रिपोर्टींगच्या निमित्ताने मी आजवर इतकी फिरले आहे आणि या फिरस्तीदरम्यान अनेक संस्था, अनेक व्यक्ती यांच्या कामकाजाशी माझा नेहमीच जवळून संबंध आलेला आहे. तर ... अशीच एक सुंदर संध्याकाळ ..
एका क्लासमधल्या बेंचवर अनेक ज्येष्ठ नागरिक, जोडपी एकत्र बसली आहेत. कोणीच फारसं कोणाशी बोलत नाहीये पण तरीही मनातून सारीजण अत्यंत आनंदात आहेत.. समोर पांढऱ्या पडद्यावर अक्षरं उमटली की लगेचच उपस्थितांपैकी कोणाच्याही तोंडून उत्स्फूर्त दाद येते .. वाहवा ... वाहवा .. आणि मग कानावर एक शांत, सुरेल गाणं यायला लागतं... सगळेजण चहाचे घोट घेत घेत निवांत बसून गाणी ऐकत रहातात ...
साधारणतः आठ - दहा वर्षांपूर्वी रिपोर्टींगच्या निमित्ताने अनुभवलेला हा सगळा माहौल माझ्या आजही चांगलाच स्मरणात आहे. हा माहौल असणारं हे ठिकाण होतं ..
' सैगल फॅन्स क्लबचं .. ' !
(हा फोटो मी स्वतः रिपोर्टींगला गेले होते तेव्हा काढलेला आहे, म्हणजे तब्बल आठ दहा वर्षांपूर्वीचा आहे बरं का ) |
या क्लबविषयी लिहावं असं बरेच दिवसांपासून मनात होतं. म्हणूनच मग, या क्लबचे संस्थापक नाशिकचे श्रीकृष्ण साठे काका यांचा नंबर शोधून त्यांना संपर्क केला आणि विशेष म्हणजे काकांनीही मला झटकन ओळखलं. मग माझ्या विनंतीवरून त्यांनी मला या उपक्रमाची माहिती कळवली आणि ती देखील इतकी सविस्तर आणि वाचनीय .. की आज मला काही लिहीण्याची संधीच ठेवली नाही काकांनी .. (☺😉😂)
तर, आज या ब्लॉगमध्ये वाचा साठे काकांच्या या उपक्रमाविषयी खुद्द त्यांच्याच शब्दात ...
मनःपूर्वक धन्यवाद श्रीकृष्ण साठे काका !
- मोहिनी घारपुरे - देशमुख
..................................
पूर्वपीठिका:-
मी अगदी ८-१० वर्षाचा असल्या पासून माझा परिचय रेडीओ सिलोनशी झाल्याचे मला आठवते.(माझे चुलते संगीताचे शौकिन होते व रोज रेडिओ सिलोन ऐकत असत.) रोज सिनेमातील गाण्यांचे सूर (तेंव्हाची नवी, आताची खूप जुनी ) कानांवर पडत आणि रोज सकाळी ७.५७ वाजतां न चुकता लावलं जाणारं ते सैगलचं गाणं (त्याचं गाणं सकाळी ७.५७ वाजतां लावण्याचा उपक्रम आजतागायत चालू आहे व मी ७.३० ते ८.०० वाजता रेडिओ सिलोनवर ऐकायला मिळणारा "पुराने फिल्मोंके गीतोंका कार्यक्रम" अजूनही न चुकता ऐकतो ) या सगळ्यांशी खूप लहानपणीच मैत्री जुळली ती आजतागायत! तेंव्हांची गाणी किती मधूर असत हे आजच्या पिढीतील कुणालाही आई-वडील, आजी-आजोबा किंवा घरातील इतर वयस्कर मंडळींकडून ऐकायला मिळेल! त्या काळात आम्ही भावंडे व आमचा मित्र परिवार यांच्यासाठी आणखी एक आकर्षणाचा विषय होता तो म्हणजे "बिनाका गीतमाला"! आधीच त्या काळची गाणी म्हणजे एकदा ऐकली की, कानात घर करून बसणारीच! त्यात रेडिओ सिलोनवरच दर बुधवारी रात्री आठ वाजता ती अमीन सयानी अतिशय आकर्षकपणे सादर करत असत! त्या कार्यक्रमाच्या अधिक तपशीलात न शिरता एवढेच म्हणेन की त्यामुळे त्या काळच्या गाण्यांचे वेड लागले ते कायमचेच!
जसजसे वय वाढत गेले तसतसे शिक्षण, अभ्यास, इयत्ता वाढत गेल्या. शिक्षणही १९६४ साली पूर्ण झाले व लगेच नोकरी ! या सगळ्यामुळे माझ्या जुन्या गाण्यांचे वेड या छंदावर मर्यादा आल्या. पण १९६५ साली एक घटना घडली. मला नोकरी मिळाली पण पोस्टींग मुंबईत झाले. मी एकटाच मुंबईत दादरला एका लाॅजमध्ये राहू लागलो. सकाळी १०पर्यंत व संध्याकाळी ६ नंतर भरपूर वेळ असे. पहिली गोष्ट काय केली असेल तर मर्फीचा ट्रान्झिस्टर खरेदी केला व रोज सकाळी ७.३० वाजता तोच म्हणजे "पुराने फिल्मोंके गीतोंका कार्यक्रम" ऐकू लागलो आणि माझी माझ्या छंदाशी, मर्यादित स्वरूपात कां होईना, जणू पुनर्भेटच झाली! त्यानतर त्या छंदाची आणि माझी कधीच ताटातूट झाली नाही.
दिवस, महिने आणि वर्षे कशी गेली ते कळलेही नाही. मी बॅंकेच्या नोकरीत ५-६ गावे फिरून आलो आणि १९९९ साली बॅंकेच्या सेवेतून मुदत पूर्व निवृत्ती घेतली आणि त्यानंतर २००२ च्या सुमारास एक योगायोग घडून आला. आमच्याच बॅंकेच्या (Bank of India)सेवेत असलेले एक हिंदी अधिकारी (राष्ट्रभाषा हिंदीचा कामकाजात जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून बॅंकेने Hindi Officer ही पोस्ट निर्माण केली होती व हिंदी अधिकारी नेमले होते) श्री. विजय अहलुवालिया जे मुळचे मुंबईचे पण अखेरच्या नाशिक इथल्या पोस्टींगनंतर नाशिक येथेच मुदत पूर्व निवृृत्त झाले. त्यांनी पण माझ्यासारखीच ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. त्यांनापण जुन्या हिंदी गाण्यांची आवड होती हे मला आमच्याच बॅंकेतील श्री. प्रमोद पांडे यांच्याकडून कळले. आमच्या दोघातील हा समान दुवा लक्षात घेऊन त्यांनीच एक दिवशी आम्हा दोघांची ओळख करून दिली..... आणि तेंव्हाच केव्हां तरी "सैगल फॅन्स् क्लब" च्या स्थापनेची बीजे रोवली गेली.
(पूर्वपीठिका समाप्त).
सैगल फॅन्स् क्लबची स्थापना!
२००२ साली माझी व श्री. विजय अहलुवालिया यांची ओळख झाली व आमच्या दोघांच्यात असलेल्या समान दुव्याने-जुन्या हिंदी सिनेमातील गाण्यांची आवड- आम्हा दोघांना आणखी जवळ आणले. अधून-मधून आम्ही भेटत असू व आमच्या आवडीविषयी बोलत असू. जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत एकत्र येऊन काही तरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटे. विचार विनिमय करता करता आमच्या एक बाब लक्षात आली की, नाशकात सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्था त्या काळात अभावानेच होत्या व विशेषत: जुन्या हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना एका ठिकाणी भेटण्यासाठी एखादा प्लॅटफाॅर्मच नव्हता. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की, जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी कानावर पडली की, कान टवकारणारे आज लाखोंनी कदाचित नसतील पण हजारोच्या आकड्यात नक्कीच आहेत व अपवादाने का होईना पण नवी पिढी पण त्यात सहभागी आहे. म्हणजे नाशकात तेव्हा शौकीन भरपूर पण त्यांना एकत्र आणणारी संस्था किंवा एकत्र येण्यासाठी एखादे ठिकाणंच उपलब्ध नव्हते अशी काहीशी परिस्थिती होती. हे लक्षात घेऊन आम्ही २००३ साली प्रथम "सिनेसंगीत प्रेमी" नावाचा एक ग्रुप स्थापन केला व एकत्र येण्यास सुरूवात केली.
कार्यक्रमाला १०-१२ रसिकच उपस्थित असत. कार्यक्रमांची वारंवारिता (Frequency) काही निश्र्चित नव्हती. एकमेकांच्या सोयीने आळीपाळीने एकमेकांकडे कार्यक्रमाचे आयोजन केले जाई. अर्थातच जुन्या गाण्यांच्या रेकाॅर्डस् रेकाॅर्ड प्लेअरवर किंवा सीडीज् सीडी प्लेअरवर ऐकत असू. असा हा उपक्रम जवळ-जवळ दीड वर्ष चालू होता. २००४ साल उजाडले व सैगल फॅन्स क्लबच्या स्थापनेसाठी काही पूरक घटना घडू लागल्या. त्याचं असं झालं की, २००४ हे साल सैगलचं जन्मशताब्दी वर्ष होतं व ठिकठिकाणचे रसिक ते धुमधडाक्यात साजरं करणार होते. आमच्याच बॅंकेत मुंबईला कार्यरत असणारे कै. विनायक जोशी (होय, दुर्दैवाने या वर्षीच ४-५ महिन्यांपूर्वी त्यांचे सेवानिवृृृत्तीच्या उंबरठ्यावर असतांना अकाली निधन झाले.) जे एक चांगल्यापैकी भावगीत गायक होते आणि सैगलचे चाहते होते, त्यांनी सैगलला श्रद्धांजली म्हणून साधारण २०-२२ गाण्यांचे "बाबुल मोरा" कार्यक्रमाचे आयोजन केले व मुंबईत ते सादरही करू लागले. सैगलची गाणी ते स्वत: गात. २००४-२००५ सालात नाशिकला त्यांच्या त्या कार्यक्रमाचे तीन वेळा आयोजन करण्यात आले. नाशिकच्या " रसिक " संस्थेचे श्री. शरद पटवा ह्यांनी त्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अर्थात माझाही त्यात सहभाग होताच. त्यापैकी तिसरा व शेवटचा कार्यक्रम २० फेब्रुवारी, २००५ ला होता. नाशिकमधलं वातावरण तेव्हा सैगलच्या आवाजातल्या जादूनं भारलेलं होतं. मी तर १९६५ पासूनच सैगलच्या आवाजातील जादूनं भ्रमचित्त (Mesmerise) झालो होतो. मी व श्री. अहलुवालिया यांनी विचार केला. आम्हाला असं वाटलं की, जन्मशताब्दी वर्षात आपण एक म्युझिक क्लब स्थापन केला व त्याचं नामकरण "सैगल फॅन्स क्लब" असं केलं तर त्या महान गायकाला ती उचित श्रद्धांजली ठरेल. मग ठरलं व त्याच कार्यक्रमात प्रस्तावित क्लबच्या स्थापनेसाठी तारीख जाहीर करण्यात आली- २७ फेब्रुवारी, २००५. "रसिक" संस्थेचे श्री. शरद पटवा यांनी ती घोषणा केली.
ठरल्याप्रमाणे २७ फेब्रुवारीला पहिली बैठक झाली. मीच तो प्रस्ताव मांडला. उपस्थित सुमारे २०-२५ रसिकांनी प्रस्ताव उचलून धरला आणि "सैगल फॅन्स क्लब"ची रीतसर स्थापना झाली. वर उल्लेखिलेल्या "सिने-संगीत प्रेमी क्लब" चे वेगळे आस्तित्व राहिले नाही व तोच पुढे "सैगल फॅन्स क्लब "झाला. बैठकीत असेही ठरले की सदर उपक्रमासाठी वर्गणी नसेल व प्रवेश विनामूल्य असेल. त्यावेळी डोक्यात कार्यक्रमाची निश्चित अशी रूपरेखा नव्हती. महिन्यातून एकदा एकत्र येणे व सैगल संगीत ऐकणे एवढाच विचार मांडण्यात आला.
क्लबचे कार्यक्रम आळीपाळीने एकमेकांच्या घरीच सुरू झाले. सर्वांच्या सोयीने तारखा ठरवल्या जात. "सिने-संगीत प्रेमी" प्रमाणेच कार्यक्रमांची सुरूवातीला निश्चित अशी वारंवारिता (Frequency) नव्हती. पण कार्यक्रमात फक्त सैगलचीच गाणी ऐकली जात नसत तर इतरही जुनी गाणी ऐकली जात. सुमारे तीन वर्ष उपक्रमाची वाटचाल अशीच चालू होती. उपस्थिती दिवसेंदिवस वाढत चालली होती. मात्र त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन एखाद्याच्या घरी करणे अडचणीचे ठरू लागले आणि अशातच, साधारण २००८ साली, क्लबच्या वाटचालीला एक निर्णायक वळण मिळाले. मी, अहलुवालिया आणि इतर काहीजण क्लबच्या संस्थापक समितीचे सदस्य होतो. त्यांच्यापैकीच एक संतोष पाटील ! (क्लबच्या वाटचालीतील त्याच्या महत्वाच्या भूमिकेचा पुढे उल्लेख येईलच!) त्याच्या ओळखीने नाशिक मधील " मोराणकर कोचिंग क्लासेस" चे श्री. प्रभाकर मोराणकर यांनी आमच्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या क्लासेसचा सुसज्ज हाॅल, प्रोजेक्टर, छोटासा स्क्रिन, माइक, कॅमेरा इत्यादी यंत्रणेसह दर रविवारी विनामूल्य देऊ केला. ज्या वेळी क्लबला वाढत्या उपस्थितीमुळे एखाद्याच्या घरी कार्यक्रम करणे अडचणीचे ठरू लागले होते तेव्हा हा मोठाच दिलासा होता. मार्च २००८ पासून कार्यक्रम श्री. मोराणकर यांच्या हाॅलमध्ये होऊ लागले ते आजतागायत! म्हणूनच क्लबच्या वाटचालीत मोराणकर पती-पत्नींचे अतिशय महत्वाचे योगदान आहे याचा मी कृतज्ञापूर्वक उल्लेख करतो.
जेव्हापासून श्री. मोराणकर यांच्या जागेत कार्यक्रम होऊ लागले तेव्हापासून श्री. अहलुवालिया यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपात दूरगामी बदल केले जे पुढील काळासाठी क्लबला उपकारकच ठरले. त्यांनी कार्यक्रमांना एक दिशा दिली. १२ ऑडीओ व १८ व्हिडीओ अशा गाण्यांचे कार्यक्रम तयार करून ते महिन्यातून एका रविवारी सादर करू लागले. प्रत्येक कार्यक्रमात पहिलं गाणं सैगलचंच असेल असंही ठरलं कारण हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात त्याचं असलेलं अनन्य साधारण स्थान! इतर गाणी मात्र जुन्या हिंदी चित्रपटातील अन्य गायक-गायिकांची असत. कार्यक्रमांचं हे असं स्वरूप सर्वांनाच आवडू लागलं. आता तो एक पॅटर्नच झाला आहे व आजही तोच रूढ आहे. त्यांनी गाणी सादर करण्यापूर्वी सिनेमा, संगीतकार, गीतकार, गायक/गायिका यांची नावे सांगणे ही पद्धत रूढ केली. त्यांनी क्लबच्या कार्यक्रमांची कक्षा पण वाढवली म्हणजे असं की, महिन्याच्या पहिल्या रविवारी जुना सिनेमा व तिस-या रविवारी वर उल्लेख केलेला गाण्यांचा कार्यक्रम असे महिन्यातून दोन-दोन कार्यक्रम होऊ लागले. जसजसे एका मागोमाग एक कार्यक्रम होऊ लागले, तस-तसे गाण्याचे वैशिष्ट्य, गाणं आवडण्याचे कारण, गाण्याशी निगडीत काही आठवणी असतील तर त्या सांगणे, व संबंधित कलाकारांशी संबंधित काही माहिती सांगणे अशा गोष्टींचा समावेश निवेदनात होऊ लागला व कार्यक्रमातील रंजकता वाढू लागली. उपस्थिती वाढू लागली. ४० ते ६० उपस्थिती असा भरघोस प्रतिसाद कार्यक्रमांना मिळू लागला जो क्लब साठी एक सुखद अनुभव होता. क्लबची वाटचाल जोमाने सूरू झाली व चालू राहिली.
सुरूवातीची काही वर्षे श्री.अहलुवालियाच कार्यक्रम सादर करीत. साधारण २०१०-२०१२ सालापासून उपस्थित इतर काही इच्छुकांनाही कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली. कामकाजात आपणहून सहभाग घेणारे येतील आणि जातील पण क्लब निरंतर चालूच राहिला पाहिजे ही त्या मागची भावना! इतरांना संधी दिल्यामुळे उपस्थितांना वेगळेपणाचा अनुभव मिळू लागला आणि संधी मिळालेल्या रसिकात क्लबच्या कामकाजात आपलाही काही सहभाग आहे अशी समाधानाची व आपलेपणाची भावना निर्माण झाली.
याच काळात वर्षातून एकदा-कोजागिरी पौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुरू झाले. हा कार्यक्रम सशुल्क असतो कारण आटीव दूध व भोजनाची व्यवस्था असते. उपस्थितांपैकी ज्यांनी नाव नोंदणी केली असेल त्यांना त्यांच्या पसंतीचं एक गाणं निवेदनासहित सादर करण्याची संधी देण्यात येते. यामुळे सुद्धा हा क्लब आपलाही आहे असे उपस्थितांना वाटण्यास मदत होते. क्लबच्या वतीने काही निवडक व्हिडीओ गाणी सादर केली जातात.
२००५ ते २०२० अशी ही क्लबची वाटचाल चालूच आहे. २०१४ सालापासून श्री. अहलुवालिया यांनी व २०१६ सालापासून मी क्लबच्या कामकाजातील प्रत्यक्ष सहभाग थांबवला. परंतु दरम्यान कार्यक्रम सादर करण्यासाठी नवीन-नवीन इच्छुक तयार झाले आहेत, होत आहेत. क्लबच्या वाटचालीत सुरूवाती पासूनच, विशेषत: २००८ सालापासून, श्री. संतोष पाटील यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कार्यक्रम कोणीही सादर करो, निवडलेल्या गाण्यांची यादी त्यांना दिली जाते आणि मग श्री. पाटील सर्व कार्यक्रम काॅम्प्युटरवर तयार करतात. जो गाणी निवडतो तो कार्यक्रम सादर करतो, निवेदन करतो पण काॅम्प्युटरवर Audio गाणी ऐकवणारे किंवा व्हिडीओ गाणी पडद्यावर दाखवणारे असतात ते श्री. संतोष पाटील! कार्यक्रम तयार करण्याचे सर्व तांत्रिक काम तेच पाहातात.त्यांनी जणू क्लबच्या कामकाजासाठी, कार्यक्रमांसाठी जणू स्वत:ला वाहूनच घेतले आहे.
अलिकडच्या काळात मात्र क्लबला जरा उतरती कळा लागल्यासारखी वाटते. पण कार्यक्रम अजिबात होत नाहीत असही नाही. या वर्षी २७ फेब्रुवारीला क्लबने आपल्या वाटचालीची १५वर्षे पूर्ण केली. त्या निमित्त १ मार्चला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगायोग असा की, तो क्लबचा १७५ वा कार्यक्रम होता.
क्लबच्या वाटचालीत देबनाथ पती-पत्नी यांचे सुद्धा अतिशय महत्वाचे योगदान आहे. वर म्हटल्याप्रमाणे श्री. संतोष पाटील यांनी क्लबसाठी आपल्याला वाहून घेतले आहेच पण क्लब आपले जे काही आस्तित्व आज टिकवून आहे त्याचे श्रेय नि:संशयपणे देबनाथ पती-पत्नींकडे जाते. मोठ्या जिद्दीने त्यांनी क्लबचे आस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यांनी क्लबच्या कामासाठी श्री. संतोष पाटील यांना काॅम्प्युटरसहित आपल्या घरातला हाॅल दिमतीला दिला आहे. हे तिघे व कुलकर्णी पती-पत्नी यांनी नेटाने क्लबची वाटचाल चालू ठेवली आहे.
नाशिक मधील संगीत शौकिनांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद याचाही उल्लेख केलाच पाहिजे. त्याशिवाय क्लबच्या वाटचालीला पूर्णता येणार नाही. इतर अनेकांचाहि या क्लबच्या वाटचालीत वाटा आहेच. त्या सर्वांचे आभार मानलेच पाहिजेत.
तर असा हा आमचा क्लब! अनेकांनी हातभार लावलेला. माझ्यासाठी सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यात अतीव समाधानाचे क्षण देणारा! जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा माझा छंद पूर्णत्वाला नेणारा!
(समाप्त)