शनिवार, ७ एप्रिल, २०१८

चिऊताई - (मी लिहीलेलं पहिलं बडबडगीत)

चिऊताईच्या गळ्यात मोत्याचा हार
इवल्याशा मुलीला आवडला फार

चिऊताई रोज गाते गाणे
चिमुकलीचे पोट भरते त्याने

चिऊताईच्या मनात मोठासा बंगला
काडीकाडी जमवताना जीव तिचा रंगला

चिऊताई चिऊताई कष्टाळू फार
चिमुकली सोसते इवलासा भार
- मोहिनी घारपुरे- देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश