प्रवास एका जिद्दी तरूणाचा, प्रवास एका भन्नाट कल्पनेचा !
नुकताच गणेशोत्सव झाला. अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक आरास किंवा घरातील टाकाऊ वस्तूंपासून छान काहीतरी वस्तू बनवण्यात आल्या असतील. सणावाराला किंवा फार फार तर छंद म्हणून आपण आपल्या घरातील अशा टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी टिकाऊ, सुंदर वस्तू बनवतो आणि तेवढ्यावरच आपला प्रवास थांबतो, पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की अक्षरशः या भंगारमधील वस्तुंचाच वापर करून एका जिद्दी तरूणाने आपला स्टार्टअप बिझनेस सुरू केला आणि आता या स्टार्टअपची चक्क कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही.. पण मित्रांनो हे खरंय..
अहमदनगरमधील प्रमोद सुसरे असं या तरूणाचं नाव. आपलं इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठीही त्याला पार्टटाईम जॉब करायला लागला, कारण संपूर्ण कुटुंब केवळ शेतीवरच अवलंबून होतं. शिक्षण पूर्ण करताच त्याला नोकरीही मिळाली. जॉब तर सुरू झाला पण पगार फारसा नव्हता. तुटपुंज्या पगारात भागणं कठीणच होत होतं.. म्हणूनच त्याने मग एक भन्नाट डोकॅलिटी केली.
2017 मध्ये त्याला त्याच्या कंपनीतर्फे चीनला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्याने पाहिले की काही कामगार जुने टायर आणि जुन्या मोडक्या भंगारसामानापासून फर्निचर बनवत होते आणि ते विकून त्यातून पैसे कमवत होते. प्रमोदला ही आयडीया जामच आवडली, म्हणून तो काही दिवस तिथेच थांबला व त्याने या व्यवसायाची व कामाची पूर्ण माहिती मिळवली. तेव्हा त्याला कळलं की भारतातही अशा प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत पण त्यांची उलाढाल, उत्पन्न तितके नाही आणि मग प्रमोदने ठरवलं की आपण हाच व्यवसाय उत्तम प्रकारे करून दाखवू..

अशी झाली सुरुवात -
2018 मध्ये प्रमोदने सर्वप्रथम जुन्या टायरपासून काही फर्निचर मॉडेल्स तयार केले, ते दिसायला तर सुंदरच होते पण त्यांचं बजेट मात्र जरा जास्त होतं. शिवाय, ते फर्निचर पाहून त्याला दाद तर मिळायची, पण हे कसलं काम आता तू करणार भंगार वस्तू गोळा करून .. असं म्हणून त्याचे मित्र, नातेवाईक त्याची चेष्टा करायला लागले. तरीही प्रमोद मागे हटला नाही कारण त्याचा निर्धार पक्का होताच आणि त्याच्या मनात आता पुढे जाण्याचा मार्गही स्पष्ट होता. एका मित्राकडून 50 हजार रूपये कर्जाऊ घेऊन प्रमोद कामाला लागला. त्याने आपलं एक वर्कशॉप सुरू केलं. नोकरी करता करता हे कामही सुरू झालं. जॉबनंतर जो रिकामा वेळ मिळू लागला त्यात त्याने भंगारातून फर्निचर बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण 2019 साली त्याला एका म्यूझिक कॅफेसाठी फर्निचर तयार करण्याची पहिली मोठी ऑर्डर मिळाली. पुण्यातील या कॅफेसाठी त्याने टाकाऊतून इतकं भारी आणि मुख्य म्हणजे इकोफ्रेंडली फर्निचर बसवलं की मालक एकदम खूश झाले.. आणि मग या फर्निचरची हमखास येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांकडून चौकशी केली जाऊ लागली. नुसती चौकशी होऊन हा प्रतिसाद थांबला नाही, तर प्रमोदला आता देशविदेशातून या फर्निचरच्या ऑर्डर्सही मिळू लागल्या.

सोशल मीडियाचा उत्तम वापर -
आता एवढा प्रतिसाद यायला लागल्यानंतर प्रमोद यांनी सोशल मीडियावर पी2एस फर्निचर नावानी आपलं पेज सुरू केलं. यावर रेग्युलरली आपल्या फर्निचरचे व नवनव्या कामांचे, प्रोजेक्टचे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता जगभरातून त्याला ऑर्डर्स मिळू लागल्या.

दक्षिण आफ्रीकेतून आली पहिली ऑर्डर-
लॉकडाऊनमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा अर्थातच कामावर परिणाम व्हायला लागला.. पण म्हणतात ना, देव पाठीशी असतो.. त्याप्रमाणेच यावर्षी मात्र मार्च महिन्यात प्रमोदला दक्षिण आफ्रीकेतून पहिली ऑर्डर मिळाली. तोवर त्याला हैदराबाद, हुबळी, बँगलोर, चेन्नई, गुजरात, ओरिसा येथूनही ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. द.आफ्रीकेतून 2 लाख 30 हजाराची पहिली ऑर्डर मिळाली.

तर मित्रांनो,
नवीन कल्पना राबवताना सुरुवातीला अडचणी येतातच, मात्र, जर तुमच्या कल्पना या सत्याला धरून असतील तर मग कोणीही कितीही नाव ठेऊ देत, तुम्ही तुमच्या कल्पनांचा माग घेत पुढे जायला घाबरू नका हेच प्रमोदच्या उदाहरणावरून आपण शिकायला हवं.

जिद्द, मेहनत याबरोबरच आपल्या कल्पनांना वास्तवात आणण्याची धमकही आपल्यात असायलाच हवी आणि त्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत करण्याची आपली तयारी हवी..
धन्यवाद
- Mohinee Gharpure
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
(सर्व छायाचित्रे गुगलवरून साभार)
- Mohinee Gharpure
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
(सर्व छायाचित्रे गुगलवरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा