बुधवार, ४ एप्रिल, २०१८

भूतकाळ

कशी कोण जाणे
उलगडत गेली पानं
नी आठवत गेला भूतकाळ
सुरस, सुंदर, रम्य ।
पण आठवत नाहीत तरीही
काळाचे नेमके संदर्भ
नेमके कधी कोठे कोण
आपल्याला कसे भेटत गेले ।
गेलेले दिवस परत ना येणार
निसटलेले हात पुन्हा ना मिळणार
हे जाणतो म्हणूनच
शोधत रहातो काळाच्या खाणाखुणा
भूतकाळाच्या निसटत्या पडद्याआड ।
पण तोही चुकार बदमाश
दाखवतो केवळ काहीच चित्र
ज्या चित्रांचे रंग असतात
गडदपणे काळजावर उमटलेले ।
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश