गुरुवार, २९ मार्च, २०१८

'किस'की बात

तुम्ही म्हणाल की आज एकदम काय झालं या बाईला .. काहीही काय पोस्टलंय .. तर थांबा, जरा पूर्ण वाचा आणि मग ठरवा..
किसकी बात हे मी kiss बद्दलच लिहीतेय पण हा kiss , तुम्ही समजताय तसा adult नाहीये. मला एक गंभीर मुद्दा मांडायचाय..
मी बरेचदा एक बाब अलिकडे ऑब्सर्व्ह केली आहे. काही काही मोठी मंडळी ( पुरूष असो वा स्त्री ) आपल्याला एखादं लहान बाळ, लहान मूल (मुलगा वा मुलगी )आवडलं की अगदी सहजपणे त्याला/तिला ओठांवर kiss करतात. अगदी त्या मुलाचे पालकही याला अपवाद नाहीत.
 तर माझ्यामते ही एक अत्यंत अयोग्य क्रिया आहे. वैद्यकीय, भावनिक आणि स्वातंत्र्य या तिन्ही कसोट्यांच्या अंगाने विचार करता ही क्रिया अयोग्यच ठरते. पण तरीही अलिकडे अनेक मोठी माणसं सर्रास हा वेडपटपणा करतात ... किती क्यूट आहे ना बाळ असं म्हणत सहज त्या बाळाच्या ओठावर आपले ओठ टेकवून मोकळे होतात.
हा असला बावळट, बिनडोक प्रकार पाहिला की किळस येते. त्या मोठ्या माणसाविषयी तिरस्कार वाटतो. असं वाटतं, या बाब्याला किंवा बयेला शरीर शास्त्रातील मौखिक आरोग्य विषयाच्या तासाला नेऊन बसवावं. ते समजत नसेल तर लहान मुलांचं व्यक्तिस्वातंत्र्य शिकवायला जावं. पण अशी माणसं विचित्रच असतात.. आपला यडपटपणा .. 'गंमत गं..' असं म्हणत तातडीने झाकतात किंवा मग .. 'तुला काय प्रॉब्लेम आहे ? आम्ही काहीही करू .. ' असं म्हणत आपलं तेच खरं करतात.
अशा वेळी ' किस किस की बात करे ' असा प्रश्न मनात येऊन जातो आणि तोंड वेंगाडून निघून जाणंच श्रेयस्कर असा मनाचा कौल मिळतो .
- मोहिनी घारपुरे-देशमुख
#मोठ्यांचंप्रबोधन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश