मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

शेवग्याचं सूप - अगदी झटपट होणारी सोप्पी पाककृती.

Drumstick's Soup -

A very tasty, healthy and quick recipe !
Try it out and let me know your valuale comments ...

साहित्य (Ingredients) -

Drumsticks, ginger, garlic, green chilly, small piece of onion, cornflour, salt, cinnamon or cinnamon powder, dry ginger powder, black paper powder

शेवग्याच्या दोन मोठ्या शेंगा, चार पाच पाकळ्या लसूण, अर्धा किंवा त्यापेक्षाही कमी कांदा, आलं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, मिरचीचे तुकडे, कॉर्नफ्लोअर, मीठ, दालचिनी किंवा दालचिनी पावडर, सुंठ पावडर, काळी मिरी किंवा मिरपूड.



कृती (Process) -

1. शेवग्याच्या शेंगांचे बोटाच्या उंचीएवढे तुकडे करून घ्या. तुकडे करताना जेवढं साल निघेल तेवढं काढून टाका.

Cut the Drumstick pods into finger-sized pieces. Remove as much peel as you can while cutting.

2. कुकरच्या भांड्यात या शेंगा आणि त्यासह कांदा, लसूण आणि आलं एकत्र मस्त उकडवून घ्या.

Boil these pieces along with onion, ginger and garlic in a cooker pot. 

3. उकडल्यावर थोडा वेळ गार करत ठेवा. आता याच पाण्यात अक्षरशः हाताने सगळ्या उकडलेल्या जिन्नसांचा गर एकत्रित काढून घ्या. सगळा गर निघाला पाहिजे.

After boiling, keep it cool for a while. Now remove all the boiled elements together in this water literally by hand. All the pulp should be removed.

4. आता उरलेल्या चोथ्यात पुन्हा थोडेसे पाणी घालून उरलेला गरही नीट काढून घ्या.

Now, add some water into the remaining pulp and remove it thouroughly !

5. हे सगळं पाणी आता चाळणीतून चाळून घ्या आणि गॅसवर उकळायला ठेवा.

Now strain all this water through a sieve and keep it for boiling on the gas.
 
6. या पाण्यात तुमच्या आवडीनुसार म्हणजे जितका दाटपणा हवा त्यानुसार कॉर्नफ्लोअरची स्लरी घाला.

Add cornflour slurry to this water as per the requirment. 

7. आता यात चवीनुसार मीठ, मिरचीचे तुकडे, दालचिनी पावडर किंवा तुकडा, काळी मिरी किंवा मिरपूड आणि सुंठ पावडर घाला. छान उकळू द्या.

Now add blackpaper, cinnamon and dry ginger powder to this and let it boil for some time. 

8. उकळत आल्यावर वरून मस्त तुप, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी घाला.

When it boils, add ghee, cumin seeds, asafoetida and curry leaves tadka to it. 

9. स्वादानुसार वरून कोथिंबीर भुरभुरवा.

Now put off the gas and add coriender leaves as per your liking. 
  
10. टेस्टी टेस्टी शेवगा सूप गरम गरम प्या.

Testy yummy soup is ready, have it now ! 

अतिशय पौष्टीक असं हे सूप, जरूर करून पहा. 
आवडत असल्यास एखादा टोमॅटोही घालू शकता. 
Try this soup once and let me know your valuable comments. You can add tomato pieces too if you like them !

- मोहिनी
Mohinee Gharpure 
mohineeg@gmail.com 

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

प्रोजेक्ट दोस्ती - Day 1 (Reportage)


व्यसनमुक्तीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. याचं कारण अगदी लहानपणापासून मला या सामाजिक समस्येची अनेक उदाहरणं माझ्या अवतीभवती बघायला मिळालीत. गेली दहा एक वर्ष या विषयाबाबत बरचसं वाचनही झालंय. 
एखाद्या चांगल्या खाऊनपिऊन सुखी कुटुंबातला मुलगा अचानक वाईट संगतीला लागतो काय आणि बघता बघता पुढे एक एक व्यसनं करत अक्षरशः भीकेला लागतो काय अशा अनेक सत्यकथा विविध माध्यमांतून जेव्हा जेव्हा ऐकल्या, पाहिल्या तेव्हा या प्रश्नाचं गांभीर्य अधिकअधिक कळत गेलं आणि या क्षेत्रात आपणही आपल्या परीने काही ना काही काम करावं ही इच्छा मनात सातत्याने निर्माण होऊ लागली. 
मुक्ता चैतन्य ताईबरोबर काम करताना पुण्यातील चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटरच्या वतीने व्यसनांचा विळखा या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रीयेत माझाही थोडाफार हातभार लागला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते असलेले श्री तुषार नातू सरांच्या जीवनाची गाथा वाचनात आली. त्यांच्या जीवनाची 'नशायात्रा' जेव्हा वाचली तेव्हा तर या प्रश्नाचं गांभीर्य अधिक लक्षात आलं. त्यानंतर या समस्येविषयी ब्लॉगवर, सोशल मीडियावर लिखाण केलं. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या शिरीष कुलकर्णी सरांनी दिलेल्या संधीमुळे मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, तर ब्राह्मण उद्योगब्रह्म या ग्रुपतर्फे तुषार नातू सरांचीही मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली. 
जितकी जास्त वाचत गेले, बोलत गेले तितकं तितकं या प्रश्नाचं गांभीर्य मला अधिक अधिक जाणवत गेलं. 
म्हणूनच, नुकतंच मुक्ता ताईंची फेसबुक पोस्ट पाहिली आणि तीन दिवसीय प्रोजेक्ट दोस्ती या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सहभागी झाले. या कार्यशाळेचा रिपोर्ताज खास तुम्हा वाचकांसाठी येथे देत आहे. तुम्हाला कदाचित याचा उपयोग होईल. तसंच जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात या समस्येशी झगडत असाल आणि तुम्हाला मन मोकळेपणी बोलायचं असेल, तुमचा प्रश्न समाजमाध्यमांवर कोणीतरी मांडावा, लिहावा किंवा तुम्हाला लोकांसमोर येऊन त्याविषयी बोलायचं असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा. आपण मुलाखत, ब्लॉग, फेसबुक पोस्ट यापैकी कोणत्याही एका माध्यमातून तुमच्या समस्येला वाट फोडू. त्याकरिता मी आपल्याला सहकार्य करेन. 
धन्यवाद 
मोहिनी 
....................

काल पहिल्या दिवशी दोन सत्र झाली. यामध्ये पहिलं सत्र 'मुक्ता पुणतांबेकर' यांचं झालं. त्यांचा विषय होता, ' Trends in Addiction ' 
याविषयी बोलताना मुक्ताताईंनी अगदी सविस्तर आणि छान समजावून सांगितले. व्यसनांबाबतचे समज आणि गैरसमज, व्यसनी व्यक्तीची त्यामागची भूमिका, नव्या काळातील नवी व्यसनं कोणती, त्याबाबत वाटणारं आकर्षण, व्यसनांच्या बाबतीत कुटुंबाची भूमिका या साऱ्या मुद्यांवर त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. 













यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 'श्री. चैतन्य वेंगुर्लेकर' यांनी 'Disease concept' याविषयी मार्गदर्शन केलं.
व्यसनाकडे पूर्वी केवळ वाईट सवय म्हणून पाहिलं जात असे. परंतु गेल्या काही वर्षात वैद्यकीय संशोधनांती व्यसनांना मनोशारिरीक आजार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, आणि म्हणूनच आता व्यसनांकडे बघण्याचा आपलाही दृष्टीकोन बदलावा व आपण आपल्या घरातील व्यसनी व्यक्तीबद्दल अधिक सजग व संवेदनशील व्हावे हे या सत्रात चैतन्य यांनी अधिक स्पष्ट केले. व्यसनाधीनता हा आजार का आणि कसा आहे, त्याची लक्षणं काय, त्याचे परिणाम काय आणि त्याचा इलाज कसा करता येऊ शकतो यावर ते सविस्तर बोलले.









त्यांना मी जेव्हा हा प्रश्न केला की, 
'व्यसनांचे एवढे प्रचंड दुष्परिणाम जीवनावर दिसत असतात तरीही व्यसनी माणूस व्यसन का सोडत नाही ? उपचार घ्यायला तयार का होत नाही? ' यावर चैतन्य सरांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आणि चिंतनशील आहे. 

ते म्हणाले, ' या आजाराला मुळातच ' Desease of Denial ' असे जाहीर करण्यात आलेले आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनी माणसाला व्यसनातून मिळत असलेल्या आनंदातच रहाणं अधिक आवडत असतं, आणि म्हणूनच तो त्यापासून होणाऱ्या इतर कोणत्याही परिणामांची काळजी करत नाही.'
 
मला वाटतं, 'या आजाराची हीच तर मेख आहे ... !'

जेव्हा आपल्याला ही मेख लक्षात येईल तेव्हा आपल्यासाठी आपल्या कुटुंबातील वा ओळखीच्यांपैकी जर कोणी व्यसनी असेल तर त्याला कसं हँडल करायचं आणि त्याला व्यसनमुक्तीची योग्य ट्रीटमेंट घेण्यापर्यंत कसं न्यायचं हे लक्षात येईल. 
व्यसनी माणसांच्या नावानी बोटं मोडण्यापेक्षा, आपण त्यांना मदत करूया, किमान त्यांच्या जीवनाची वाताहत लागेपर्यंत गप्प बसण्यापेक्षा, आपण वेळीच त्यांच्यासाठी पुढे येऊया, एवढा सामाजिक बदल आपण मिळून करणं हेच नव्या काळात  फार महत्त्वाचं ठरेल, असं मला कालच्या सत्रानंतर वाटून गेलं.

बघूया, आता आजच्या सत्रात काय शिकायला मिळेल मला ? 😊😊😊😊😊

तोवर बाय बाय

- मोहिनी घारपुरे - देशमुख 
mohineeg@gmail.com



सोमवार, ३ एप्रिल, २०२३

"रस्त्यावरील विक्रेत्यांशी व छोट्या उद्योजकांशी संवाद (A dialogue with Streetpreneurs)"


नमस्कार मित्रांनो, 

आपल्याला नेहमीच रस्त्यावरील विक्रेते किंवा लघुउद्योजक हे सहज उपलब्ध असतात. आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी खरंतर आपण याच लहान सहान विक्रेत्यांवर अवलंबून असतो. चटकन दुकानात जाऊन किंवा कोपऱ्यावरच्या टपरीवरून, विक्रेत्याजवळून आपण आपल्याला हवं ते सामान विकत घेतो आणि आपल्या कामाला लागतो. 

निश्चितच हे उद्योजक आपल्यालेखी फार मोठे नसतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्यात काहीच रसही वाटत नाही. परंतु, या उद्योजकांचं जीवन मोठं कठीण, कारण हातावरचं पोट असल्याने त्यांना दिवसरात्र मेहनत तर करावीच लागते तसंच कोणावरही अवलंबूनही रहाता येत नाही. स्वतःच्या कष्टातून हे लोक आपल्या कुटुंबाला घडवतात, पोसतात, आपल्या मुलांना शिक्षण देतात, नोकरी व्यवसायाला लावून देतात तरीही यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. 

उन्हातान्हात पावसापाण्यात वा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीतही हे पुन्हा पुन्हा उभे रहातात. म्हणूनच, मी प्रयत्न केला माझ्या परिसरातील काही स्ट्रीटप्रिन्युअर्स अर्थात्, रस्त्यावरील विक्रेत्यांशी संवाद साधण्याचा आणि त्यातून जन्माला आली ही सिरीज ... 

यातला पहिला video पहा या लिंकवर क्लिक करून - https://youtu.be/iqZT9Hyh4JQ

आपल्याला आवडल्यास मला नक्की कमेंट करून कळवा. 
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. 

धन्यवाद - मोहिनी घारपुरे - देशमुख




Translate

Featured Post

अमलताश