माझ्या ब्लॉगवर तुम्हाला आणखी एक नवं पान आजपासून सापडेल. सोनेरी गाणी या नावानी हे पान या ब्लॉगवर जोडते आहे. अनेक नामांकीत संगीतकारांनी स्वतः संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांपैकी त्यांचं सर्वाधिक आवडतं गाणं, आणि त्या गाण्याची जन्मकथा तुम्हाला या पानांमध्ये वाचायला सापडेल.
गाणं जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्यामागे संगीतकाराची बुद्धी आणि अपार कष्ट असतात. प्रत्येक गाणं म्हणूनच एकापेक्षा निराळं ठरत असतं आणि त्या त्या गाण्यासोबत त्याची जन्मकथाही फार फार उत्कंठावर्धक असते. मी स्वतः गायन विशारद, शिवाय व्यवसायाने पत्रकार त्यामुळे अनेक गायक, संगीतकार, वादक यांच्याशी वेळोवेळी गप्पा होत. त्याबाबत नंतर चिंतन करत असतानाच एकदा मला ही कल्पना सुचली आणि सोनेरी गाणी हा दुवा ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांसमोर आणण्याचा प्रवास सुरू झाला.
मला खात्री आहे, माझा हा नवा प्रयत्नही आपणा वाचकांना नक्कीच आवडेल..
नक्की वाचा, आजपासून, सोनेरी गाणी .. माझ्या ब्लॉगवरचं नवं पान ..
- मोहिनी घारपुरे-देशमुख

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा