व्यक्त होण्यासाठी आधी अनुभूती महत्त्वाची.. असं मला वाटतं.. म्हणजे पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त होता येतं असा माझा अनुभव आहे.
तर आज पाहिला एक असा झक्कास मराठी चित्रपट की जो पहाणं म्हणजे जीवनाचं सार शिकणं असंच म्हणता येईल एकप्रकारे ..
चित्रपटाचं नाव, दाम करी काम ..
बरोबर .. ते गाणं नाही का ..
वासुदेवाची ऐक वाणी..
जगात नाही राम रं ..
दाम करी काम येड्या दाम करी काम ..
जगात नाही राम रं ..
दाम करी काम येड्या दाम करी काम ..
ते याच चित्रपटातलं... !!
हे गाणं मला खूप आवडायचं म्हणूनच हा चित्रपट पाहिला असं म्हणा ना हवंतर ..
तर, ही कथा आहे एका कुटुंबाची .. ज्यातला कर्ता पुरूष केवळ पैसा कमावणारं मशीन .. आणि त्याचे कुटुंबीय .. म्हणजे पत्नी आणि मुलं निव्वळ पैशासाठी जगणारी आणि माणुसकी, प्रेम वगैरे विसरून गेलेली .. बहकलेली माणसं..
या पतीदेवांची भूमिका केलेली आहे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांनी.. आणि तीही अशा सुरेख प्रकारे की चित्रपटभर एक हतबल बाप, जो त्याच्या विनोदबुद्धीने आपल्या बहकलेल्या कुटुंबामुळे स्वतःला होणाऱ्या त्रासाची झळ क्षण दोन क्षण विसरून जगण्याचा प्रयत्न करत रहातो ..
त्यांच्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्रीही फारच सुंदर अभिनय साकरणारी.. ही एक अशी पत्नी जिला केवळ पैसा प्रिय .. बाकी कुटुंबाप्रती आपली कोणतीही जबाबदारी तिला नको.. तिच्या अशा बेताल वागण्याने घरातली दोन्ही मुलं आणि मुलगी अक्षरशः वाया गेलेली. मोठा मुलगा मटका, जुगार खेळणारा, दोन नंबरची बहीण ऑफीसात बॉसबरोबर आईच्या संमतीनेच गुलूगुलू करत वाया गेलेली आणि धाकट्या मुलाचंही अभ्यासातलं लक्ष केव्हाच उडाल्याने तोही समोरच्या घरात रहाणाऱ्या मुलीशी प्रेमप्रकरण करण्यात दंग..
अशा तोल सुटलेल्या कुटुंबाचा एकमेव खमका आधार म्हणजे बाप.. पण त्याला घरात काडीचाही मान नाही. तिकडे गावाकडे या गृहस्थांची विधवा, म्हातारी आणि परिस्थितीने दरिद्री झालेली बहीण एकाकी पडलेली .. तिला इकडे आपल्या घरी बोलावून घ्यावे म्हणून या गृहस्थांनी विषय काढला रे काढला की कुटुंबीयांनी नकारघंटा वाजवलीच पाहिजे. मग बिचारा बाप गपगुमान आला दिवस काढत असतो.. घरासाठी झिजत असतो.
अशातच एकदा एक बातमी वर्तमानपत्रात झळकते, त्याच्या गावाकडल्या बहिणीला अडीच लाखांची लॉटरी लागली म्हणून .. ही बातमी तिकडे गावातही वाऱ्यासारखी पसरते आणि जिला विधवा, दरिद्री म्हणून हिणावले तेच गावकरी या माऊलीच्या वाड्यात (जो आता केवळ भिंतींपुरता उरलेला असतो) तोबा गर्दी करतात.. तिचा जयजयकार करतात, तिला पोतीच्या पोती धान्य, भरपूर साड्या वगैरे देऊ करतात. बिचाऱ्या म्हातारीला लोकांचं हे असं एकदम बदललेलं वागणं काही कळत नाही.. ती भाबडी, तिला वाटतं, गाववाल्यांना खरंच आपल्याप्रती खूप प्रेम वाटायला लागलं असावं म्हणूनच ती सारी जमली असावीत.. पण इतक्यात एक गावकरी बोंबलत येतो आणि सगळ्यांना सांगतो, अहो ज्या म्हातारीला लॉटरी लागली ती ही न्हवं... ती तर दुसऱ्या गावातली याच नावाची बाई हाय.. क्षणार्धात सगळं चित्र पालटतं. अक्षरशः सगळं आणलेलं सामान घेऊन लोकं या म्हातारीला झिडकारून निघून जातात.. आणि इकडे हिच्या डोळ्यात पाणी दाटतं.
आता तिकडे शहरातही ही बातमी, म्हणजे आपल्या आत्याला लॉटरी लागल्याची बातमी त्या कुटुंबाला पेपरमधून समजलेलीच असते तशी सगळे पटापट पलटतात. बायको आणि धाकला मुलगा नि मुलगी म्हातारीला चक्क तार धाडून आग्रहाने बोलवतात. तिघेही जणं तीन वेगळ्या तार करतात नि प्रत्यक्ष म्हातारीला संदेश मिळतो तेव्हा तिला बिचारीला वाटतं, एवढ्या तातडीनं सांगावा आला म्हणजे आपल्या भावाला तर काही कमी जास्त झालं नसेल नं म्हणून ती लगेच जायला निघते. ती येणार त्या दिवशी तिला न्यायलाही हे तिघं तीन सेपरेट टॅक्सीने स्टेशनवर जातात.. त्यांना हवा असतो तो म्हाताऱ्या आत्याचा पैसा. आत्याला लॉटरी लागली आता ती फर्स्ट क्लासनेच येईल म्हणून ही तिघं तिला फर्स्ट क्लासवर शोधतात आणि तिकडे आत्या बिचारी नेहमीप्रमाणे कशीबशी जनरल बोगीतून प्रवास करून आपल्या भावाच्या घरी पोहोचते.
आता घरी आपली बहीण येताच गृहस्थाला बरं वाटतं आणि मुख्य म्हणजे आपलं असं कोणीतरी आल्याने मानसिक आधार या बिचाऱ्याला मिळतो. घरातली मंडळी घरी येईपर्यंत म्हातारे बहीण भावंड एकमेकांपाशी मन मोकळं करतात. म्हातारी सांगते, लॉटरीचा झालेला गोंधळ आणि भावाच्या घरी सगळे आपल्याला खोटारडी म्हणतील म्हणून तेथून निघून जायचा विचार करते तोच भाऊ सगळं ऐकल्यावर म्हणतो, आक्का, तुला इथे आणायची कायमची माझी फार इच्छा होती पण माझे कुटुंबीय नाही म्हणत असल्याने ते शक्य होत नव्हतं. माझ्या कुटुंबाची पार अवस्था केलीये गं बायकोनं .. आता तुला यानिमित्तानी का होईना इथे तिनं बोलावलंय तर तू आता थांब. तुझ्याकडे घबाड आहे म्हणून का होईना हे सगळे जण तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतील बघ .. आणि आता हीच वेळ आहे की कदाचित तू तरी त्यांना वठणीवर आणू शकशील. आपल्या भावाची ही गळ ऐकून शेवटी आक्का तिथे रहाते. चतुर अक्काला भावाच्या संसाराचं खरं चित्र कळायला फारसा वेळ लागत नाहीच. ती सगळ्या घरादारावर वडीलकीचा अधिकार दाखवत सगळ्यांची भरकटलेली आयुष्य पुन्हा वळणावर आणण्याकामी लागते आणि अर्थातच शेवटी तिला यश येतं. भावाचा भरकटलेला संसार पुन्हा योग्य मार्गावर येतो तशी तिला मनाने वाटायला लागतं की आता आपण इथून निघून गेलेलंच बरं.. नाहीतर उगाच ही सारीजण आपल्याला खोटारडं ठरवतील आणि हा बट्टा आपण कधीच सहन करू शकणार नाही. या विचाराने ती घरातून जायला निघते तो भाऊ देखील त्या क्षणी तिच्याबरोबर घर सोडून बहिणीबरोबर सुखाने म्हातारपण घालवू या विचाराने निघतो.. पण तितक्यात सगळे कुटुंबीय त्यांचं बोलणं ऐकतात आणि सगळ्यांचं मन परिवर्तन झाल्याने अखेरीस सारी जण त्यांना थांबवतात आणि अखेरीस सुखाने एकत्र नांदू लागतात.
एका सुंदर वळणावर चित्रपट संपतो ..
वासुदेवाची ऐका वाणी .. जगात आहे राम रं .. घाम करी काम येड्या .. घाम करी काम
असं बदललेलं सुयोग्य संदेश देणारं गाणं शेवटी ऐकताना एक समाधान आपल्याला मनोमनी मिळतं.
खरंच, पूर्वीच्या चित्रपटांची ताकद कशात असेल तर ती अशा साध्या पण आशयसंपन्न कथानकात .. कलाकारांच्या सहजसोप्या आणि तरीही अत्यंत सुरेख अभिनयात .. चित्रपटाच्या अर्थपूर्ण गाण्यात .. दिग्दर्शकाच्या साधेपणात ... कारण, या अशा जुन्या चित्रपटात भपकेबाज असं काहीही नाही तसंच उथळपणाही पूर्णपणे वर्ज्य..
चित्रपटगृहातून बाहेर पडताना एकूण एक सानथोर प्रेक्षक नक्कीच या जीवनाप्रती समृद्ध होऊन जात असणार यात शंका नाही.
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(copyright@mohinee gharpure deshmukh)

छान रसग्रहण,हा चित्रपट मी लहान असताना पाहिलेला आता कथानक इ काहीच आठवत नाही पण हे गाणं अजून पण गुणगुणल जात
उत्तर द्याहटवाधन्यवाद .. आपलं नाव कळू शकेल का .. ?
उत्तर द्याहटवा