शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

चला सोबतीने लिहूया !

 नमस्कार 

सर्वप्रथम माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांचे आभार.

गेली अनेक वर्षे सातत्याने मी माझ्या ब्लॉग विविध विषयांवर अपडेट करत असते. त्यामुळेच आता माझ्या ब्लॉगवर तब्बल 37 हजारहून अधिक वाचक मित्र ( Live visitors count नुसार ) जोडले गेलेले आहेत हे मला आज अभिमानाने सांगावेसे वाटते. 

अनेक वर्ष मी वर्तमानपत्र, मासिकं, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून सातत्याने लिहीत आलेली आहे कारण माझं लेखनावर फार फार प्रेम आहे. मला असं वाटतं, की जेव्हा आपण लिहीतो तेव्हा आपल्यातील नैराश्य, वैचारिक गोंधळ सहज दूर होतात. शाळेपासून आपण भाषा शिकतो त्यात पहिली पायरी ही पाटीवर अक्षरं काढण्याची चढतो. अर्थात, तिथूनच खरंतर प्रत्येकाच्याच लेखन प्रवासाची सुरूवात होत असते. माझ्यासारखी अनेक मंडळी पुढे आपला आपला लेखनमार्ग शोधतात आणि त्या मार्गाने पुढे जात रहातात. कोणी ब्लॉग लिहीतं, कोणी कथा, कोणी कादंबऱ्या, कोणी कविता आणि कोणी कोणी चक्क नियमीतपणे डायरी लिहीताना दिसतं. एकूणच लेखन ही कला मनःशांती देणारी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच माझ्या सर्व वाचकांसाठी मी आज हा लेखन उपक्रम घेत आहे. आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि आपल्या लेखणीने कल्पनेच्या भराऱ्या माराव्यात एवढ्याच निखळ हेतूने हा उपक्रम आहे. ही स्पर्धा नाही, त्यामुळे बक्षीसं वगैरे नाही, पण आपण आपल्या विचारचक्रात, दिनचक्रात अडकलेलो असताना जेव्हा आपल्याला कल्पनेच्या भराऱ्या मारायची संधी मिळते तेव्हा आपला मेंदू पहा कसला जबरदस्त काम करतो आणि चटकन् फ्रेश होतो !

थोडक्यात काय, लेखकांच्या मेंदूला माझ्याकडून हा खाद्य पुरवठा ...

चला, डोकं लढवा आणि जे सुचतंय ते लिहा...

खाली मी तीन चित्र पोस्ट करते आहे. या चित्रांवरून तुम्हाला जे काही सुचेल ते कमेंट करून लिहायचे आहे. चित्रासोबत मुद्दाम क्रमांक दिलेले आहेत. आपणही कमेंट करताना मला नेमकं तुम्ही कोणत्या चित्राविषयी काय लिहीत आहात हे कळण्यासाठी चित्र क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करावा ही नम्र विनंती. 

आपण कमेंट पोस्ट करताना त्यासोबत आपले नाव, वय, शहर, मोबाईल क्रमांक आणि चित्र क्रमांक असा तपशील लिहून कमेंट करावी. 

चित्र क्रमांक 1 - 



चित्र क्रमांक 2 


चित्र क्रमांक 3 - 




ऑल द बेस्ट... बघूया, कोणाकोणाला काय काय लिहायला सुचतं... तुम्ही वरीलपैकी कितीही चित्रांवर कोणत्याही प्रकारचं लेखन करू शकता.

चला, विचार करा आणि लिहायला बसा...

धन्यवाद

मोहिनी घारपुरे - देशमुख  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

Should Art meet us Halfway?