गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

उपवास स्पेशल रेसिपी

दही पापड चाट

तर मंडळी, उपवासाच्या दिवशी काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह झाला तर हे दही पापड चाट ट्राय करा ..

उपवासाचे पापड तळून घ्या.

त्यावर मस्त चमचा चमचा दही घाला.

या दह्यावर आता तिखट, मीठ, पिठीसाखर आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरवा..

तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नका घालू .. 😂

आता मस्त आरामात बसा आणि झटपट खाऊन टाका ..


टीप

१. तुम्ही सगळे पापड क्रश करून मग दही, तिखट मीठ पिठीसाखर घालूनही खाऊ शकता .. भेळेसारखं 😇

२. खूप पापड दही घालून एकदम तयार करू नका .. ते मऊ पडतील


आणि आता हे सगळं वाचून म्हणू नका," अगं .. मीही अगदी हे अस्सेच पापड करून दह्याबरोबर खाते"

😏😏

😊😃😊😊😊😊😊

- मोहिनी

#रेसिपी_में_ट्विस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश