प्रेमाच्या या दिवशी उत्साहाने फुलून आल्यावर माझ्यासारखी सुगरण बाई एक सोडून दोन दोन केक बनवण्याचा घाट घालत बसते. आधी केक बनवते आणि मग स्वतःतील सर्व कौशल्य पणाला लावून केक गार्निशिंग करते. त्यासाठी फ्रेश क्रीम, बटर, आयसिंग शुगर वगैरे तिने बाजारातून केव्हाच आणून ठेवलेली असते. नुकताच एखादा केक मेकींगचा वर्कशॉपही तिने स्वकष्टातून मिळवलेले पैसे स्वखिशातून खर्च करून अटेंड केलेला असतो. तिने मनोभावे चॉकलेट सॉस, चॉकलेट गनाश, चॉकलेट फ्रॉस्टींग वगैरे कसं बनवतात ते अगदी शाळकरी मुलीसारखं शिकून घेतलेलं असतं. मग हे सगळं ज्ञान आणि कौशल्य ती आजच्या दिवशी न वापरेल तरच नवल. त्यात तिला तिच्या मुलीला शाळेतून घरी आल्याबरोबर समोर चॉकलेट केक ठेऊन दणदणीत सरप्राईज द्यायचं असतं. कारण,मुलीचे छोटे छोटे डोळे जेव्हा केक पाहून चमकतील तेव्हा आईच्या आनंदाला पारावार उरणार नाही हे आईला माहीत असतं. मग आई काय करते, सकाळी उठल्याबरोबर कामाला लागते. केक बनवणं, त्यावर गनाश बनवणं, मग घरी नसलेली पायपिंग बॅग तयार करणं, त्याला स्टार नोझल वगैरे प्रकार घरात मुळातच नसल्याने जशी बॅग तयार केली तसं तिच्या मुखातून बाहेर येणारं गनाश लीलया आकार देत त्याची सुंदर नक्षी केकवर काढणं, मग त्या केकचे फोटो काढणं, हे फोटो बाबाला पाठवून त्याची शाबाशी आणि प्रेम मिळवणं आणि मग मुलीच्या उत्साहाला आलेलं उधाण पाहून तिच्या हाती सुरी ठेवत, हं चलो.. काप हा केक आता तुझ्या इलवुशा हातांनी असं म्हणत मुलीने केक कापताच तो तिला भरवणं आणि मग तिचा जो काही सुखाने ओतप्रोत भरलेला चेहरा दिसेल त्याला पाहून आईनं मनात जाम खूश होत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणं हे सगळं सगळं माझ्यासारखी उत्साही आई न करेल तरच नवल.
मग तिला आठवतं, अरे आज तर व्हॅलेंटाईन्स डे .. आपल्या वाचकांनाही आपल्या या उत्साहाचं नि खटाटोपाचं वृत्त कळवायलाच हवं नाही का .. असं म्हणत ती उत्साहाने ब्लॉग लिहायला बसते. शब्दांच्या झरझर झरझर वहाणाऱ्या भाषेच्या नदीतून ब्लॉगवर आज काहीतरी वेगळ्याच भन्नाट शैलीत तिच्या हातून लिहीलं जातं. ती ते पुन्हा पुन्हा वाचते आणि पुन्हा पुन्हा स्वतःवर खूश होत जाते. मग फोटो, जे तिने स्वतःच वेळात वेळ काढून स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यात, आयसिंग भरल्या बोटांना मागे सारत कसेबसे नीट नेमके अँगल पकडत काढलेले असतात तेही ती ब्लॉगपोस्टला जोडते आणि लगेच पुढल्याच क्षणाला ती ही पोस्ट ब्लॉगवर प्रसिद्ध करते. आता प्रवास सुरू होतो तो या पोस्टला पाच हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळतील की नाही याचा ... बघूया .. काय होतंय आजच्या या व्हॅलेंटाईन्स डे च्या पोस्टचं असं म्हणत शेवटी आई जरा रिलॅक्स होते नि पुस्तक वाचायला लागते.
आणि अर्थात्, तुम्हाला या एगलेस केकची माझी खास सिक्रेट रेसिपी हवी असेल तर कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा, शिवाय माझा ब्लॉग आवडत असल्यास माझ्या ब्लॉगला फॉलो करा व ब्लॉगची लिंक भरपूर शेअर करायला विसरू नका असंही आई तळटीप म्हणून ब्लॉगपोस्टच्या शेवटी लिहायला विसरत नाही.
- मोहिनी घारपुरे - देशमुख

मस्त!केक आणि लिखाणही
उत्तर द्याहटवाधन्यवाद ..आपलं नाव कळेल का .. ?
हटवाWas Mohini...Chan vyakta zalis...lihiti raha...
हटवाThank you so much .. !
हटवा