शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

समुद्र

समुद्राच्या लाटा झेलत
चिंब भिजवावे स्वतःला
अन् रहावे तहानलेलेच
पुन्हा कवेत शिरायला ।
तो पसरलेला अस्ताव्यस्त
उघडून आपुले बाहूपाश
तो सांडत जातो निळाई
अन् झुकते अथांग आकाश ।
तो नभीच्या चांदव्याला
जणू घेतो आपुल्या मीठीत
तो असा जिवलग मित्र
होतो पहिल्याच भेटीत ।
मग चांदण्याही आसुसती
त्याच्या राकट स्पर्शासाठी
अन् क्षणात उधळून देती
चांदणचुरा त्याच्यावरती ।
ही भेट एका मर्दाची
की श्रुंगार हा सजणाचा
तो उधळत जातो लाटा
जणू म्हणतो पुन्हा भेटा ..।
- मोहिनी घारपुरे-देशमुख


Image may contain: night, ocean, sky and water

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश