मंगळवार, १० एप्रिल, २०१८

देवाचा स्पर्श

आज मंदिरातले दिवे 
अजून मिणमिणत आहेत
जणू कुणाच्या ह्रदयीचे गूज
देवच ऐकत आहे ।

कुणी बिचारा उपाशी असेल निजला
कुणी बिचारा राबराब राबून असेल थकला
त्या सगळ्यांच्या डोक्यावर आज
मायेचा हात फिरवत
खुद्द देवच बसला असेल का ?
त्या स्पर्शाच्या ऊबदार गोधडीतच 
आज प्रत्येकजण निजला असेल का? - मोहिनी घारपुरे - देशमुख 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश