![]() |
p.c.bollywoodhungama.com |
एव्हाना तुम्ही हा चित्रपट कोणता ते ओळखलही असेल .. बरोबर नं..?
लक्ष्य .. माझा अत्यंत आवडता चित्रपट.
तसं म्हणाल तर देशभक्तीपर चित्रपटांमध्ये फार फार आवडणारे माझे दोनचार चित्रपट आहेत त्यापैकी या चित्रपटाने मनावर अक्षरशः गारूड केलंय.
आजपासून तब्बल सतरा वर्षांपूर्वी सिनेमागृहांमध्ये झळकलेला हा चित्रपट.. तेव्हा सिनेमागृहात जाऊन पहाताना जेवढा रोमांचकारी वाटला तेवढाच तो त्यानंतरही कित्ती कित्ती वेळा पाहिला आणि पुन्हा पुन्हा देहात, मनात तेच ते 'भारतीयत्वाचं', 'देशप्रेमाचं' स्फुरण चढलं. अक्षरशः शरीरातील प्रत्येक धमन्यांमध्ये, प्रत्येक नसांमध्ये कोणीतरी देशभक्तीचं इंजेक्शन टोचून द्यावं आणि त्यानंतर जीवनाचा प्रत्येक क्षण आपण केवळ आपल्या या मायभूमीसाठीच देत जगावं असं वाटणं हे या चित्रपटाचं घवघवीत यश. लक्ष्य नावाच्या या चित्रपटाचं अजब आणि अत्यंत उच्चदर्जाचं रसायन बनवणारा दिग्दर्शक फरहान अख्तर. या चित्रपटातील करन शेरगिलची भूमिका अप्रतिमरित्या सादर करणारा हँडसम हंक ह्रत्तिक रोशन, रोमिला दत्ताची भूमिका जिवंत करणारी गोड गोड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि त्यांच्याबरोबर एकूण एक भूमिकेत दिसलेले सगळेच्या सगळे कलाकार केवळ कसदार ..
देशभक्तीपर चित्रपटाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पोहोचवण्याचा विचारच मुळात त्याकाळी नवीन. करन शेरगिल .. एक असा नायक जो त्याकाळाच्या तरूणाचं प्रतिनिधित्त्व करतो. असा तरूण ज्याच्या पायाशी आईवडीलांनी सगळी सुखं आणून ठेवली आहेत. त्यामुळे सुखलोलूप झालेल्या नायकाकडे ' जीवन हे स्वतः जगायचं असतं आणि त्यासाठी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः पेलायची असते ' हा विचारच नाही. आजचा दिवस उपभोगला की झालं .. भविष्याचं ओझं कशाला ? ही याची वृत्ती. मग जेव्हा खरी वेळ येते स्वतःचं जीवन उभारण्याची तेव्हा याला लक्षात येतं की अरे आपल्याला तर साधे स्वतःसाठी निर्णयही घेता येत नाहीयेत, किंबहुना, आपण इतके चंचल की आपलं अजूनही काहीच ठरलेलं नाहीये आणि तो स्वतःलाच प्रश्न विचारतो,
" मै ऐसा क्यूँ हूँ ..? मै ऐसा क्यूँ हूँ ...? करना है क्या मुझको ये मैने कब है जाना ..? लगता है गाऊंगा जिंदगीभर बस ये गाना ? "
याच वैचारिक गोंधळात असताना अखेर एकदा मित्राचं पाहून म्हणा करन शेरगिल धाडकन आर्मी जॉईन करायचा निर्णय घेतो. ज्या मित्राच्या भरोसे तो हा निर्णय घेतो त्या मित्राने पुढच्याच भेटीत आपण आपला निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलेलं असतं.. आता करनला प्रश्न पडतो .. " मै अकेला आर्मीमें जाके क्या करूंगा यार ..मै वहाँ बोअर हो जाऊंगा !" घरी कळल्यावर अर्थातच आईवडील चिंतातूर होतात आणि त्याची चांगली खरडपट्टी काढतात.. आणि यामुळेच तर तो आता इरेलाच पेटतो .. आपल्या गर्लफ्रेंडला, रोमिलाला भेटून चक्क उसनं अवसान आणत सांगतो .. "मै बस आर्मी ज़ॉईन करूंगा .. मुझे तो बस अब यही करना है.." तिला मनातून अभिमान वाटतो पण तरीही ती त्याला समजावते.. "हे बघ .. तू उगाचच इरेला पेटून निर्णय घेत असलास तर पुन्हा विचार कर एकदा..!" पण छे.. आता त्याचा अहंकारही जागा झालेला असतो. तो पुढे पाऊल टाकतो. आर्मीची प्रवेश परिक्षा देतो आणि नशीबानेच म्हणा चक्क पास होतो. आईवडीलांना आश्चर्य वाटतं पण ते गप्प बसतात..
आता करन सैनिकी प्रशिक्षणासाठी जातो पण तो करन असतो नं .. आळशी, कामचुकार आणि मुख्य म्हणजे कोणत्याही गोष्टीत जो अजिबात सिरीयस नाही असा मुलगा.. अर्थातच अशा व्यक्तीमत्वाला ते सैनिकी प्रशिक्षण कसं झेपणार ? आणि आठवडाभरातच एकापाठोपाठ एक चुका करत शिक्षा घेत आणि अपमानित झाल्याचं वृथा दुःख मनाशी बाळगून अखेर करन तिथून एका रात्री पळच काढतो. घरी परतल्यावर वडील आणि आई काहीसं चुचकारतात पण त्याची पाठ वळताच म्हणतात, "मै जानता था .. ये वापस जरूर आएगा .." वडीलांचे हे शब्द कानावर पडतात तेव्हा करनला स्वतःविषयी लाज वाटते पण खरी खरडपट्टी तर रोमिला .. करनची गर्लफ्रेंड काढते जेव्हा तिला तो सांगतो की मी ते सगळं सोडून कायमचा परत आलो. रोमिला हे ऐकताच हादरते.. तिच्या नजरेतून तो उतरतो.. 'आयुष्यात खूप मेहनतीनी एक निर्णय घेतलास आणि त्यावरही ठाम राहता आलं नाही तुला ..? आज तू ते सोडून पळून आलास.. उद्या मलाही असाच सोडून देशील..' असं सडेतोड सुनावते आणि अखेरीस जो स्वतःच्या निर्णयावर ठाम नाही अशा मुलाचं तोंडही पहाणार नाही असं म्हणून निघून जाते. एवढा वेळ स्वतःच्या कृतीची लाज वाटूनही त्याकडे दुर्लक्ष करणारा करन त्याक्षणी खरा अपमानित होतो. अपमान म्हणजे काय हेही ज्याच्या तोवर गावी नसतं त्याला अपमान, अपयश, अवहेलना सारं सारं एका क्षणात ती जाणवून देते आणि तो खऱ्या अर्थाने आता जागा होतो.. त्याच्या मनातल्या लाजेचं रूपांतर आता पश्चात्तापात झालेलं असतं.. तो थेट पुन्हा लष्करी प्रशिक्षण संस्थेत जातो नि आपल्या कृत्याची माफी मागतो. लष्करही त्याला त्यांच्या अटींवर व त्याने केलेल्या चुकांची शिक्षा देऊनच परत सामावून घेतं.. आणि आता त्याला त्याच्या जीवनाचं 'लक्ष्य' सापडलेलं असतं.
' हा यही रस्ता है तेरा तूने अब जाना है .. हा यही सपना है तेरा तूने पहचाना है .. रोके तुझको आँधिया या जमीं और आसमाँ पाएगा जो लक्ष्य है तेरा .... लक्ष्य तो हर हाल मैं पाना है ..'
एकेका क्षणाला करन बदलत जातो.. आणि आता त्यातून एक खराखुरा धैर्यशाली, बलशाली आणि जीवनाला गंभीरपणे घेणारा सैनिक जन्माला येतो. 'करन शेरगिल' ते 'लेफ्टनंट करन शेरगिल' हा प्रवास पूर्ण होतो.. पण खरी कसोटी असते ती युद्धभूमीवर आणि अर्थातच एलओसीवरून घुसखोरी करून जेव्हा शत्रू आत शिरल्याची बातमी येते तेव्हा लेफ्टनंट कर्नल शेरगिल प्राणांची बाजी लावून खिंड लढवतात. सुरूवातीच्या दोन चकमकींमध्ये सैनिकांचे मृत्यू प्रत्यक्ष पाहून काहीसा व्याकूळ होणारा हा नवा गडी तिसऱ्या पण अंतिम आणि अत्यंत अवघड अशा युद्धाच्या वेळी स्वतःहूनच आपल्या बटालियनच्या अधिकाऱ्याला, 'टायगरला' शब्द देतो .. 'सर.. मी हे मिशन यशस्वी करीन अन्यथा मी जीवंत माघारी परतणार नाही ' आज या शब्दाला धार आलेली असते.. यात स्वाभिमान, देशप्रेम नि जिद्द रसरसून भरलेली असते. त्याच्याकडे पहाताच त्याच्यातील सच्चेपणा टायगरला (अमिताभ बच्चन) जाणवतो आणि मग सुरू होते अंतिम लढाई.. लढाईवर निघता निघता बटालियनचे जुने अनुभवी सरदार प्रीतम (ओम पुरी) लेफ्टनंट करनला आपल्या अनुभवाचे बोल सांगतात, 'सर .. जीत जाओ तो एकदम खुश मत हो जाना .. ये दुश्मन एक बार फिर पलटके वार करता है .. मेरी बात ध्यान में रखना..' आणि 'याद रखूंगा' म्हणत ते आपल्या छोट्या बारा जणांच्या तुकडीसह आगेकूच करतात. ही अंतिम लढाई .. मोठ्या पडद्यावर पहाताना तेव्हाही पोटात गोळा आला होता. अंगावर शहारे आले होते.. आणि हे सगळं मी हा चित्रपट पहाताना दरवेळी तसंच्या तसं अनुभवते.. अगदी आजही..! ती अंतिम लढाई .. जेव्हा लेफ्टनंट करन शेरगिल त्या उंचउंच पहाडाच्या भिंतीवर चढाई करायला सुरूवात करतात .. त्या एका छोट्याशा आडव्या दगडावर पोहोचेपर्यंत आणि तिथे पोहोचलेले ते सहा जण रात्र होईपर्यंत त्या उंचीवर बसलेले पाहून आजही अंगावर काटा येतो.. स्टूडीओतली दृश्य असली तरीही किती जिवंत केलंय ते सगळं नै .. ? आणि मग रात्रीच्या काळोखात त्या सुळक्यावर क्लाईंबिंग करत चढाई करून अखेर शत्रूशी लढाई करणारे आपले सैनिक .. गोळीबार, बाँबहल्ला.. कानावर पडणारे सुईंसुईं.. धाडधाड धाडधाड असले आवाज आणि अखेर अंतिम निर्णायक क्षण.. दुश्मन पळून जातात. शेवटी भारतीय सैनिकांपैकी दोघंच उरतात.. आणि आता पहाट होणार .. तिरंगा मोक्याच्या जागी लहरवण्याची वेळ जशीजशी जवळ येते तसतसे ते दोघे मनात आनंदून पण तरीही अत्यंत सावधपणे लपून बसलेले.. कारण, सरदार प्रीतमचा सल्ला ..आणि त्यांचे शब्द खरे ठरतात .. शत्रू पुन्हा तिथे येऊन पोचतो पण लेफ्टनंट करन यावेळेचीच जणू वाट पहात असतात आणि एका क्षणात सगळ्यांवर गोळ्यांचा वर्षाव करत ते शत्रूला ठार करतात.. आता आपल्या जखमांचा, वेदनेचा सारा भार त्यांना कस्पटासमान वाटायला लागतो आणि खिशातून तिरंगा उलगडत आपल्या जखमी पायाला फरपटत पुढे ओढत ओढत ते ठरल्या जागी तिरंगा लेहरवतात आणि पलिकडे दूरवर असलेल्या आपल्या तुकडीला फायरिंग करून त्याद्वारे विजयश्रीची गर्जना करतात..
'लक्ष्य तो हर हाल मैं पाना है ..' आणि जीवनाचं एक महत्त्वाचं लक्ष्यं त्याक्षणी करननी प्राप्त केलेलं असतं. अर्थातच पुढचं लक्ष्य म्हणजे रोमिलाशी लग्न .. आणि ती या संपूर्ण युद्धाची साक्षीदार असतेच.. एक वार्ताहर म्हणून तीही तिथेच असते.. आणि याच क्षणाची तीही आतुरतेने वाट पहात असते. लेफ्टनंट करन शेरगिल रोमिलाला लग्नाची मागणी घालतात आणि एकेकाळी जिच्यामुळे आपल्या जीवनाला ध्येय मिळालं त्या मुलीशीच लग्न करण्याचा सुवर्णक्षण त्यांच्या आयुष्यात येतो. एकेकाळी ज्या मुलाला आपण नाकारलं तो केवळ आपल्या एका झिडकारण्याने एवढा पेटून उठेल याची सुतरामही कल्पना नसलेल्या त्या मुलीला अशा जिद्दी आणि आपल्यावर निरातिशय प्रेम करणाऱ्या नवऱ्याची बायको होण्याचा मान मिळणं हेच तर तिचंही भाग्य नाही का..?
या अशा सुवर्णक्षणावर चित्रपट संपतो आणि तुमच्या माझ्यासारख्या हज्जारो तरूणांच्या तरूणींच्या मनात देशप्रेम, जिद्द, चिकाटी अशा मूल्यांची रूजवात करून जातो.
' कितनी बाते याद आती है .. तसवीरेसी बन जाती है .. मै कैसे इन्हे भूलूँ ..?' असं म्हणत म्हणत हज्जारो तरूण व्याकूळतेने आपापल्या भूतकाळात शिरतात... तर हज्जारो तरूणींच्या मनात .. ' कितनी बाते केहेनेकी है .. होठोंपर जो सेहमीसी है .. एक रोज इन्हे सुनलो!' अशा भावना अखेरीस उमटत रहातात.. कारण, कदाचित असे कित्तीतरी 'करन शेरगिल' या चित्रपटानंतर जीवनाकडे गंभीरतेने पहायला लागले असावेत आणि कित्तीतरी तरूणींनी पुढे त्यांची वाट पाहिली असावी.. पण आज ते पुन्हा माघारी परतून आले शकलेही नसतील.. कदाचित .. ! प्रेमाच्या गोष्टीत अडखळले असले तरीही असे अनेक 'करन' मात्र या चित्रपटानंतर जीवनाच्या लढाईत अग्रणी राहिले असतील आणि त्यांच्या प्रेयसी आता कदाचित मनात त्यांची आठवण अभिमानानेच जपून असतील .. कदाचित ..!
या देशाने .. या मातृभूमीने हे असं उच्च प्रेम करायला आम्हाला शिकवलंय.. आणि सर्वात श्रेष्ठ तर आमचं देशप्रेमच आहे आणि त्यासाठी आम्ही हे असे स्वतःला झोकून देऊ, त्यासाठी आमची जिद्द तसुभरही कमी पडणार नाही हाच संस्कार जाता जाता हा चित्रपट मनावर कोरून जातो... तो कायमचाच !!
' लक्ष्य तो हर हाल मै पाना है ' हा एकट्या एकट्याचा प्रवासच पुढे आम्हाला ' कंधो से मिलते है कंधे कदमोंसे कदम मिलते है .. हम चलते है जब ऐसे तो दिल दुश्मन के जलते है ..' या वाटेवर घेऊन जातो .. आणि जात राहील यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा