![]() |
गायक तथा संगीतकार ज्ञानेश्वर कासार |
अशी गुंफली भक्तीरसात भैरवी
भक्तीरसात ओतप्रोत भरलेली भैरवी तशी आपल्यासाठी नवीन नाही. मात्र तरीही एक असं गीत, ज्याच्या संगीतकाराला मुळात भैरवी राग फारसा आवडत नसतानाही त्याच रागात ते भक्तीरसातले शब्द मनापासून गुंफतात काय आणि एक असं गीत जन्माला घालतात जे ऐकताना तमाम भक्तांचे डोळे अखेरीस पाणावल्याशिवाय रहात नाहीत, प्रत्येकच भक्त भक्तीरसात चिंब झाल्याशिवाय रहात नाही.
ही जन्मकथा आहे प.पू.गोंदवलेकर महाराज यांच्या भक्तीवर आधारलेल्या 'आनंदाचे डोह' या ध्वनिफीतीतील 'मी हाक मारीता त्याला, तो सद्गुरू धावत आला' या गीताची.
त्याचं झालं असं की जळगावचे सुप्रसिद्ध गीतकार शशिकांत वडोदकर यांनी या ध्वनिफीतीतील सर्व भक्तीगीते लिहीली होती. या गीतांना चाली लावण्याची जबाबदारी नाशिकचे प्रसिद्ध गायक व संगीतकार ज्ञानेश्वर कासार यांच्या खांद्यावर आली. भक्तीगीतांना चाली लावता लावता जेव्हा अखेरचे गाणे ज्ञानेश्वरजींनी चाल लावायला घेतले तेव्हा संकेतानुसार हे गाणे भैरवीत करण्याचाच विचार प्रथमतः त्यांच्या मनी आला. मुळात त्यांना स्वतःला भैरवी राग फारसा आवडत नसूनही प्रत्यक्ष गीत संगीतबद्ध करताना मात्र कसं कोण जाणे ही भैरवी अशी सुंदर सजली की ती ऐकताना त्यांचे स्वतःचेही मन व्याकूळ झाल्याशिवाय राहिले नाही.
मी हाक मारीता त्याला, तो सद्गुरू धावत आला
मस्तकी ठेविले हात, मम जन्मच कृतार्थ झाला
हे गीत गुंफण्याकरिता नाशिकचे सुप्रसिद्ध सिंथेसायजर वादक अनिल धुमाळ, सुप्रसिद्ध तबलावादक सतीश पेंडसे, पखवाज वादक दिगंबर सोनवणे, कल्पक तालयोजक अभिजित शर्मा,सुप्रसिद्ध गिटार वादक निलेश सोनावणे, प्रसिद्ध बासरीवादक पंकज नाथ आदी वादकांची संगीतसाथ लाभली. तर प्रशांत पंचभाई यांनी ध्वनीमुद्रण केले आहे.
या गीताबद्दल ज्ञानेश्वरजी सांगतात, 'मला लहानपणापासूनच साहित्य-काव्य-शब्द यांची आवड, त्यामुळे चांगले काव्य, शब्द यांकडे मी सहजच आकर्षित होतो. या गीताबाबतही खरंतर तसंच झालं. या गीताचे शब्द आणि त्यातला भाव या मला माझ्या मनातल्याच भावना वाटल्या... आणि त्यातूनच एक उत्तम चाल बांधली गेली असावी...'
या गीतातला ज्ञानेश्वरजींचा सर्वांत आवडता भाग म्हणजे गीताच्या अखेरीस होणारा राम नामाचा गजर..शिवाय, ही भैरवी असल्यामुळे या गीतात आपसूकच पूर्णत्वाची आस आली आहे असे ते सांगतात, अर्थात गीतानुसार रागाची निवड हा ही भाग योगाने भाव संपन्नतेकडे आलाय असे ते सांगतात. ज्ञानेश्वरजींनी अनेक वेळा या गीताचे सादरीकरण केले तेव्हा गोंदवले परिवारातील रसिक येऊन त्यांना हमखास विचारणा करीत,की तुम्ही गोंदवले परिवारातील आहात का ? यावर जेव्हा ज्ञानेश्वरजींचे नकारार्थी उत्तर मिळत असे तेव्हा लोकांना आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. कारण परिवारातले नसूनही एवढा भक्तीभाव गीतात कसा डोकावू शकतो असा प्रश्न लोकांना पडतो यावर ज्ञानेश्वरजी एकच उत्तर देतात, 'मी एक गायक-संगीतकार आहे... गीताच्या भूमिकेत जाणे हे आमचे परमकर्तव्य आहे... ते नाही करु शकलो तर मग कुठली कला आमची... अन् कुठली आमची साधना...!' ज्ञानेश्वरजींचं हे उत्तर खरेच यथार्थ आहे.
गायकाची परमपूजा म्हणजे त्याचे सूर, त्याचं गीत आणि त्यातला भाव. जोवर त्याला या गानमार्गावर नेमकं वावरता येत नाही तोवर त्याची गानपूजा अपूरीच वाटत रहाते. ज्ञानेश्वरजींना मात्र ही कला सुसाध्य झाली आहे. आणि त्यामुळेच त्यांचा आवाज, त्यांचे भक्तिभाव या गीतातून आपल्यापर्यंत थेट पोहोचतात. ते सांगतात, एरवी जसं कुठलही गीत जन्माला येईल तशीच या गीताची निर्मिती झाली परंतु फरक एवढाच की हे गीत ऐकल्यानंतर जाणकार रसिकांकडून मिळणारा अश्रु रुपातला आशीर्वाद आणि पाठीवर मिळणारी शाबसकीची थाप हेच या गीताला अन्य गीतांपासून निराळं करतात. हे गीत कधीही ऐकताना माझ्या तरी अंगावर शहारे आल्यावाचून रहात नाही.. इति ज्ञानेश्वर कासार.
तर असा हा सूरप्रवास, प्रत्येक संगीतकाराचा.. एखादी माता ज्याप्रमाणे आपल्या बालकाला जन्म देण्यापूर्वी नऊ महिने उदरात त्याचे लाड कौतुक करते.. त्याला जे जे हवं ते ते देते त्याप्रमाणेच संगीतकारही आपल्या मनात आधी त्या त्या गीताला जे जे जसे जसे संगीत हवे तसे पुरवतो, त्याचे एकप्रकारे लाडच करत जातो आणि त्यानंतरच ते गीत संगीतकाराला हवं तसं अगदी त्याच्या मनासारखं उमटतं.. आणि नंतरच ते श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतं. विशेषतः भक्तीगीतांचं यशच त्यात आहे, जेव्हा लोक ते गीत ऐकताच नामस्मरणात, भक्तिरसात चिंब होतात,आणि आपल्या गुरूवर्यांची मूर्ती आपल्या बंद डोळ्यासमोर साक्षात उभी रहाते. हा एक अलौकीक क्षण साध्य करण्यासाठीच जणू संगीतकाराने आपले स्वरसामर्थ्य वापरलेले आणि योग्य प्रकारे योजिलेले असते. तर अशी ही या गीताची जन्मकथा..
- मोहिनी घारपुरे - देशमुख
हे गीत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि भक्तिरसात आकंठ चिंब व्हा ..
https://www.youtube.com/watch?v=BFYFwS2LDFU

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा