आपल्याला सोशल मीडियावरची एखादी गोष्ट आवडली नाही तर वाट्टेल ते लिहीत सुटायचं, अगदी अर्वाच्च भाषेत आणि अगदी कोणत्याही थरापर्यंत जात एखाद्याच्या इज्जतका फालुदा बनवून टाकायचं अशी ट्रोलधाडच जणू हल्ली पहायला मिळते. आभासी जगात वावरताना माणसं आपल्या स्वतःचंच आणखी एक रूप दाखवत असतात, याचं हे ट्रोलिंग एक उत्तम उदाहरण आहे.
कोणाच्या जीवावर बेतेल असं, एखाद्याची बदनामी करणारं वक्तव्य आपण खऱ्या आयुष्यात बोलायला धजावणार नाही पण आभासी जगात मात्र ज्याची स्वतःची लायकीही नाही अशी माणसं एखाद्या कर्तबगार माणसाच्या वर्षानुवर्षे कष्टाने कमावलेल्या प्रतिष्ठेला क्षणार्धात आपल्या शब्दांच्या पायदळी तुडवतात. बिचारी चांगली माणसं जी कष्टानी मोठं होऊ इच्छितात त्यांना हे असे बिनडोक आणि उपद्रवी जीव खऱ्या आयुष्यात जे जमणार नाही तसं आभासी जगात सतावून नामोहरम करतात.
सोशल मीडियावर समज गैरसमज होतच रहातात. किंबहुना एखाद्याला आपलं मत ठामपणे मांडण्यासाठी हा एक अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म आहे. परंतु, असे असूनही, शब्द नावाचं अस्त्र नेमकं कसं कधी आणि किती प्रभावानी मांडायचं हा विचारही करणं अत्यंत गरजेचं आहे.
नुकतंच याबाबत एम टीव्हीनी एक अत्यंत जबाबदार पाऊल उचललं आहे. ट्रोलपुलिस या नावानी प्रसारित होणाऱ्या या वाहिनीवरील प्रोग्रामने जणू अशा ट्रोलर्सला पकडून त्यांना वठणीवर आणायचा विडाच उचलला आहे. एँकर रणविजय हा तमाम युवकांचा प्रिय होताच, पण आता या माध्यमातून त्याने तरूणांचे कान उपटण्याचे जे काम सुरू केले आहे ते फार फार महत्त्वाचे आहे.
मला वाटतं, तरूणपणीच आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची गरज असते. पण आज अनेक तरूण दिशाहीन झालेले आहेत. शिक्षणाचं दिवसेंदिवस वाढतं वजन, वाढती स्पर्धा, या स्पर्धेत तग धरण्यासाठी करावी लागणारी मेहनत, आणि एवढं सगळं करून पदरी अपयशच आलं तर येणार रिकामपण, बेरोजगारीचा विळखा आणि मग या सगळ्याला पर्याय आणि उपाय काय तर तो म्हणजे सोशल मीडिया.
इथे सगळं चालतं या विचाराने एखाद्या नामांकीत, प्रसिद्ध व्यक्तिच्याविरूद्ध वाट्टेल ते बडबडत जाणं, त्याला वाट्टेल ते अपशब्द वापरून त्याचं दिमाखात चाललेलं करिअर डागाळणं, अश्लील कमेंट्स करून त्या व्यक्तिलाच जणू आपण वठणीवर आणण्याचं महत्त्वाचं काम करतोय असा आविर्भाव आणत सर्वत्र वेळ काढत भटकत रहाणं असलं काम अनेक बिथरलेले महाभाग करताना दिसतात.
भारतीय कायद्यांचा अभ्यास करण्याचं एक महत्त्वाचं पाऊल या बिथरलेल्या बिनडोक ट्रोलधारकांनी करूनच मग यावाटेला जावं असा सूज्ञ सल्ला त्यांना द्यावासा वाटतो. एखाद्याची बदनामी करणे, सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला अश्लील बोलणे, अश्लील वर्तन करणे किंवा एखाद्याला तसं करण्यास उद्युक्त करणे, सायबर लॉज काय आहेत याचा सगळ्याचा अभ्यास ट्रोलधाडी घालणाऱ्यांनी करायला हवा तसंच अन्य सामान्य जनांनीही करायला हवा.
ट्रोल पुलिसच्या निमित्तानी अनेक दिवसांपासून हे सगळं लिहावसं वाटतच होतं. कारण, आभासी जगात उपद्रव करणाऱ्यांच्या डोळ्यात जेव्हा खरं पाणी येतं तेव्हा जाणवतं, जग खूप छोटं आहे. आज तुम्ही जे इतरांशी वागताय, तसंच समोरचाही व्यक्ती तुमच्याशी कधी ना कधी वागू शकतो हे लक्षात ठेवा.
सोशल मीडियावर हे भान ठेवा -
- वाद घालायला हरकत नाही, पण किमान आपला मुद्दा योग्य, तर्कशुद्ध असावा याचा आग्रह धरा
- कितीही राग आला तरी कोणालाही शिवीगाळ करू नका. तशा कमेंट हा गुन्हा असतो.
- चुकीच्या, धार्मिक, जातीय, राजकीय पोस्ट्स शेअर करू नका. गोत्यात येऊ शकता.
- एखाद्याला अश्लील बोलणं, एखाद्याच्या फोटोजवर, व्हीडीओजवर अश्लील कमेंट करणं हा दंडनीय गुन्हा आहे याची जाण ठेवा.
- ट्रोलधाडीत सामील होण्यापूर्वी विचार करा की कधी ना कधी अशी ट्रोलधाड आपल्यावरही येऊ शकते.
- सोशल मीडियाचा सदुपयोग करून प्रसिद्धी मिळवणारी चांगली मंडळीही आहेत, त्यांच्याशी संपर्कात येऊन तुम्ही या माध्यमाचा अधिक जबाबदारीने उपयोग करू शकता.
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा