एक ती असते आणि एक मी
तिचं माझं आकाश एकच
पण आलेख मात्र निराळाच की ।
ती मोठी घरंदाज, अन् मी फिरते रस्त्यावर
ती दिसते पार्लरात, अन् दिसे ना मी कधी आरशातही ।
ती जाते हॉटेलात तिथे, तेव्हा उकीरड्यात वेचते अन्न मी
ती शोधिते स्वतःला तिथे, अन् इथे गवसेना मजला मी ।
तिच्यासाठी झुरतो तो, अन् तिला लावतो जीवही
माझ्यासारख्या मरती हजार, अन् वापरल्याही कधी जाती ।
ती मस्त रहाते तिच्या धुंदीत, तेव्हा मी असते अनवाणीही
ती मुक्त हासते तिच्या जगी, अन् इथे सोशिते चटके मी ।
ती करते हरेक ऋतू साजरा, अन् बोचते मजला ही थंडी
ऊनही टाकते होरपळवून, अन् पावसाचा मारा सोशिते मी ।
तिचे नी माझे नाते काय, बाई म्हणूनच जगतो हाय
तरीही माझे चिमुटभर आकाश, शोधीत राही माझी मी ।।
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा