बुधवार, २५ एप्रिल, २०१८

डोह

डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं
जेव्हा एकटक पहायला लागतात
तेव्हा कुठेतरी लागला असतो
जिव्हारी घाव ..
रूतलेला असतो एखादा शब्द
खोल खोल काळजात
आणि मनाच्या डोहात जेव्हा
हिंदकळत राहतो ना तो
तेव्हा फुटतं
काठोकाठ भरलेलं
नेत्रतळं
आणि अशावेळी लागतं
आपलं असं कुणीतरी
तो उसळलेला डोह आवरायला
खरच किती क्षण आयुष्यात
येतात असे हिंदकळलेले
आणि देऊन जातात जवळ पुन्हा
माणूस "आपले" दुरावलेले..।
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश