मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

#Myकिचनkey


माझ्या कुकींगचं तंत्रच वेगळं 

पदार्थांच्या व्यापापेक्षा,

समजून उमजून करते मी पदार्थ .. !

अमुक एका पदार्थासाठी लागणारं

एखादं साहित्य नसले तर ... 'अडायचं नाय'

जे असेल साहित्य त्यात आपण .. 'लढायचं हाय' 

चव, रंग, रूप उन्नीस बीस झालं तरी कधीमधी मला चालतं

अहो .. हॉटेलात का खात आहोत आपण ..? हे तर साधं ताजं घरचं बनलेलं अन्नं .. !

आपले कष्ट अन् आपली 'डोक्यॅलिटी' आपल्या किचनात न्हायतर कुठे वापरायची ..?

कधी कधी 'भाकरी' थापायला गेलात तर प्रत्यक्षात पोळीही होऊ शकते हे लक्षात घ्यायचं

आणि झालंच खरं असं तर त्यातही सुख मानायचं

समोर आलेल्या अन्नाला कशाला नावं ठेवायची ..?

घ्या देवाचं नाव म्हणत आनंदे चव चाखायची ..

आपल्या श्रमाची आपणच ठेवायची किंमत

हीच तर असते स्वयंपाकाची गंमत 

वेगळ्या प्रकारे केले तर वेगळे पदार्थही तयार होतात

कधीकधी एकाच पदार्थातून चार नवे प्रकारही आपल्यालाच सुचतात.. 

करून तर पाहू म्हणत म्हणत शेकडो पदार्थ अस्सेच तर मी केले 

झाले जे छान त्यांचे 'फोटोसोहळे' साजरे केले ..

सोशल मीडियावर केला आपल्याच रेसिपीजचा बोलबाला

असं करत करतच तर छान सोपे चवीष्ट पदार्थ बनविण्याचा हुरूप मला आला

कोणी असो नसो खायला .. रोज एक नवा पदार्थ बनवत गेले

यानिमित्ताने आयुष्याची मी दिवसागणिक चव वाढवत गेले

त्याच सगळ्या रेसिपीज आता देणार आहे मी माझ्या ब्लॉगवरही ..

'#Myकिचनkey' ने शोधा या माझ्या रेसिपीज

नक्की वाचा, करून पहा .. नि कळवा तुमच्या प्रतिक्रिया

माझी स्टाईल कुकींगची आवडेलच तुम्हाला .. कारण हीच तर मोहिनीची दुनिया

- मोहिनी घारपुरे - देशमुख



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश