेलं नसतंच, गाणं स्वतःच संगीतकाराशी बोलत जात आणि आम्ही संगीतकार गाण्याच्या इच्छेनुरूप ते तसं तसं स्वरबद्ध करत जातो इतकंच काय ते खरं.
गाण्याची चाल आपोआपच सुचत गेली, मुखडा पुरिया धनाश्रीत बांधला गेला मग बाकीची सर्व कडवी निरनिराळ्या रागात गुंफली गेली आणि मोहनजींनी ती त्यांच्या सर्वप्रथम आपल्या पत्नीला ऐकवली. डॉ. मेधा या कानसेन आहेतच, त्यामुळे मोहनजींच्या गाण्यावर पहिली जाणकार प्रतिक्रिया नेहमीच त्यांचीच असते.
गाणं करायला सुरूवात केली आणि मोहनजींच्या पारखी नजरेनं पाचही कडव्यांचं वैशिष्ट्य क्षणार्धात हेरलं... पाच कडव्यांच्या या गाण्यात नाशिकच्या एकेका वैशिष्ट्याचं वर्णन केलेलं असल्याचं त्यांनी जाणलं नी हे गाणं जनस्थानचे प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर कासार आणि गायिका रागिणी कामतीकर यांच्या आवाजातच करायचं हे देखील त्यांनी मनोमनी पक्क ठरवलं.
काळी एकच्या पट्टीत हे गाणं बांधायला सुरूवात झाली. पहिल्या कडव्याला साधारणतः अभंगवाणीचा बाज, दुसऱ्या कडव्याला भक्तीगीत आणि लोकगीताप्रमाणे चाल दिली, तिसऱ्या कडव्याला अद्धाताल लावला, चवथ्या कडव्याला लावणीसारखा टच आणि पाचव्या कडव्याला चित्रपटसृष्टीचा फील ऐकणाऱ्याला येईल अशा पद्धतीनेच संगीत दिलं.
हे गाणं करत असताना अनंत अडचणीही आल्या. कारण इतक्या कमी कालावधीत एवढं वैविध्यपूर्ण गाणं करायचं आणि त्यासाठी असलेलं बजेट याचा ताळमेळ बसवणं अवघड होतं. वेगवेगळी वाद्य वाजवणारे वादक शोधण्याऐवजी काय करता येईल असा विचार करत असतानाच मोहनजींना त्यांचे मित्र अनील धुमाळ यांची आठवण झाली. अनीलजींनी क्षणार्धात होकार दिला आणि मग त्यांच्याशी मोहनजींनी गाण्यात अपेक्षित असलेले सगळे इफेक्ट्स, वाद्यांचे आवाज याविषयी मोकळेपणाने सांगितलं. अनीलजींच्या जादूई बोटांनी चक्क सिंथेसायझरवर तबला, ढोलक, ढोलकी, संतूर, सॅक्सोफोन, चंडा (रणवाद्य) अशा नानाविध वाद्यांचा इफेक्ट गाण्याला दिला. आता प्रश्न होता ध्वनीमुद्रणाचा .. अशावेळी प्रशांत पंचभाई या नाशिकच्या प्रसिद्ध ध्वनीमुद्रकांची भेट मोहनजींनी घेतली. त्यांनीही लगेच रूकार भरला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे जाऊन ऱ्हिदम, मेलडीसह क्यू ट्रॅक रेकॉर्ड केला. त्या ट्रॅकवर नंतर रागिणीजी आणि ज्ञानेश्वरजींनी तब्बल सहा तास सलग बसून हे एक अविस्मरणीय गाणं रेकॉर्ड केलं.
तर अशी ही नाशिकगीताची जन्मकथा..
हे गीत मोहनजींच्या आणि त्या गीताशी जोडलेल्या अन्य कलाकारांच्या परिश्रमानं आकारास आलं आणि नाशिक नगरीचं झालं ते कायमचंच ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

![]() |
मोहन उपासनी व त्यांच्या पत्नी डॉ. मेधा उपासनी |
गाणं ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
Mast
उत्तर द्याहटवामोहिनी खरंच हा उपक्रम खूप स्तुत्यच आहे. आणि तुझ्या ओघवत्या शैलीत मस्त उलगडतो संगीतकारांचा स्वरसोनेरी प्रवास...
उत्तर द्याहटवाthank you...!
हटवामोहिनी खूप कल्पक उपक्रम. तुझं लिखाणही तितकचं ओघवतं आणि सोप्या शब्दात मांडणी. पुढील प्रवास वाचण्याच्या प्रतिक्षेत.
उत्तर द्याहटवाThank you so much.! नक्कीच .. असंच वाचत रहा .. आणि आपल्या प्रतिक्रीया कळवत रहा ...
हटवाMohan all rounder aahe aani prachand mehanati sudhha yacha pratyey gane aik tana nakki yeto.Anil Dhumal Prashant panchbhai ragini kamtikar ani mauli dnyaneshwar kasar yanni milun mohanche sangit ani mulinchya sahebanna nyay dilay he nakki !!!
उत्तर द्याहटवामोहिनी धन्यवाद अप्रतिम लिहितेस तू मिडास टच तुझ्या शब्दांचा आमच्या स्वरांच्या रचनेला ।।������
उत्तर द्याहटवामोहिनी तुझ्या शब्दांचा मिडास टच माझ्या रवररचनेला होऊन ते खरेच सोनेरी लिखाण झालेय धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद ...
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाFarach chhan lihilay. Likhanatil tuzhya mohinina Mohini Ani Mohanjinchya Gitaprawasacha bolaka shabdachitra dolyapudhe ubha kela. Gana janmala yetannachi tyanchi aswasthata, mehanat shabdatunahi janawatey
उत्तर द्याहटवाधन्यवाद ...
हटवा