गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

वृत्त:- धरित्री
भृंगावर्तनी समवृत्त
अक्षरे १३,मात्रा २१,प्लुत १२
u _ u _ | u _ u _ | u _ u _ | S _
लगालगा | लगालगा | लगालगा | S गा

अरे जरा करा मजा अशा क्षणां S ना
उदास का बसा उगा अशा क्षणां S ना
उद्या कसा असेल ना कुणा कळा S वे
असेल जे क्षणी तया सुखे जगा S वे ।।

कशास दुःख, काळजी कशास चिं S ता ?
सुखात छान डोलती लता बघा S ना !
तुम्ही असे सुखात गीत गात जा S वे
क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा सुखे हसा S वे ।।

पुन्हा पुन्हा नवा रवी प्रकाशतो S हा
नवा शशी नभात रोज हासतो S हा
तुझीच साथ त्यास रोज लाभली S की
तुझेच जीवना पुन्हा सुखे फुला S वे

- मोहिनी घारपुरे - देशमुख






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश