गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

सुचली तर कविता    
नाहीतर फक्त शब्द ।
झालीच तर मैत्री
नाहीतर फक्त गर्दी ।
जमलच तर प्रेम
नाहीतर फक्त गेम ।
पटलीच तर ओळख
नाहीतर फक्त आठवण।
सापडलाच तर विश्वास
नाहीतर फक्त आधार।
व्यक्त झालंच तर फक्त मन
नाहीतर फक्त तन ।
उरलेच तर स्मरण
नाहीतर कोण आपण ?
- मोहिनी घारपुरे - देशमुख




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश