संजीव कुमार, सारिका, शत्रुघ्न सिन्हा, रंजीता आणि मार्क झुबर अशी कलाकारांची फौज घेऊन 1986 साली कत्ल नावाचा एक क्राईम थ्रिलर हिंदी चित्रपटसृष्टीत आला.
कथानक नेहेमीचेच .. म्हणजे प्रेम, फसवणूक आणि गुन्हा .. पण ट्विस्ट होता, तो नायकाच्या पात्रात .. कारण नायक संजीव कुमार, नायिका सारिकाशी लग्न करतात आणि लग्नानंतर एका अपघातात त्यांचे डोळे जातात. ठार आंधळे झालेला नायक नायिकेला वाचवताना डोळे गमावतो.. त्याने तिचे जीवन तारलेले असते . नाहीतर फिल्म जगतात बडी स्टार होण्यापायी स्वतःच्या आयुष्याच्या तोल हरवून बसलेल्या नायिकेला रंजीत (मार्क झुबर) ने केव्हाच नादी लावलेले असते.. पण याची कल्पनाही भोळया नायकाला नसते. एक्टींग शिकवता शिकवता नायक नायिकेच्या प्रेमात पडतो, लग्न करतो, आणि पुढे अपघातात अंध होतो...

खरी स्टोरी सुरू होते ती इथून पुढे ..
नायक अंध झालेला त्यामुळे मुळातच छछोर असलेली नायिका रंजितच्या शब्दांना आणि अय्याशीला भूलून पुन्हा त्याच्या नादी लागते.. नवऱ्याला आपण थिएटर करणार नाही अशी भूलथाप देऊन त्याच्याच तोंडून आपण थिएटर पुन्हा करावं असं वदवून घेते आणि त्यानिमित्ताने दररोज त्याला फसवून त्याच्याच सख्ख्या मित्राकडे, रंजितकडे जाऊ लागते ..
अंध नायकाला हे घरात बसून एरवी कळणेच अशक्य ..
पण इथे एन्ट्री होते ती आणखी एका पात्राची .. ते पात्र म्हणजे, रंजीता
ही केअरटेकर या नात्याने संजीव कुमारच्या घरात येते.. येते काय, खरंतर खुद्द नायिकाच तिला नायकाच्या सुश्रुषेसाठी आणते आणि पुढचं नाट्य घडतं .. अंध नायक हळूहळू रंजीताच्या सहकार्याने घराबाहेर पडू लागतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो, अनेक गोष्टी तो आपल्या अन्य सेन्सेसद्वारे जाणवून घेत जातो..
इथून सगळा चित्रपट खरोखरच पहाण्यासारखा आहे ..

एकेक सीन एवढा सुंदर झाला आहे की आपल्या अंगावर रोमांच उठल्याशिवाय रहात नाही.
मला या चित्रपटाची कथा सांगण्याऐवजी, त्यातले मस्ट वॉच सीन्स तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत ..

1. अंध नायक हळूहळू शिकत, ज्या हुशारीने रस्ते, वेळा, विशिष्ट ठिकाणं लक्षात ठेवतो तो सीन
2. रंजितच्या फ्लॅटवर अनाहुतपणे दाखल झालेला नायक टेबलाखाली त्याची काठी पडते तेव्हा झुकतो आणि तितक्यात त्याची पत्नी आणि मित्र हॉलमध्ये दाखल होतात.. त्यावेळी आपल्या छातीत धडधडल्याखेरीज रहात नाही.
3. नंतर नायकाने पत्नीच्या खुनाचा रचलेला कट
4. हा खून प्रत्यक्षात येताना पहाणे तर फारच रोमांचक
5 खून झाल्यानंतर अंध नायक पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या मागच्या बाजूचे दार उघडतो आणि तिथल्या गोल जिन्यावरून एकेक पाऊल टाकत खाली उतरत जातो .. अशातच त्याचा एकमेव सहारा असलेली त्याच्या हातातली छत्री त्याच्या हातून गळून पडते आणि आपल्या काळजात धस्स होतं .. तरीही नायक न डगमगता हा भयंकर जिना केवळ इच्छाशक्तीवर यशस्वीरित्या उतरून जातो ते पहून आपला जीव भांड्यात पडतो ..
हे पाचही प्रसंग इतके भयंकर रोमांचक आहे की एखाद्या भित्र्या माणसाने घरात एकटं बिकटं असताना हा चित्रपट पहाण्याचा वेडेपणा अजिबात करू नये एवढचं मी सांगेन ..

बाकी क्राईम थ्रिलर या कॅटेगरीत या सिनेमाने जी उंची गाठली आहे ती फारच थक्क करणारी आहे..
गुन्ह्याचा शोध घेण्याचा प्रवासही खरंतर अधिक रंजक करता आला असता पण कदाचित तत्कालिन सिनेमाच्या मर्यादाही असाव्यात..

हा सिनेमा आजच्या काळात रिमेक झाला तर नक्की फार फार मजा येईल पहायला असं मला वाटतं ..
संजीव कुमारचे फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट पाहिलाच असेल आणि नसेल पाहिला तर या काही सीन्ससाठी हा चित्रपट एकदा तरी पहाच ..

- मोहिनी घारपुरे देशमुख