शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

कला

ती पावली
तेव्हा कलाकाराचा जन्म झाला
ती नाचली
तेव्हा नर्तनाचा जन्म झाला
ती रंगली
तेव्हा चित्र जन्माला आले
ती गायली
तेव्हा सूर जन्माला आले
ती खेळली
तेव्हा हाताची बोटं थिरकली
तिचा स्पर्श झाला
तेव्हा 'त्याला' ओळख मिळाली
ती वास्तव्याला आली
तेव्हा तो कलाकार म्हणून नावाजला .. ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश