आज पुन्हा प्रत्यय आला
कुणी नसे रे जगी कुणाचा
पैसा प्रसिद्धी सबकुछ झूटा
कर्ता करविता तोच खरा ।
कोण कुणाची शिकार करतो
कोण तयास भरीस घालतो
मित्रत्त्वाचे खोटे बुरखे
जो तो इथे जगी पांघरतो ।
अखेर येते जेव्हा वेळ
जो तो काढे तत्काल पळ
देई झटकून नातीगोती
असाच चाले सारा खेळ ।
सलमान असो वा असो कुणी
दोषी असता होई शिक्षा
मात्र न उरती मित्र तया
जे करीत होते त्यासह मजा।
अशीच आहे दुनिया सारी
जर तुम्ही न ओळखाल खरे चेहरे
संकटकाळी जे न उरती
ते कसे हो मित्र खरे ?
ते फक्त तोंडपुजे अन्
तयांस हवी केवळ मौजमजा
दूरच रहावे अशांपासून
अन्यथा मिळते आपल्यालाच सजा ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख
कुणी नसे रे जगी कुणाचा
पैसा प्रसिद्धी सबकुछ झूटा
कर्ता करविता तोच खरा ।
कोण कुणाची शिकार करतो
कोण तयास भरीस घालतो
मित्रत्त्वाचे खोटे बुरखे
जो तो इथे जगी पांघरतो ।
अखेर येते जेव्हा वेळ
जो तो काढे तत्काल पळ
देई झटकून नातीगोती
असाच चाले सारा खेळ ।
सलमान असो वा असो कुणी
दोषी असता होई शिक्षा
मात्र न उरती मित्र तया
जे करीत होते त्यासह मजा।
अशीच आहे दुनिया सारी
जर तुम्ही न ओळखाल खरे चेहरे
संकटकाळी जे न उरती
ते कसे हो मित्र खरे ?
ते फक्त तोंडपुजे अन्
तयांस हवी केवळ मौजमजा
दूरच रहावे अशांपासून
अन्यथा मिळते आपल्यालाच सजा ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा