मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है ..
असं आळवत, प्रेमभंग झालेली प्रेयसी रडते आणि प्रियकराला आपल्या प्रेमाच्या आठवणींची साक्ष देते.. सावन के कुछ भीगे भीगे दिन परत मागते, कधी शृंगाराच्या आठवणी परत मागते .. आणि अगदी शेवटी, या आठवणी मी मिटवून टाकणार आहे, आणि त्या आठवणींबरोबर मी देखील मरून जाणार आहे, आणि ते करण्याची तू मला परवानगी दे ...
आशाजींच्या आवाजातलं हे गाणं अजरामर आहे..
प्रेमबिम करायच्या वयात असताना हे गाणं मी कित्तीतरी वेळा ऐकलं असेल, हे गाणं ऐकून व्याकूळ व्हायला न झालं तरच आश्चर्य ..
पण नव्या काळात दिवसागणिक पेपरांतून येणाऱ्या बातम्या वाचून हादरायला होतं. प्रेमप्रकरणांमुळे होणारा मनस्ताप आणि त्याची परिणीती थेट हत्या, आत्महत्या अशा टोकापर्यंत झालेली पाहून असं वाटतं, प्रेम बिम करा पण त्यात अडकू नका.
थोडासा रूक्ष, काहीसा उथळ असा हा विचार वाटत असला तरीही आपल्याकडील दिवसागणिक वाढते क्रौर्य, वाढता द्वेष पाहता तोच जास्त बरा आहे असं वाटतं.
तुम्हारा कुछ सामान पडा होगा तो वो तुरंत लेके जाओ ...
असंच काहीसं हल्लीच्या काळात प्रेमप्रकरण वगैरे करणाऱ्या जोडप्यांनी म्हणायला हवं. थोडक्यात काय तर प्रेम यशस्वी होणार नाही असं लक्षात आलं तर त्या गुंत्यात फार काळ अडकून पडू नका.. त्यातून बाहेर पडा आणि आयुष्य आनंदाने जगायला लागा .. जुनं काही उगाळायचं नाही, जुन्या कटू आठवणींनी उरलेलं आयुष्य विस्कटून टाकायचं नाही .. कदाचित नवं काहीतरी चांगलं आपल्या समोर येणार असेल हा विचार गाठीशी बांधायचा आणि पुढे चालत रहायचं. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण जीवन त्याहीपेक्षा फार फार अमूल्य आहे, ते तुम्हाला एकदाच मिळतं आणि ते नासाडायचा तुम्हाला काहीही हक्क नाहीये हेच खरं.. असं मला सुचवायचं आहे.
प्रेमाचे गुंते करायचे नाहीत अशा विचारांची तरूण तरूणी आमच्या पिढीत दिसायला लागली याचं कारणंच मुळी आपल्याकडील चारित्र्य आणि नीतीमत्तेबाबत होत असलेले भंपक, वरवरचे विचार ...
प्रेम करणाऱ्या जोडप्यांना ठार मारायला धावणारे लोक स्वतःतर त्याहूनही भयंकर क्रोर्य उरात बाळगून असतात ना .. प्रेमात पडलेल्यांच्या मनात प्रेम असतं आणि मारणाऱ्यांच्या मनात क्रौर्य .. पण लोकांना क्रौर्य, संताप कळतो पण प्रेम कळत नाही हे समीकरणच आमच्या पचनी पडत नाही. तुमचं प्रेम वेगवेगळ्या पातळीवर खुलतं, फुलतं... पण तरीही लोकांच्या ते डोळ्यात येतं.
आपल्याकडे एखाद्याशी खोटं बोलणं, फसवणूक करणं, कुणाचा जीव घेणं, एखाद्याची हत्या करणं, लांड्यालबाड्या करणं यासारख्या भयंकर गुन्हेही बिनबोभाट केले जातात, विशेष म्हणजे या गुन्ह्यांना माफीही आहे पण प्रेमासारख्या सुंदर भावनेचा परीघ मात्र लोकांना लक्षात येत नाही हेच खरंतर दुर्दैव आहे.
प्रेम करणं, सेक्स करणं, एखाद्याकडून त्याच्या इच्छेविरूद्ध शरीरसूख मिळवणं यातलं अंतर, यातला फरक आजही लोकांना कळत नाही, किंबहुना एवढा खोल विचार प्रेमप्रकरणांच्या बाबतीत करायलाच कुणी तयार नाही.
प्रेमासारख्या सुंदर भावनेचे विकृतीकरण करून एखाद्याच्या जीवावर उठणाऱ्या क्रूरकर्म्यांना माफी मिळते पण काहीही गुन्हा न केलेल्या, संवेदनशील, हळुवार मनाच्या प्रेमीयुगुलाला मात्र क्षणाचाही विलंब न करता जीवे मारलं जातं.
खरंतर, शरीरसंबंधाशिवायही प्रेम करता येऊ शकतं का .. असा प्रश्न जर मनाला विचारला तर त्याचं उत्तर होकारार्थीच येईल. प्रेम ही एक खूप मोठी, उदात्त संकल्पना आहे. प्रेम कुणावरही करावं असं म्हणूनच म्हटलं आहे. प्रेमाचा अर्थ केवळ शरीरसूख असा नाही. आपण आपल्या कुटुंबियांवर प्रेम करतो, आपल्या हातून घडलेल्या कलाकृतीवर प्रेम करतो, एखाद्या क्षणावर प्रेम करतो, एखाद्या वस्तूवर प्रेम करतो.. कारण प्रेम एक उत्कट भावना आहे .. सगळ्या जगावर प्रेम करणारी माणसंही होऊन गेलेली आहेतच की ..
मग जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात, तेव्हा ही संकल्पना केवळ शरीरापुरतीच मर्यादीत नसते हे मात्र लोकांना समजत नाही. मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात तेव्हा त्यांना एकमेकांपासून शरीरसुख हवं असतं हे खरं, त्या संबंधातून जन्माला येणारं अपत्य, मग आपलं कुटुंब अशी स्वप्नही त्यांनी रंगवलेली असतात पण समजा, हे काहीच मिळालं नाही तरीही एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटलेली प्रेमभावना कायम आपल्या मनात तरळत रहातेच की ...
मनाचा गुंता फार मोठा असतो.. म्हणूनच तर प्रेमात पडलेली तरूणी प्रेमभंगाचं दुःख हाती आलं तर मेरा कुछ सामान लौटा दो म्हणत विव्हळते, व्याकूळ होत रहाते.. कदाचित जन्मभर अविवाहीतही रहाते..
पण, एरवी प्रेमीयुगुलांच्या उरावर चढणारे क्रूरकर्मे पहाता असं वाटतं, की प्रेम करा पण प्रेमाच्या गुंत्यात अडकू नका. अर्थात, ठरवून कोणाच्या प्रेमात पडताही येत नाही आणि त्यातून ठरवून बाहेरही पडता येत नाही.. पण म्हणूनच प्रेम असफल झालं तर त्यात गुंतू नका.
तुम्हाला माहितीये का, तुम्ही असं करू शकता... नक्कीच ..
एखाद्याविषयी वाटलेली प्रेमभावना आजन्म मनाच्या कप्प्यात सारून तुम्ही पुन्हा तुमचा दिवस आनंदाने जगू शकता, तुमच्या जीवनाला आकार देऊ शकता.. पण तसं तुम्हाला प्रयत्नपूर्वक करायला हवं.
आणि लोकांनीही प्रेमी जीवांविषयी थोडंस संवेदनशील असायला हवं. मुलामुलींवर बंधनं टाकून, किंवा त्यांना जीवे मारून आपल्या हातात दुःखाशिवाय आणि क्रौर्याशिवाय काय लागतं हा विचार व्हायला हवा.
त्यापेक्षा संवाद साधणं, एकमेकांच्या गरजा ओळखणं, ज्याला जे हवं त्याला ते मिळू देणं, प्रेमी जिवांकडे तुमच्या मनातल्या विकृत नजरेने न पहाणं आणि अकारण (जात, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व न देणं) विरोध करणं आदी बाबत अधिक प्रगल्भतेने विचार समाज म्हणून आपण केला पाहिजे.
शेवटी सर्वांनी सुखात असणं, सर्वांनी सुखात रहाणं आणि सुखी होणं हा आपला अधिकार आहे हे विसरून चालणार नाही.. आणि त्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर राखणंच जास्त महत्त्वाचं आहे..
- मोहिनी घारपुरे -देशमुख

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा