सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

Choco vanilla walnut tootyfruity sponge cake recipe



Ingredients
 

एक कटोरी मैदा, थ्रीफोर्थ कटोरी पीसी हुई शक्कर, हाफ कटोरी तेल या घी या बटर. हाफ कटोरी दही, हाफ लिटर दूध की जितनी है उतनी मलाई, एक फ्लॅट चम्मच बेकींग पावडर और हाफ चम्मच बेकींग सोडा, फ्यू ड्रॉप्स ऑफ व्हॅनिला इसेन्स. पसंदीदा ड्रायफ्रूट्स.

Recipe 

Mix all wet ingredients first and keep aside.

Sieve all dry ingredients together in a bowl and keep aside.

Now mix wet and dry ingredients. Add vanilla iscence and dryfruits.

Now transfer it to the cake mould. Don't forget to preheat oven or cooker or kadhai.

Now keep the mould in preheated utensil. Tap the mould before keeping for backing.

Mostly within 25 mins cake comes out very well. Keep checking and turn off the flame at right time.

Don't forget to share the pics with me ☺️☺️

- Mohinee Gharpure Deshmukh 

( Kindly note I have Used Hindi and English language purposely in this post, to reach out as many people as I can, as many friends always asks me my cake recipe. So felt to share with all. Thank you.)


शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

कासव

१० ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने मानसिक आरोग्य विषयांतर्गत 'नैराश्य' या विषयाला हात घालणाऱ्या 'कासव' या मराठी चित्रपटाविषयी... 



कासवाच्या एकूण जीवनचक्राशी एखाद्या निराश माणसाचं जीवन जोडून मग त्या अनुषंगाने खुलणारी ही कथा पहिल्या क्षणापासूनच आपल्या मनात उत्सुकता निर्माण करते. एक नैराश्याच्या गर्तेत हरवलेला तरूण अक्षरशः वाट फुटेल तिकडे निघलाय.. आत्महत्येचा प्रयत्न करून झालाय आणि आता बेवारस अवस्थेत एका ढाब्याच्या बाहेर पडलाय .. अशातच जानकी कुलकर्णी ( इरावती हर्षे ) जी कासवांवर संशोधन करायला कोकणात निघालीये ती तिचा सहकारी यदू ( कवी सौमित्र ) यांच्याबरोबर तिथे पोचते. त्या कोवळ्या तरूणासाठी तिच्या मनात मातेसमान माया दाटते.. अखेर ती त्याला वाऱ्यावर न सोडता आपल्याकडे घेऊन जाते. पुढे ती त्याला उपचार तर देतेच पण काळजी, माया, आणि मुख्य म्हणजे समजून घेते. हळूहळू त्या तरूणाचं मन थाऱ्यावर यायला लागतं नि अखेर जीवनाशी झुंजायला तो खऱ्या अर्थाने सज्ज होतो.. त्या चिमुकल्या कासवाच्या पिलांसारखा जी मोठ्या मोठ्या लाटा अंगावर झेलूनही न डगमगता त्या निसटणाऱ्या वाळूवरही आपले पाय घट्ट रोवून उभी रहातात.. 


मला फार आवडला तो आणखी एक छोटा मुलगा .. जो चित्रपटभर भाव खाऊन जातो. एकाकी, अनाथ असलेल्या त्या छोटुकल्याचं जगात कुणीच नसतं पण तो किती निखळ, किती छान आणि किती धीटुकला असतो. एका प्रसंगी तो निराश तरूण त्या छोटुकल्याला भेटतो तेव्हा तो छोटा मुलगाही या निराश तरूणाची कळी खुलवण्यासाठी असं काही बोलतो, वागतो की त्याचं कॅरेक्टर पाहताना आपणही हरखून जातो. 

निराश तरूण ( निश ) ला समजून घेणारी जानकी एकेकाळी स्वतः या परास्थितीतून गेलेली असल्याने तिचं त्याला समजून घेणं एकीकडे आणि दुसरीकडे यदुची त्याच तरूणाबद्दलची सर्वसामान्यतः जशी सगळयांचीच असतात तशी मतं.. ! ते यदुचं कॅरेक्टर म्हणजे आपला समाज .. जो मानसिक आजारांना 'नाटकं' समजतो. ज्यांना असं वाटतं की तोंड पाडून बसलेली व्यक्ती ही नाटकं करत असते कारण मग तिला कामं टाळता येतात नि फुकटचं, आयतं गिळायला मिळतं .. ! हीच समाजधारणा आजही आहेच .. 

पण तरीही डॉ. आगाशेंचं कॅरेक्टर, इरावती हर्षेंचं कॅरेक्टर ही अशी माणसं भवती आहेत.. 

सुमित्रा ताईंनी एकूण एक प्रसंग, एकूण एक व्यक्तिरेखा किती विचारपूर्वक निवडल्या आहेत, रंगवल्या आहेत हे पूर्ण चित्रपट पहाताना हजारो वेळा मनात येऊन गेलं माझ्या.. 

तो मुख्य भुमिकेतला निश .. त्यानेही उत्तम काम केलंय.. ,

एकच वाटलं अशा प्रकारच्या विषयांवरचे चित्रपट हे आता फार 'प्रेडीक्टेबल' झालेले आहेत, अर्थात त्यात वेगळेपण कसं आणायचं हे ही सांगणं जरा अवघडच आहे ! 

असो .. सुमित्रा ताईंचं यानिमित्ताने वेळोवेळी स्मरण होतच राहील यात शंका नाही .. त्या ग्रेटच होत्या हेच खरं .. !

- मोहिनी घारपुरे-देशमुख

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

Table number 21 #moviereview


नावावरूनच काहीतरी वेगळं वाटलं म्हणून हा चित्रपट नुकताच पाहिला ( झी५, यूट्यूबवर आहे) आणि सुरूवातीला काहीतरी पांचट, बोअरिंग वाटलेला हा चित्रपट शेवटी जो महत्वाचा संदेश देऊन जातो त्यामुळे हा चित्रपट एक ' जनहितार्थ ' मस्ट वॉच चित्रपट ठरतो म्हणून यावर ही पोस्ट लिहावीशी वाटली.
कॉलेजमध्ये गमतीच्या नावाखाली होणाऱ्या रॅगिंग प्रकारात आजवर किती कोवळ्या जीवांची आयुष्य बेचिराख झाली आहेत हा विषय घेऊन एका वेगळ्या पद्धतीने मांडणी करत हा चित्रपट बनवला गेला आहे.
सुरुवातीला आपल्याला मुख्य विषयाचा कोणताच संदर्भ लागत नाही त्यामुळे कथानक कळत नाही आणि इरिटेटींग वाटायला लागतं. पण चित्रपटाच्या शेवटी जेव्हा मुख्य कारण आणि मुख्य कथानक उलगडतं तेव्हा आपल्याला राग, दुःख, चीड, संताप आणि अगतिकता या साऱ्या भावना देऊन हा चित्रपट संपतो.
आज आपल्या देशात रॅगिंगमुळे किती तरूण तरूणी आत्महत्येस प्रवृत्त झाले, किती जण मानसिक रित्या कायमचे खचले, किती जणांची आयुष्य उध्वस्त झाली याची खरीखुरी आकडेवारी, बातम्यांची जुनी कात्रणं चित्रपटाच्या शेवटी दाखवली आहेत ती वाचताना अंगावर सर्रकन काटा आल्यावाचून रहात नाही.
खरंतर नुकतीच ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगची घटना ताजी असताना आणि सोशल मीडियातुन त्यासंदर्भातील व्हिडिओ बघण्यात आल्याने हा चित्रपट पहाताना आणखीनच अंगावर आला.
विकृत पद्धतीने आपल्या समवयीन मुलामुलींचा असा छळ करणाऱ्या आणि त्याला ' गंमत ' ' मजा ' या गोड नावाखाली दडपणाऱ्या ज्या कोणाच्या घाणेरड्या डोक्यात ही कीड सर्वप्रथम आली असेल त्याला अक्षरशः शोधून जबर शिक्षा व्हायला हवी होती असा विचार कित्येकदा मनात आला, पण हद्द म्हणजे हे असले प्रकार थांबण्याऐवजी काळाच्या ओघात किती वाढत गेले आहेत हे लक्षात आल्याने आतातरी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन अशा ' उपद्रवी आणि उपद्व्यापी ' तरूण घोळक्यांच्या आणि विकृत डोक्याच्या तरूण तरूणींना वेळीच चांगलंच आवरलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक लक्षं ठेऊन त्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे ही काळाची गरज आहे.
तर, एक वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट नक्कीच एकदा पहावा आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा असे जाताजाता सांगावेसे वाटते.

- मोहिनी घारपुरे देशमुख

मंगळवार, १६ मे, २०२३

Sex Life - A webseries on Netflix

नेटफ्लिक्सवरची सेक्स लाईफ नावाची वेबसिरीज नुकतीच पाहून संपवली. आता तुम्ही म्हणाल कसलं काय पहाते ही बाई ...पण खरंच सांगते, तुम्हाला वाटतं तसलं काही (म्हणजे, तसलं काही जरी प्रचंड प्रमाणात दाखवलं असलं तरीही ) ते तसं यात नाही. 

मग यात  नेमकं आहे तरी काय असा प्रश्न अर्थातच तुम्हाला पडला असेल. तर ... सांगते, सगळं सांगते... पण अट एकच विषय गंभीर आहे, खोल आहे त्यामुळे वरवर वाचून सोडून द्यायचा नाही आणि दुसरं म्हणजे लिहिणारीबद्दल मनात कोणतेही गैरसमज बाळगायचे नाहीत. ही अट मान्य असेल तरच पुढे वाचायला लागा ... मी तर म्हणेन ... एकदा वाचाच आणि ही वेबसिरीज पहाच म्हणजे डोळे उघडतील आणि न बोलण्याच्या विषयाबद्दल तुम्ही मोकळे व्हाल. मोकळं होणं म्हणजे अश्लील, उथळ होणं नव्हे बरं का, तर, मनापासून व्यक्त होणं, मग भले माध्यम कोणतंही असो... 

तर, ही वेबसिरीज अशीच... मोकळीचाकळी ... खुल्लम्खुल्ला ... 

तरीही यात आपल्याला अश्लीलता सापडत नाही. काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवयलंय असं कुठेही अजिबात वाटत नाही. आपण नग्न शरीरं आणि त्यांचे लैंगिक व्यवहार जरी स्क्रीनवर पहात असलो तरीही त्यात आपण अडकत नाही तर त्याच्याही पुढे जाऊन त्या त्या नात्यातली सुंदर भावनिक गुंतागुंत आपल्याला दिसू लागते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी जोडपी दिसतात तसंच त्याउलट अगदी चटकन् एकमेकांकडे तशा दृष्टीने आकर्षित होऊन एकमेकांबरोबर एका रात्रीपुरता लैंगिक व्यवहार करणारीही जोडपी दिसतात. आपण हे सगळं पहातो, तरीही यापलिकडली गोष्ट आपल्याला जास्त जास्त गुंतवून ठेवण्यात यशस्वी होते. 

तर कथानक थोडक्यात असं- 

एक बिली नावाची स्त्री, हुशार, अभ्यासू, एक्स्पेरिमेंटल आणि स्वतःच्या भावनांशी अत्यंत प्रामाणिक. 

तिचा नवरा कूपर ... जो ्अत्यंत टिपिकल नवरा आहे. ज्याने कधीच चाकोरीबाहेरचं काहीच जणू केलेलं नाही. शांत, सुस्वभावी, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा, आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा आणि उत्तम करिअर करणारा ग्रेट नवरा. 

या जोडप्याला दोन मुलं होतात आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मापासून खरी कथा सुरू होते. कारण, बिलीला नवऱ्याकडून जशा प्रकारच्या शरीरसंबंधांची अपेक्षा असते तसलं एक्सायटींग असं त्यांचं सेक्स लाईफ नसतं, आणि बिलीला राहून राहून त्याचा मनापासून त्रास होत असतो. कूपर परफेक्ट नवरा असतो, आणि कदाचित एखाद्या सामान्य स्त्री साठी परफेक्ट सेक्स पार्टनरही असू शकतो, पण बिली तशी नसते ना...

बिलीच्या पूर्वायुष्यात ब्रॅड नावाचा तिचा बॉयफ्रेंड ... ज्याने तिला हवा तसा लैंगिक आनंद दिलेला असतो, त्या ब्रॅडची आठवण आता बिलीला  दिवसेंदिवस अनावर व्हायला लागते. करिअर संसार यात गुरफटलेला कूपर खूप चांगला माणूस असला तरीही तिला ब्रॅडने दिलेल्या लैंगिक सुखाची सतत आठवण येत असते. म्हणून मग बिली एक दिवशी तिच्या लॅपटॉपमध्ये तिच्या मनातली ही घुसमट लिहीते... आणि तिथून कथानकाला वेगळीच कलाटणी मिळते. 

ती काय कशी आणि पुढे कसं कथानक वळतं हे सगळं सविस्तर लिहीण्यापेक्षा तुम्ही ही वेबसिरीज दोन्ही सिझन जरूर पहावे असं मला वाटतं.

सगळ्यात महत्त्वाचं मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की आपल्याकडेच काय तर एकंदरीतच लग्न ठरवताना मुलात आणि मुलीत ते इन्स्टिंक्ट आहे की नाही याचा विचार करण्याचा अवधीच दिला जात नाही. आजच्या काळातही त्यासाठी मुलामुलींना एकमेकांबरोबर वेळ घालवावा याकरिता परवानगी मिळवावी लागते. पण ज्या कारणासाठी विवाह करायचा, त्याचा पायाच अनेक जोडप्यांमध्ये कुटुंबाच्या दबावामुळे मिसिंग रहातो आणि तो पुढे जन्मभर मिसिंग रहातो, याबद्दल कोणालाच फार विशेष लक्ष घालून ही व्यवस्था बदलावीशी वाटलेली नाही हे खरंतर मला विशेष वाटतं. 

बिली एक स्वतंत्र स्त्री असते. तिच्या आवडीचा पुरूष जोवर तिला मिळत नाही तोवर ती ज्या ज्या प्रकारे आपलं आयुष्य पुढे नेत रहाते, भावनिक गुंतागुंत न करता, ते पहाणं फार सुखद अनुभव आहे. आपल्याकडे अशा स्त्रीला कधीच बाहेरख्याली, उथळ आणि अशी अन्य नाही नाही ती विशेषणं देऊन समाजाने चोची मारून मारून बेजार केलं असतं. ही बिली मात्र खरंच तशी नाही. ती विचारी स्त्री आहे आणि स्वतःचं आयुष्य स्वतःचे निर्णय घेऊन चुका करत करत शिकत ती पुढे जातेय. 

एकीकडे ब्रॅडसारखा उथळ, तिच्यावर प्रेम असूनही जबाबदारी टाळणारा पुरूष आणि दुसरीकडे कूपरसारखा अतिशय जबाबदार प्रेमळ नवरा अशी दोन टोकं थेट समोर असताना कोणीही स्त्री साहजिकपणे कूपरसारखाच जोडीदार निवडेल. पण बिली मात्र तशी नाही. तिला समाजाची भीती नाही, तसंच तिला स्वतःच्या जगण्याचं खरं मोल कळतं. जीवन हे सुरक्षित चौकटीत नाही तर जीवन हे रसरसून जगण्यात आहे हे या बिलीला नीट उमगलं आहे. म्हणूनच तर तिची घालमेल होते. एका चौकटीत बंद राहून जगण्याचा प्रयत्न करूनही ती त्यात अयशस्वी होते. किंबहुना कूपरलाच त्याचा जीवन जगताना स्वतःहून घेतलेला खोटा बुरखा, नकली मुखवटा एका क्षणी असह्य होतो. कोणी म्हणेल, बिलीच्या नादी लागून कूपरही वाया गेला... क्षणभर आपल्याला तसंही वाटून जातं. पण नाही, कूपरही खरंतर रसरसून आयुष्य जगायला लागतो. आणि ब्रॅड ... त्याचा  प्रवास विरूद्ध दिशेनी ... म्हणजे काय नात्यांमधल्या भावनिक व्यवहारात सपशेल धप्पी खात खात एक दिवस त्याचं त्याला जाणवतं की आपण किती चुकतोय. नात्यामध्ये प्रेम असणं आणि शरीरसंबंध ठेवत नाती जपणं यापलिकडे, जबाबदारीने ते नातं सांभाळण्यात  किती गोडवा आहे हे त्याला उमगतं आणि तो बदलतो..

तर अशी ही सेक्स लाईफ ...

खरंय, दोन माणसं जवळ येऊन कुटुंब तयार करू शकतात. त्या कुटुंबाचा पाया प्रत्येक जोडप्याचा वेगवेगळा असतो. म्हणजे कोणा दोन व्यक्तींना प्रेम महत्त्वाचं वाटेल, कोणा दोघांना सुरक्षितता महत्त्वाची वाटेल, कुणा दोघांना आर्थिक आधार महत्त्वाचा वाटेल ... पण जर लग्न करून कुटुंब तयार होत असेल तर त्याचा पाया शरीरसुख असला पाहिजे. कारण, ज्या नात्यात हे सुख मिळत नाही अशी लग्न मग हलकेच काळाच्या ओघात करपून जातात. अशा कुटुंबात फक्त तक्रारीचा सूर उरतो आणि कालांतराने अशी जोडपी एकमेकांपासून दूरावतात. एकाच नावेत बसून अशी अस्वस्थ रहात जीवन कंठणारी अनेक जोडपी मी पाहिली आहेत. 

लैंगिक सुख मिळवण्यासाठी आपल्याकडे केवळ विवाह हीच सर्वमान्य रीत आहे. त्यामुळे मी इथे विवाहसंस्थेविषयी लिहीलं आहे. परदेशात मात्र तसं नाही. तिथली जोडपी आपल्या लैंगिक सुखासाठी अनेक पर्याय वापरतात. तेसुद्धा या वेबसिरीजमध्ये अतिशय खूबीने कथानकाच्या निरनिराळ्या आयामांमधून दाखवलेलं आहे. आपल्याकडे असं वर्तन कोणी केलं तर समाज अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडेल, त्यांना वाळीत टाकेल, जगणं असह्य करेल. 

दोन व्यक्तींच्या खाजगी सुखात खरंतर समाजाचा काय आणि कसा संबंध येतो हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. पूर्वी तरी अनौरस संततीच्या दृष्टीने समाजाचा वचक अशा नात्यांवर असणं एकवेळ मान्य होतं, पण आताच्या काळात जिथे संतती नियमनाची साधनं सुरक्षितरित्या वापरू शकत असताना खरोखरच सेक्स लाईफबद्दल थोडंसं मोकळं वातावरण निर्माण व्हायला काय हरकत आहे. पण अर्थातच यात अनेक धोके आहेत. अनेक मुली मुलं फसवली जाऊ शकतात त्यामुळे काळजी घेणं हेच बेहतर ...

पण, समजा असेल एखादी स्त्री बिलीसारखी रसरसून जगणारी ... तर ? 

स्वतःवर प्रेम करणारी, स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक असणारी ?

तिलाही हा समाज विकृतपणेच बघेल का... आजच्या काळातही ?

कुणास ठाऊक !!!

या लेखानंतर तरी अशी एखादी बिली तुम्हाला भेटली तर तिच्यातला आणि एखाद्या उथळ बाईतला हा फरक निदान तुम्ही तरी ओळखू शकाल हीच आशा आहे...

- मोहिनी घारपुरे - देशमुख 




मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

शेवग्याचं सूप - अगदी झटपट होणारी सोप्पी पाककृती.

Drumstick's Soup -

A very tasty, healthy and quick recipe !
Try it out and let me know your valuale comments ...

साहित्य (Ingredients) -

Drumsticks, ginger, garlic, green chilly, small piece of onion, cornflour, salt, cinnamon or cinnamon powder, dry ginger powder, black paper powder

शेवग्याच्या दोन मोठ्या शेंगा, चार पाच पाकळ्या लसूण, अर्धा किंवा त्यापेक्षाही कमी कांदा, आलं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, मिरचीचे तुकडे, कॉर्नफ्लोअर, मीठ, दालचिनी किंवा दालचिनी पावडर, सुंठ पावडर, काळी मिरी किंवा मिरपूड.



कृती (Process) -

1. शेवग्याच्या शेंगांचे बोटाच्या उंचीएवढे तुकडे करून घ्या. तुकडे करताना जेवढं साल निघेल तेवढं काढून टाका.

Cut the Drumstick pods into finger-sized pieces. Remove as much peel as you can while cutting.

2. कुकरच्या भांड्यात या शेंगा आणि त्यासह कांदा, लसूण आणि आलं एकत्र मस्त उकडवून घ्या.

Boil these pieces along with onion, ginger and garlic in a cooker pot. 

3. उकडल्यावर थोडा वेळ गार करत ठेवा. आता याच पाण्यात अक्षरशः हाताने सगळ्या उकडलेल्या जिन्नसांचा गर एकत्रित काढून घ्या. सगळा गर निघाला पाहिजे.

After boiling, keep it cool for a while. Now remove all the boiled elements together in this water literally by hand. All the pulp should be removed.

4. आता उरलेल्या चोथ्यात पुन्हा थोडेसे पाणी घालून उरलेला गरही नीट काढून घ्या.

Now, add some water into the remaining pulp and remove it thouroughly !

5. हे सगळं पाणी आता चाळणीतून चाळून घ्या आणि गॅसवर उकळायला ठेवा.

Now strain all this water through a sieve and keep it for boiling on the gas.
 
6. या पाण्यात तुमच्या आवडीनुसार म्हणजे जितका दाटपणा हवा त्यानुसार कॉर्नफ्लोअरची स्लरी घाला.

Add cornflour slurry to this water as per the requirment. 

7. आता यात चवीनुसार मीठ, मिरचीचे तुकडे, दालचिनी पावडर किंवा तुकडा, काळी मिरी किंवा मिरपूड आणि सुंठ पावडर घाला. छान उकळू द्या.

Now add blackpaper, cinnamon and dry ginger powder to this and let it boil for some time. 

8. उकळत आल्यावर वरून मस्त तुप, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी घाला.

When it boils, add ghee, cumin seeds, asafoetida and curry leaves tadka to it. 

9. स्वादानुसार वरून कोथिंबीर भुरभुरवा.

Now put off the gas and add coriender leaves as per your liking. 
  
10. टेस्टी टेस्टी शेवगा सूप गरम गरम प्या.

Testy yummy soup is ready, have it now ! 

अतिशय पौष्टीक असं हे सूप, जरूर करून पहा. 
आवडत असल्यास एखादा टोमॅटोही घालू शकता. 
Try this soup once and let me know your valuable comments. You can add tomato pieces too if you like them !

- मोहिनी
Mohinee Gharpure 
mohineeg@gmail.com 

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

प्रोजेक्ट दोस्ती - Day 1 (Reportage)


व्यसनमुक्तीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. याचं कारण अगदी लहानपणापासून मला या सामाजिक समस्येची अनेक उदाहरणं माझ्या अवतीभवती बघायला मिळालीत. गेली दहा एक वर्ष या विषयाबाबत बरचसं वाचनही झालंय. 
एखाद्या चांगल्या खाऊनपिऊन सुखी कुटुंबातला मुलगा अचानक वाईट संगतीला लागतो काय आणि बघता बघता पुढे एक एक व्यसनं करत अक्षरशः भीकेला लागतो काय अशा अनेक सत्यकथा विविध माध्यमांतून जेव्हा जेव्हा ऐकल्या, पाहिल्या तेव्हा या प्रश्नाचं गांभीर्य अधिकअधिक कळत गेलं आणि या क्षेत्रात आपणही आपल्या परीने काही ना काही काम करावं ही इच्छा मनात सातत्याने निर्माण होऊ लागली. 
मुक्ता चैतन्य ताईबरोबर काम करताना पुण्यातील चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटरच्या वतीने व्यसनांचा विळखा या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रीयेत माझाही थोडाफार हातभार लागला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते असलेले श्री तुषार नातू सरांच्या जीवनाची गाथा वाचनात आली. त्यांच्या जीवनाची 'नशायात्रा' जेव्हा वाचली तेव्हा तर या प्रश्नाचं गांभीर्य अधिक लक्षात आलं. त्यानंतर या समस्येविषयी ब्लॉगवर, सोशल मीडियावर लिखाण केलं. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या शिरीष कुलकर्णी सरांनी दिलेल्या संधीमुळे मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, तर ब्राह्मण उद्योगब्रह्म या ग्रुपतर्फे तुषार नातू सरांचीही मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली. 
जितकी जास्त वाचत गेले, बोलत गेले तितकं तितकं या प्रश्नाचं गांभीर्य मला अधिक अधिक जाणवत गेलं. 
म्हणूनच, नुकतंच मुक्ता ताईंची फेसबुक पोस्ट पाहिली आणि तीन दिवसीय प्रोजेक्ट दोस्ती या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सहभागी झाले. या कार्यशाळेचा रिपोर्ताज खास तुम्हा वाचकांसाठी येथे देत आहे. तुम्हाला कदाचित याचा उपयोग होईल. तसंच जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात या समस्येशी झगडत असाल आणि तुम्हाला मन मोकळेपणी बोलायचं असेल, तुमचा प्रश्न समाजमाध्यमांवर कोणीतरी मांडावा, लिहावा किंवा तुम्हाला लोकांसमोर येऊन त्याविषयी बोलायचं असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा. आपण मुलाखत, ब्लॉग, फेसबुक पोस्ट यापैकी कोणत्याही एका माध्यमातून तुमच्या समस्येला वाट फोडू. त्याकरिता मी आपल्याला सहकार्य करेन. 
धन्यवाद 
मोहिनी 
....................

काल पहिल्या दिवशी दोन सत्र झाली. यामध्ये पहिलं सत्र 'मुक्ता पुणतांबेकर' यांचं झालं. त्यांचा विषय होता, ' Trends in Addiction ' 
याविषयी बोलताना मुक्ताताईंनी अगदी सविस्तर आणि छान समजावून सांगितले. व्यसनांबाबतचे समज आणि गैरसमज, व्यसनी व्यक्तीची त्यामागची भूमिका, नव्या काळातील नवी व्यसनं कोणती, त्याबाबत वाटणारं आकर्षण, व्यसनांच्या बाबतीत कुटुंबाची भूमिका या साऱ्या मुद्यांवर त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. 













यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 'श्री. चैतन्य वेंगुर्लेकर' यांनी 'Disease concept' याविषयी मार्गदर्शन केलं.
व्यसनाकडे पूर्वी केवळ वाईट सवय म्हणून पाहिलं जात असे. परंतु गेल्या काही वर्षात वैद्यकीय संशोधनांती व्यसनांना मनोशारिरीक आजार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, आणि म्हणूनच आता व्यसनांकडे बघण्याचा आपलाही दृष्टीकोन बदलावा व आपण आपल्या घरातील व्यसनी व्यक्तीबद्दल अधिक सजग व संवेदनशील व्हावे हे या सत्रात चैतन्य यांनी अधिक स्पष्ट केले. व्यसनाधीनता हा आजार का आणि कसा आहे, त्याची लक्षणं काय, त्याचे परिणाम काय आणि त्याचा इलाज कसा करता येऊ शकतो यावर ते सविस्तर बोलले.









त्यांना मी जेव्हा हा प्रश्न केला की, 
'व्यसनांचे एवढे प्रचंड दुष्परिणाम जीवनावर दिसत असतात तरीही व्यसनी माणूस व्यसन का सोडत नाही ? उपचार घ्यायला तयार का होत नाही? ' यावर चैतन्य सरांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आणि चिंतनशील आहे. 

ते म्हणाले, ' या आजाराला मुळातच ' Desease of Denial ' असे जाहीर करण्यात आलेले आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनी माणसाला व्यसनातून मिळत असलेल्या आनंदातच रहाणं अधिक आवडत असतं, आणि म्हणूनच तो त्यापासून होणाऱ्या इतर कोणत्याही परिणामांची काळजी करत नाही.'
 
मला वाटतं, 'या आजाराची हीच तर मेख आहे ... !'

जेव्हा आपल्याला ही मेख लक्षात येईल तेव्हा आपल्यासाठी आपल्या कुटुंबातील वा ओळखीच्यांपैकी जर कोणी व्यसनी असेल तर त्याला कसं हँडल करायचं आणि त्याला व्यसनमुक्तीची योग्य ट्रीटमेंट घेण्यापर्यंत कसं न्यायचं हे लक्षात येईल. 
व्यसनी माणसांच्या नावानी बोटं मोडण्यापेक्षा, आपण त्यांना मदत करूया, किमान त्यांच्या जीवनाची वाताहत लागेपर्यंत गप्प बसण्यापेक्षा, आपण वेळीच त्यांच्यासाठी पुढे येऊया, एवढा सामाजिक बदल आपण मिळून करणं हेच नव्या काळात  फार महत्त्वाचं ठरेल, असं मला कालच्या सत्रानंतर वाटून गेलं.

बघूया, आता आजच्या सत्रात काय शिकायला मिळेल मला ? 😊😊😊😊😊

तोवर बाय बाय

- मोहिनी घारपुरे - देशमुख 
mohineeg@gmail.com



सोमवार, ३ एप्रिल, २०२३

"रस्त्यावरील विक्रेत्यांशी व छोट्या उद्योजकांशी संवाद (A dialogue with Streetpreneurs)"


नमस्कार मित्रांनो, 

आपल्याला नेहमीच रस्त्यावरील विक्रेते किंवा लघुउद्योजक हे सहज उपलब्ध असतात. आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी खरंतर आपण याच लहान सहान विक्रेत्यांवर अवलंबून असतो. चटकन दुकानात जाऊन किंवा कोपऱ्यावरच्या टपरीवरून, विक्रेत्याजवळून आपण आपल्याला हवं ते सामान विकत घेतो आणि आपल्या कामाला लागतो. 

निश्चितच हे उद्योजक आपल्यालेखी फार मोठे नसतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्यात काहीच रसही वाटत नाही. परंतु, या उद्योजकांचं जीवन मोठं कठीण, कारण हातावरचं पोट असल्याने त्यांना दिवसरात्र मेहनत तर करावीच लागते तसंच कोणावरही अवलंबूनही रहाता येत नाही. स्वतःच्या कष्टातून हे लोक आपल्या कुटुंबाला घडवतात, पोसतात, आपल्या मुलांना शिक्षण देतात, नोकरी व्यवसायाला लावून देतात तरीही यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. 

उन्हातान्हात पावसापाण्यात वा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीतही हे पुन्हा पुन्हा उभे रहातात. म्हणूनच, मी प्रयत्न केला माझ्या परिसरातील काही स्ट्रीटप्रिन्युअर्स अर्थात्, रस्त्यावरील विक्रेत्यांशी संवाद साधण्याचा आणि त्यातून जन्माला आली ही सिरीज ... 

यातला पहिला video पहा या लिंकवर क्लिक करून - https://youtu.be/iqZT9Hyh4JQ

आपल्याला आवडल्यास मला नक्की कमेंट करून कळवा. 
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. 

धन्यवाद - मोहिनी घारपुरे - देशमुख




गुरुवार, ३० मार्च, २०२३

रामनवमी गानसेवा - मोहिनी अंताक्षरी व्हॉट्सअॅप ग्रुप

     नमस्कार मित्रांनो,

आज रामनवमीनिमित्त आम्ही सादर करत आहोत रामाची काही गाणी. मला खात्री आहे आपल्याला हा व्हिडीओ नक्की आवडेल.
तसंच, तुम्हालाही तुमचं आवडतं श्रीरामाचं गाणं कोणतंय ते आम्हाला शेअर करायला आवडत असेल तर जरूर खाली कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा.
धन्यवाद
मोहिनी घारपुरे देशमुख

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा -

video link -




शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

वेबसिरीज का 'नंगानाच'


वेबसिरीजचा जमाना सुरू झाला तशी भरपूर वेबसिरीज निरनिराळ्या प्लँटफॉर्म्सवरून पाहून झाल्या. मात्र अलीकडे या वेबसिरीज्सचा एकंदरीतच मला उबग यायला लागला आहे. मुख्य विषय इतके चांगले असले तरीही त्यात दाखवलेल्या बटबटीत अशा सेक्सच्या दृश्यांनी आणि सतत वाक्यावाक्याला पेरलेल्या 'फ**'च्या शब्दांनी अक्षरशः किळस यायला लागली आहे. 

बरं,इथे  पात्रांच्या वयोमर्यादेचंही बंधन उरलेलं नाही, म्हणजे काय, अगदी कोवळ्या वयातले तरूण तरूणीही हीच भाषा बोलतात आणि पडद्यासमोर सहज निर्वस्त्र होताना, किसिंग सीन्स देतानाही यांना जणू काहीच वाटत नाही इतके हे सराईत वावरतात. दोष यांचा नाही, तर एकंदरीतच या इंडस्ट्रीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बटबटीतपणाचा आहे हेच खरं ! 

हे 'असं' कंटेंट जास्त विकलं जातं , जास्त पाहिलं जातं या सबबीखाली प्रत्येक वेबसिरीजमध्ये बेसुमार 'तसलं' कंटेंट घातलं जातंय. 

मध्यंतरी ती एक वेबसिरीज आली होती, 'She' नावाची ... त्यातलं तर दृश्य पाहतांना त्यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या मुलीची अक्षरशः कीव आणि राग आला. पडद्यावर घाणेरड्या शब्दात तिच्या योनीबद्दल बोललं गेलं आणि अक्षरशः नायकाने तिला त्या जागी स्पर्श केला, तिच्यावर रेप सुद्धा पुढे कथानकाच्या ओघात झाला. 

कालच नेटफ्लिक्सवर 'Class' नावाची वेबसिरीज पाहिली, त्यातही सगळं हेच कंटेंट ! विविध पात्रांचे एकमेकांशी निरनिराळ्या हेतूने असलेले शारिरीक संबंध, त्यात आता भरीस भर म्हणून गे आणि लेस्बियन कम्युनिटीतील किमान एखादं तरी पात्र हे वेबसिरीज वाले आपल्या वेबसिरीज मध्ये अक्षरशः घुसवतातच ! मुख्य कथानकात ज्याची खरंतर काहीच गरज नाहीये तरीही समाजाला या लोकांप्रती सहिष्णू बनवण्याचा उदात्त हेतू आपला असल्या चे कारणही हे कंटेंट बनवणारे देतात तेव्हा राग येतो, कारण सतत हे पडद्यावर दाखवण्याने समाज बदलणार नाही, तर त्यासाठी काहीतरी नीट, लोकांना या कम्युनिटीबद्दल 'समजेल' असं कंटेंट जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने मनापासून बनवायला हवं. नुसतंच त्यांचे शारिरीक संबंध पडद्यावर सतत दाखवून उलट किळसच अधिक निर्माण होते हे वास्तव आहे. 

मुळात, वेबसिरीजच्या कंटेंट वर कोणाचाही चाप नाही हे खरंतर अडव्हान्टेज मिळालेलं असताना इतकं सतत बटबटीत , घाणेरडं कंटेंट तिथे बनवलं जातंय हे दुर्दैव आहे. यापेक्षा अनेक चांगले विषय चांगल्या पद्धतीने एखादा हुशार दिग्दर्शक मांडू शकतो, पण तेवढा वेळ कोणालाय ना ? 

शिवाय या सगळ्या कंटेंटचा ग्राहक आज आपण आणि आपली निरनिराळ्या वयोगटातील मुलंमुलीही आहेत, हे सगळं पाहून एक 'चेकाळलेला' 'उत्तान' समाज म्हणून तर ते पुढे घडणार नाहीत ना याचा विचार करून मनाला अत्यंत यातना होतात. 

काही काळापूर्वी 'पॉर्न' पुरतं मर्यादित असलेलं हे कंटेंट आता घरोघरी 'वेबसिरीज' च्या माध्यमातून पोचतंय आणि म्हणूनच आपण या सगळ्या कंटेंटबद्दल आता तरी सावध होऊन विरोध करायला हवाय असं माझं वैयक्तिक मत आहे !

- मोहिनी घारपुरे देशमुख


#मीडिया #जबाबदारी #बदल #योग्य_विरोध

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

Have you purchased these Books from Amazon for your kids?

 Dear Friends,

When I was searching books for my kids on amazon, I found these Good Books there in very low cost. As being the amazon associate, I am sharing the links of these books which I found interesting, below - 

If you want to purchase any of them, please use the links given below by clicking on it !

Thank you 

Mohinee

1) Princesses - Coloring and Sticker Activity Book (With 150+ Stickers) (Coloring Sticker Activity Books)

https://amzn.to/40gZUYf

2) Grandma's Bag of Stories: Collection of 20+ Illustrated short stories, traditional Indian folk tales for all ages for children of all ages by Sudha Murty [Paperback] Sudha Murty 

https://amzn.to/3WYQKN4

3) Paddington Hardcover – Picture Book, 26 June 2007

https://amzn.to/3HMayyQ

4) The Girl Who Drank the Moon Paperback – 24 August 2017

https://amzn.to/3wLsRhy

5) बडबडगीते आणि बालकथा


सोमवार, १६ जानेवारी, २०२३

Get featured on my Blog


My Dear Readers,

I am writing this to all of you. 

I am opening my blog for you.

If you have a story to tell, any experience to share, or anything which you want to tell people through social media and perticularly through a blog, then I am opening this opportunity to You.

Please comment below and share your requirements and we can go hand in hand. 

What you can do on my blog - 

1. Product display with Blogpost

2. Art display with blogpost 

3.share your experience with me and I will write for you.

4.Get interviewed and get a blogpost of it 

5. Blogpost about your business

6. Blogpost about your any activity 

7. And any other option which is relavent to above all, can be mutually brainstorm. 

So, if you are interested in any of the above option, and want to know more, please comment below and share your contact details and I will get back to you ASAP. 

(Charges for writing and blogposting is applicable

Thank you

Mohinee 

mohineeg@gmail.com 



Translate

Featured Post

अमलताश