शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

रंग आयुष्याचे

रंग कसे ना आपल्यासाठी
आपल्या मर्जीने वागतात
किमान काही काळतरी ते
आपला तोरा राखतात।
आपलं चित्र आपल्याला
हवं तसं खुलवता येतं
कारण कुठे कसा रंग द्यायचा
ते आपलं मन ठरवतं।
आयुष्याचं चित्र मात्र
आपल्या नसतं हातात
जो येईल तो रंग
द्यावा लागतो क्षणार्धात ।
मावळतीचे रंग कधी
कधी उगवतीची लाली
आयुष्याच्या चित्रामध्ये
कधी उमटे पानोपानी।
काही अवचित रंग असतात
ईश्वराहाती दडलेले
त्या त्या वेळी ते ते खुलती
ज्यासाठी असते मन आतुरले ।
रंगांच्या या शेल्यामधले
काहीच रंग आपल्या नशीबी
खरा चित्रकार तोच ठरतो
ज्याला कळते अचूक रंगसंगती ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

४ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश