महामानवा तूच खरा
देशाचा शिल्पकार
तुझ्याविना कोणी न दिला
राष्ट्राला आकार ।
डावे उजवे खेचती आम्हा
न दाविती योग्य दिशा
तुझी घटना अखेरीस येते
कामी प्रत्येकाच्या।
राजकारण्यांच्या खेळामध्ये
आम्ही जळत आहोत
तुझ्यासम बुद्धीवंताची
वाट बघतो आहोत ।
तुझ्या पाऊलखुणांवर
कोणी चालेल का पुन्हा?
आपुल्या देशाला योग्य दिशा
कोणी दावेल का पुन्हा? ।
हाच प्रश्न आम्हा आता
दिनरात छळतो आहे
महामानवा तुझ्यासम नेत्याची
आम्ही वाट बघतो आहे ।
- मोहिनी घारपुरे -देशमुख
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम 💐
देशाचा शिल्पकार
तुझ्याविना कोणी न दिला
राष्ट्राला आकार ।
डावे उजवे खेचती आम्हा
न दाविती योग्य दिशा
तुझी घटना अखेरीस येते
कामी प्रत्येकाच्या।
राजकारण्यांच्या खेळामध्ये
आम्ही जळत आहोत
तुझ्यासम बुद्धीवंताची
वाट बघतो आहोत ।
तुझ्या पाऊलखुणांवर
कोणी चालेल का पुन्हा?
आपुल्या देशाला योग्य दिशा
कोणी दावेल का पुन्हा? ।
हाच प्रश्न आम्हा आता
दिनरात छळतो आहे
महामानवा तुझ्यासम नेत्याची
आम्ही वाट बघतो आहे ।
- मोहिनी घारपुरे -देशमुख
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम 💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा