गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

ओंजळभर कविता आता पुस्तकरूपात ...

मित्रांनो,

आपलं पहिलं पुस्तक वाजतगाजत छापून यावं ही प्रत्येक तोडकंमोडकं किंवा फार फार छान लिहीणाऱ्या लेखकाची तीव्र इच्छा असते. किंबहुना, आपलं किमान एक तरी पुस्तक प्रसिद्ध व्हावं हे प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं.. माझंही होतंच.. पण बरीच धडपड करूनही प्रकाशकांचं आणि माझं काही समीकरण जुळेना, शिवाय मला स्वतःलाच कोणतंही नवं काम असो करून पहाण्यात फार फार धमाल येते. चुकलं तरी चालेल, पण करून तर पाहूया या स्कूल ऑफ थॉटमधून माझी जडणघडण झालेली आहे. फार तर काय होईल .. नकार मिळेल.. फार तर काय होईल.. नाही होणार मनासारखं .. त्याहूनही काय वाईट होईल .. काहीच नाही.. मग करून पाहूया.. एखादी गोष्ट करण्यातच, करून पहाण्यातंच खरं जीवन आहे असं मला वाटतं. शिवाय, दरवेळी अपयश येतं, किंवा नकारच मिळतो असंही अज्जिबात नाही, किंबहुना अशा या धडपडीचं, धडाडीचं आणि उद्यमशीलतेचं जाणकार लोकांकडून नेहमी कौतुकच होतं हा माझा स्वानुभव आहे. त्यामुळे.. जेव्हा या नोशन प्रेसबद्दल माहिती मिळाली तेव्हा माझं स्वप्न असलेलं माझ्या मनातलं माझं पुस्तक .. माझ्या कल्पनेतलं माझं पहिलंवहिलं पुस्तक मी स्वतःच एकटीने अथक परिश्रम करून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक आता नोशन प्रेसच्या वेबसाईटवर आणि अमेझॉनवर रिड ओन्ली व्हर्जनमध्ये उपलब्ध झाले असून विक्रीसाठीही उपलब्ध आहे. तरीही, माझ्या तोडक्यामोडक्या कवितांवर.. किंवा माझ्यातल्या धडपडणाऱ्या, उत्साही मुलीबद्दल जर तुम्हाला प्रेम वाटत असेल आणि माझं पुस्तक खरेदी करावसं वाटत असेल तर जरूर या दोन्हीपैकी एखाद्या साईटवरून ते आजच ऑर्डर करा. ऑर्डर करण्यापूर्वी मला इनबॉक्स करा.. कदाचित मी तुम्हाला काही डिस्काऊंटही ऑफर करू शकेन ..
पुस्तकाची किंमत फार जास्त आहे असं वाटत असलेल्यांनी एवढंच लक्षात घ्या की हा सगळा खटाटोप मी एकटीने केला आहे.. मी यात कोणाचीही मदत घेतलेली नाही.. त्यामुळे जर तुम्हाला किंमत जास्त वाटत असेल तर मात्र ही पोस्ट तुमच्यासाठी नाही असं समजून स्वतःला वगळून घ्या.. तुम्ही माझं पुस्तक विकत घेतलं नाहीत तर तो तुमचा ग्राहक आणि वाचक म्हणून चॉईस असू शकतो हे मी समजू शकते त्यामुळे त्यावरून तुमच्याविषयी माझ्या मनात अकारण अढी वगैरे कदापि रहाणार नाही.
धन्यवाद
- मोहिनी

If you want to purchase my book please click on this link - 

https://notionpress.com/read/onjalbhar-kavita

( use this coupon to avail 15% discount - MYFRIEND )

(limited period offer)

२ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश