शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

आसिफा

देव असतो माणसात
नसतोच तो देवळात
आसिफाच्या घटनेनी
पुन्हा हेच तर सिद्ध केलंय ।
ती इवलाली नाजूक पोर
चारायला गेली घोडे
तिच्या कोवळ्या मनी तेव्हा
नव्हते काही कोडे ।
राक्षसांच्या विळख्यात जेव्हा
गुदमरली गेली आसिफा
कोणीच माणूस नव्हता भवती
हाय रे चिमुकलीच्या कर्मा।
दगडातला देव तिथे
बसला होता मुका होऊन
अशावेळी सज्जन कुणी
गेला तरी असता धावून ।
कदाचित तेव्हा नव्हतच कुणी
म्हणून साधला डाव
देव कुठला दगडाचाच तो
माणसांनीच केला असता बचाव ।
म्हणून जपा माणूसपण आपलं
नराधम, राक्षस होऊ नकाच
जपा आपला एकच मंत्र
समता बंधुता धर्म खराच ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश