काही काही गोष्टी जशा
ठरवून करतो ना आपण
तशाच काही काही गोष्टी असतात
ओघवतेपणी करायच्या
स्वतःच, स्वतःला वाटलं म्हणून
आणि केवळ आपल्या समाधानासाठी।
तेव्हा नसतं बघायचं जगाकडे
कारण त्याचे डोळे असतात
नेहेमीच वटारलेले, रोखलेले नी
शोधत असतात आपल्यातल्या
भाबड्या, हळुवार जागा
बोटं दाखवण्यासाठी , नावं ठेवण्यासाठी ।
अहो, चटकन कोणाच्या डोळ्यात
जेव्हा पाणी दाटते ना
तेव्हा वाट नसते पहायची
झटकन आपणच व्हायचे असते पुढे
अन् रडणाऱ्याचे अश्रू
टिपायचे असतात आपल्या हाती ।
जेव्हा गंधित होते बकुळ
तेव्हा भरभरून घ्यायचे असतात श्वास
नी सुगंधित होऊ द्यायची असतात
एकेक गात्र, आपलीच, आपल्यासाठीच ।
पण हे सगळं करताना
लपवून घ्यायचं स्वतःला
जगाच्या रोखलेल्या नजरेपासून
नी वटारलेल्या डोळ्यांपासून
कारण ते केव्हा दंश करेल
याचा काही नेम नाही ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख
ठरवून करतो ना आपण
तशाच काही काही गोष्टी असतात
ओघवतेपणी करायच्या
स्वतःच, स्वतःला वाटलं म्हणून
आणि केवळ आपल्या समाधानासाठी।
तेव्हा नसतं बघायचं जगाकडे
कारण त्याचे डोळे असतात
नेहेमीच वटारलेले, रोखलेले नी
शोधत असतात आपल्यातल्या
भाबड्या, हळुवार जागा
बोटं दाखवण्यासाठी , नावं ठेवण्यासाठी ।
अहो, चटकन कोणाच्या डोळ्यात
जेव्हा पाणी दाटते ना
तेव्हा वाट नसते पहायची
झटकन आपणच व्हायचे असते पुढे
अन् रडणाऱ्याचे अश्रू
टिपायचे असतात आपल्या हाती ।
जेव्हा गंधित होते बकुळ
तेव्हा भरभरून घ्यायचे असतात श्वास
नी सुगंधित होऊ द्यायची असतात
एकेक गात्र, आपलीच, आपल्यासाठीच ।
पण हे सगळं करताना
लपवून घ्यायचं स्वतःला
जगाच्या रोखलेल्या नजरेपासून
नी वटारलेल्या डोळ्यांपासून
कारण ते केव्हा दंश करेल
याचा काही नेम नाही ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा