शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

कविता

कविता असते मुक्त आणि असते छंदीष्टही
म्हणूनच ती विहरते लीलया
कवींच्या कल्पनांतही ।
कधी जाते समुद्रात
कधी विहरते रानोमाळ
कधी फिरते गगनात
कधी बरसते पावसात ।
कधी होते व्रुद्धा
कधी होते ललना
कधी रूपे बालिका
कवींच्या शब्दांमधी ।
कवितेचं असच असतं
झरझर बरसणंच तिला जमतं
जोडत एकेक शब्द शब्द
कवितेचं पान बहरतं ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश