मगर असली इन्सान वो है
जो लेहेरोंको चीरकर आगे बढता है
अक्षरशः रक्त उसळवून टाकणारी ही कॅचलाईन आणि त्याभोवती फिरणारा संपूर्ण चित्रपट.. आजही पाहिला तरीही रक्त उफाळून येतं. आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार याविरूद्ध आवाज उठवण्याची शारिरीक शक्ती आपल्यासारख्या सामान्य माणसात नाही म्हणून कित्तीतरी वेळा आपण गपगुमान निमुट राहून अन्याय सहन करून घेतला आजवर ते सारे सारे प्रसंग क्षणात डोळ्यासमोर दिसून जातात.. आणि जाणवतं, आपणही अप्रत्यक्षपणे गुलामच आहोत .. या बलशाली सिस्टीमचे, या जगातील आपल्याहून प्रत्येक अधिक बलवान माणसाचे.. आपल्या मनातला माणूस वेगळा आणि प्रत्यक्षात आपण कुणीतरी वेगळेच .. या सिस्टीमनी आपल्याला जे बनवलं .. आपण फक्त तेवढेच .. तेवढ्यापुरतेच.. तेच तेच करत जगणार आणि एक दिवशी कुठेतरी मरणाला सामोरे जाणार.. माणूसपण हे एवढं छोटं आहे का .. ? नाही .. पण तरीही आपण घाबरतो, विरोध करायला, अन्यायाविरूद्ध आवाज उठवायला, आपण घाबरतो एकटे पडायला, आपण घाबरतो आपल्या कळपाविरूद्ध आपलं मत मांडायला..
प्रत्येक माणसाचा एक एक कळप .. एक एक गट .. त्या गटाचा एक एक 'दादा' किंवा 'भाई' किंवा कोणीही व्यक्ती जो त्या कळपावर राज्य करतो. त्याच्या विरूद्ध जाण्याची आपल्यात हिंमत नाही.. आपण साले त्या 'जय'सारखे (रजत कपूर) .. स्वार्थी.. सुखलोलूप .. पण आपल्याला माहितीये की आपल्या प्रत्येकात एक सिद्धार्थ मराठे (आमीर खान) आहे.. आपल्याला माहितीये.. आपल्याला ती सिद्धार्थची वकीलीणबाई (मीता वसिष्ठ) .. म्हणजे आपलं मन वेळोवेळी योग्य वाट दाखवत असतं.. पण तरीही आपण घाबरतो. शरीराला जरासं खरचटलं तरीही व्याकूळ होणारे आपण .. अन्यायाविरूद्धच्या लढाईत मृत्यूला कवटाळण्यापर्यंत स्वतःचं अपरिमीत नुकसान तर सहनच करू शकत नाही.
' कशाला ते नसतं झेंगाट .. अन्यायाला वाचा फोडायची वगैरे काही नसतं.. सब बक्वास है बक्वास ..' असं कधीतरी आपल्यातल्या सिद्धार्थला वाटतं आणि आपण गप्प बसतो. दिवसागणिक कोणावरी तरी अन्याय होतो .. कोणालातरी लुबाडलं जातं, चोरी डाका बलात्कार दिवसागणिक होतात पण आपण स्वतःला त्या सगळ्यातून लांब ठेवतो. सकाळी उठल्यावर पेपर चाळताना या सगळ्या घटनांच्या बातम्या चहासोबत गिळून टाकतो. अन्यायाविरूद्ध आवाज कोण उठवणार आपल्यात तेवढी हिंमत नाही हेसुद्धा आपण केव्हाच मान्य करून टाकलेलं असतं.. मग जेव्हा एखादा दिवस आपला येतो ना .. त्या सिद्धार्थवर येतो तसा .. सख्खा भाऊ त्याला बॉक्सिंगच्या मॅचमध्ये जिंकण्याऐवजी हरायचा 'आदेश' देतो .. कारण त्या मॅचवर त्याच्या मालकाचे .. रॉनीचे पैसे लागलेले असतात, त्यावेळी सिद्धार्थला हतबल व्हायला होतं.. मार खाऊन खाऊन तरी मरून जाऊ असा स्वतःच्या हतबलतेवर राग काढत काढत तो मरेस्तोवर मार खाऊन घेतो पण अन्यायाविरूद्ध ओरडत नाही.. कदाचित आपण विरोध केला तर आपल्या भावाचं कसं होईल या प्रेमापोटी .. हे प्रेमाचे पाश .. हे स्वार्थाचे पाश .. आणि जीवनाची आस .. या साऱ्या गुंतागुंतीचाच फायदा घेत बलवान माणूस दुर्बलाचं शोषण करत रहातो आणि दुर्बल माणूस 'आपलं जीवन महत्त्वाचं' या विचाराने शोषण होऊ देत रहातो.. इथेच तर खरी मेख आहे ...
लेहेरोंके साथ तो कोई भी तैर लेता है .. मगर असली इन्सान वो है जो लेहेरोंको चीर कर आगे बढता है ..
मग एखाद्याच माणसातला हरी.. तोच हरी (अक्षय आनंद) .. ज्याला रौनक सिंगविरूद्ध आवाज उठवण्यासाठी रौनक पूलावरून खाली ढकलून देतो.. मारून टाकतो.. असा हरी .. जो कायदेशीर मार्गाने अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याचं जगण्याचं एकच साधंसरळ तत्वज्ञान असतं, 'जब भी आईने के सामने खुद को देखूँ ना तो मुझे अपने आप पे शरम ना आए .. बस' ... हा हरी .. कधीतरी तुमच्याआमच्यातच भेटतो .. एखादाच हरी .. त्याला पाहिलं की स्वतःच्या बुजदिल असल्याची लाज मनात दाटते .. क्षणभर का होईना .. आपण आपली नजर त्याच्या ठाम नजरेपासून चोरतो.... आणि अशा हरीपासून आपण सोयीस्करपणे आणि जाणीवपूर्वक लांब रहातो.. तुम्ही आम्ही .. आपल्यासारखी सामान्य माणसं.. मग पुन्हा आपल्या मनात .. आपल्या कानात जणू ती वकीलीण बाई बोलते.. पुन्हा पुन्हा सांगत रहाते, ' जो सिद्धार्थसे हुआ उसकी वजह उसके हालात है .. भूख, गरीबी जैसे हालातसे वो बचपन से लढ रहा है .. इन हालातोंकी वजहसे न उसे कही प्यार मिला होगा ना ही कभी सम्मान.. फिर वो बेचारा क्या करेगा ...?' स्वतःच्या कानात ही वाक्य स्वतःच मन बोलतं आणि तितक्यात याच सगळ्यावर आपलंच दुसरं मन .. जणू सिद्धार्थचा तो कोर्टात आलेला मित्र बनून या सगळ्या तत्वज्ञानाची खिल्ली उडवत पुन्हा एकदा आपल्या स्वार्थी वृत्तीला खतपाणी घालतं. मनातल्या वादळाचे तरंग मनातच रहातात आणि पुन्हा आपण स्वार्थापोटी आपल्यापुरतं जगायला लागतो... कोर्टात वकीलीणबाईच्या पर्समधून चारशे रूपये चोरणारा सिद्धार्थ आपल्यातचं आपण पहातो .. पण वकीलीणबाईला म्हणजे आपल्या मनाने आपल्याला केव्हाच पकडलेलं असतं नि आपल्याला जणू त्याचा पत्ताही नसतो.
मग जेव्हा अन्यायाचा राक्षस वाढत जातो नि एके दिवशी आपल्याच घराकडे त्याची नजर वळते तेव्हा हतबलतेनी, घाबरटपणे लपून बसणारी ती सगळी जनता ... ते सगळे मोहोल्लेवाले .. आपण त्यांच्यातलेच एक बनून जातो. जीवन लाख मोलाचं हे आपल्या मनावर इतकं बिंबवलेलं असतं की त्यापुढे जीवन किती जगलात यापेक्षा कसं जगलात हे जास्त महत्त्वाचं हा उदात्त विचार केव्हाच आपण मागे टाकलेला असतो. मग रौनक सिंग येतो.. आपलं रक्त पीतो.. आपल्यावर जुलूम अत्याचार करत रहातो पण आपण स्वतःतली शक्ती ओळखूच शकत नाही. "वो जुल्म करता है .. क्योंकी तुम सब जुल्म सेहेते हो ..." हरी आपल्या कानात सांगतो.. पण आपण तरीही वाट बघत रहातो.. कधीतरी कोणीतरी येईल आणि आपल्याला या संकटातून वाचवेल या आशेवर जगतो... हीच ती खोटी आशा .. कारण असं कधी कोणीच येणार नसतं.. आपल्याला आपल्यातल्या सिद्धार्थलाच जागवायला लागतं.. आणि तो जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत आपण जणू 'जिंदा लाशे ..' आजवर पिढ्यान्पिढ्या हेच होत आलेलं आपणही पाहिलंय..
सिद्धार्थच्या वडीलांनीही (दलिप ताहील) स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याच्या आपल्या कहाण्या आपल्या मुलांना जय आणि सिद्धार्थला कित्तीतरी वेळा ऐकवलेल्या असतात .. पण त्यांनी हे कधीच सांगितलेलं नसतं, की ते स्वतः इंग्रजांच्या अत्याचाराला बळी पडले आणि त्यांनीच त्यांच्या मित्रांची, जे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते त्यांची नाव इंग्रजांना सांगितली. या एका चुकीपायी ते सगळे पकडले गेले आणि वडील सुटले.. ते सर्वांपासून दूर अनोळखी ठिकाणी जाऊन वसले खरे पण त्यांना माहित होतं त्यांनी काय केलंय ते .. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या मुलांना शूर बनवायचं होतं. शेवटी जेव्हा वडीलांचे ते मित्र, श्यामसुंदर अगरवाल (आशुतोष राणा) त्याचा शोध घेत घरी पोचतात, तेव्हा लहानग्या सिद्धार्थला खूप आनंद होतो.. आजवर वडीलांकडून यांचं नाव त्यानं कित्तीतरी वेळा ऐकलेलं असतं.. पण आज श्यामसुंदर तिथे वडीलांना शिक्षा द्यायला आलेले असतात हे त्या लहानग्या जीवाला कसं कळणार .. ? त्याच्या कानांनी तो ते सगळे आरोप ऐकतो जे श्यामसुंदर त्याच्या वडीलांवर करत जातात आणि त्यांचा आत्मसन्मान क्षणात दुभंगून जातो.. श्यामसुंदर निघून गेल्यावर आपल्या मनाशी हरलेले सिद्धार्थचे वडील स्वतःला पेटवून घेतात आणि जीवन संपवून टाकतात.. सिद्धार्थच्या आणि जयच्या जीवनाची आणि कोवळ्या मनांची त्या आगीत जणू राखरांगोळी होते.

पुढे जयला हेच लक्षात रहातं की आपले वडील कायर होते.. वडीलांची हीच डागाळलेली प्रतिमा मनात घेऊन जय स्वतःही चुकीच्या वाटेवर चालत निघतो.. आणि त्याचा लहान भाऊ त्याचा हात धरून त्याच वाटेने पुढे पुढे जातो. पण सिद्धार्थचा आतला आवाज त्याला प्रसंगानुरूप जागं करत असतो. एके दिवशी त्याला ते कळतं जे वडील जन्मभर सांगण्याचा प्रयत्न करत होते.. समजावत होते.. असली इन्सान वो है जो लेहेरोंको चीरकर आगे बढता है .. आपले बाबा चांगली व्यक्ती होते फक्त ते कमजोर होते .. आपल्या सगळ्यांप्रमाणे आणि म्हणूनच ते आपल्याला जसा माणूस घडवू इच्छीत होते .. मी तसा माणूस होणार .. हे एक दिवशी सिद्धार्थ ठरवतो आणि त्याच्या जीवनात नवी पहाट उगवते.
जय मात्र हरतो.. खुद्द रौनकच त्याला एके दिवशी ठार करतो. बळी तो कान पिळी या न्यायाने जयचं जीवन रौनक सिंग एक ना एक दिवस संपवू शकणार हे तर सगळ्यांना माहिती असतंच.. पण सिद्धार्थ जेव्हा जयचं न ऐकता रौनक सिंगविरूद्ध आवाज उठवतो तेव्हा जयसारख्या स्वार्थी माणसाला हरावं लागणार हे तर नक्कीच असतं ना.. तरीही जय सिद्धार्थला अडवतो.. पाऊल मागे घे म्हणून हरप्रकारे समजावतो.. पण आज सिद्धार्थला जाणवलेलं असतं की तो जे करणार आहे तेच योग्य आहे .. तो आज आयुष्यात पहिल्यांदा आपल्या भावाला जाब विचारतो .. "तुम तो मेरे बडे भाई थे ना .. तो तुमने मुझे गलत रास्तेपे चलनेसे क्यो नहीं रोका .. रौनक सिंगने जब मुझे बॉक्सिंगमें हारने को कहा तब तुमने उसे क्यों नही रोका.. क्यों नहीं कहा के मै तुम्हारा भाई हूँ .. मै उसे हारने को नही कहूँगा .. अब भी वक्त है दादा.. तुम भी मेरे साथ कोर्टमें रौनक सिंग के खिलाफ गवाही दो" अशा शब्दात त्याला विनवतो .. पण जयला माहीत असतं, की तो या वाटेवर फार पुढे निघून आला आहे.. आता त्याच्यासाठी परतीचे दोर नाहीत.. आता केवळ समोर मृत्यूच आहे.. आणि तस्सच होतं..
स्वतःच्या भावाला मेलेलं पहाताना सिद्धार्थचं रक्त आता दुपटीनं उसळून येतं. आपल्या गर्लफ्रेंडच्या, आलीशाच्या (राणी मुखर्जी) भावाला, हरीला आपल्या माध्यमातून रौनकनी ठार केल्याचं जेव्हा त्याला कळलेलं असतं त्या क्षणी त्याला राग, संताप, विश्वासघात, हतबलता या सगळ्या भावनांनी घेरलेलं असतं .. आणि आज जेव्हा जयलाही त्यानी संपवलं हे स्वतःच्या डोळ्यांनी तो बघतो तेव्हा तर त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. हे सगळं कधी आणि कसं थांबेल याची वाट बघणाऱ्या स्वतःतल्या भ्याड निष्काळजी सिद्धार्थमधला माणूस आज खऱ्या अर्थाने जागा होतो...
हा असतो तो 'असली इन्सान ...' जो अखेरीस सगळ्या मोहोल्ल्यासमोर रौनक सिंगला हरवतो.. त्याच्याशी लढतो.. स्वतःच्या जीवावर उदार होऊन .. पण आज त्याची लंका जाळूनच मग मोकळा श्वास घेतो..
... आणि आपल्या बाबतीत बोलायचं तर हा सिद्धार्थ म्हणजेच ते आपलं जागं झालेलं अंतर्मन.. ते अन्यायाविरूद्ध पेटून उठेल तेव्हा भल्याभल्यांची लंका जाळून टाकेल.. दिवसागणिक आयाबहीणींवर होणाऱ्या अत्याचाराला सुरूंग लावेल .. शोषणकर्त्यांना ठार करून पोषणकर्ता होईल .. पण हे सगळं कधी होईल .. त्यासाठी आपला आतला आवाज सदैव जागा ठेवला पाहिजे.. आपल्या सच्चेपणाला साथ पाहिजे.. आपल्यात एकोपा पाहिजे.. आणि जेव्हा हे सगळं जमून येईल तेव्हा आपली मातृभूमी खऱ्या अर्थाने शोषणमुक्त होईल..

![]() |
फोटो - गुगल साभार |

जय हिंद ..
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(सर्व फोटो गुगलवरून .. साभार)
बऱ्याच दिवसांनी लिखाण झालं. नेहमीप्रमाणे छान आहे, विषयाला धरून आपलं मत परखडपणे मांडलंय.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा