गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं कॉफीवरचं ते फ्रेशक्रीमचं फूल
फुंकरताना मन हलतं...

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं गुलाबाच्या उमलत्या नाजूक कळीला
खुडताना बोटात रूततं...

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं रिकामी पत्रपेटी
पहाताना मन व्याकूळ होतं ..

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं अर्थाला अनेक अर्थ शोधताना
काहीतरी थेट कळतं ..

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं आकाशातून झरणाऱ्या धारांना
हलकेच कुणी झेलतं...

- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश