अशा अंधारलेल्या रात्रीची
वाट पहात असतो प्रत्येकजण
तिच्या कुशीत निजतो
विसरूनीया अवघे श्रम ।
ती घेते आपल्याला
हळुवार कवेत जेव्हा
तिच्या मऊमुलायम स्पर्शाने
जीव सुखावतो तेव्हा ।
ती नीरव शांत काळोखी
तरी गाते हळुवार अंगाई
तिच्या मौनातच शब्द सारे
जोवर कानी येई भूपाळी ।
रात्र कशी शांत शांत
नसते तिला कसली भ्रांत
तिचा काळा लांब पदर
त्यावर चांदण्यांची जरतार ।
ती दडवते भूक जेव्हा
आपल्या उदरात
सुखावलेला जीव तेव्हा
नीजतो तिच्या काळोखात ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा